20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष भारताचा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक

भारताचा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक

एकमत ऑनलाईन

भारत-अमेरिका संबंधांमध्ये ऐतिहासिक घडामोड घडली आहे. दोन्ही देशांदरम्यान एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झालेली आहे. हा करार आहे बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन अ‍ॅग्रिमेंट. भारत गेल्या अनेक वर्षांपासून या कराराची वाट पाहात होता. हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा करार मानला जातो. अमेरिकेकडून आपल्या अत्यंत जवळच्या देशांबरोबरच हा करार केला जातो. हा करार नेमका काय आहे आणि भारतासाठी तो का महत्त्वाचा आहे हे सर्व जाणून घेण्यापूर्वी या कराराची वेळ लक्षात घेतली पाहिजे.

आज एलएसीवर चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढलेला आहे. या दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. चीनने जवळपास ६० हजार सैन्य सीमेवर आणले आहे. डीएफ-१७ म्हणजे डॉनफेन हे जगातील सगळ्यात विध्वंसक क्षेपणास्त्र चीनने तिबेटमध्ये तैनात केले आहे. त्याचप्रमाणे बॉम्बर्स, रणगाडे देखील चीनने सीमेवर तैनात केले आहेत. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही संघर्षाची ठिणगी पडू शकते असे वातावरण आहे. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. ही संधी साधून चीनकडून जाणीवपूर्वक आगळीक केली जाऊ शकते. चीनकडून सर्वांत मोठी घुसखोरी किंवा भारतीय भूमीवर आक्रमण होऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेने अशा प्रकारचा करार करणे हे चीनला गृहित धरून उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

अमेरिकेत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना आणि निवडणुकीला काही दिवस उरलेले असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील दोन महत्त्वाचे नेते भारत भेटीवर येतात, भारतभेटीवर येऊन ते तीन दिवस आपल्याकडे राहतात आणि अशा प्रकारचा करार भारताबरोबर करतात ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. वास्तविक हा करार ते पुढेही ढकलू शकले असते किंवा यापूर्वीदेखील करू शकले असते. मुख्य म्हणजे हा अमेरिकेबरोबरचा २ प्लस २ डायलॉग आहे. त्याची ही तिसरी फेरी आहे. या फेरीची वेळ निश्चित नाही. परंतु ती जाणीवपूर्वक आत्ता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आली. या सर्व घडामोडींमधून काही महत्त्वाच्या गोष्टी प्रतिबिंबित होतात.

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार! – परिवहन मंत्री अनिल परब

पहिली गोष्ट म्हणजे भारत-अमेरिका संबंध गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने विकसित होत असून ते सातत्याने सुदृढ होत आहेत. अमेरिकेत डेमोक्रेटिक पक्ष असो किंवा रिपब्लिक याचा भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होत नाही. अमेरिकेच्या दक्षिण आशियाविषयक धोेरणामध्ये, अमेरिकेच्या आशिया प्रशांत क्षेत्राच्या धोरणामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. भारत हा नाकारता येणार नाही असा देश झाला आहे. अमेरिकेने नव्याने आशिया प्रशांत क्षेत्रात स्वारस्य घेतले आहे. त्यांनी क्वाडसारख्या गटाला विकसित करायचे ठरवले आहे.

या क्वाडमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी फार मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आता या कराराच्या माध्यमातून कोणत्याही कठीण परिस्थितीत अमेरिका भारताच्या पाठीशी आहे, असा कडक संदेश चीनला देण्यात येतो आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुकीची धामधूम असताना भारत-चीन संघर्ष झाला तरीही अमेरिका भारताच्या पाठिशी असेल, हे यातून स्पष्ट झाले आहे. निवडणुकांपूर्वीच आवश्यक असणारा लष्करी डेटा हा भारताबरोबर शेअर केला जाईल. त्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी हा करार केला गेला.

पुढील महिन्यातील अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प न येता बिडेन आले तरीही भारताला लष्करी माहिती मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून निवडणुकीपूर्वी हा करार करण्यात आला. यातून भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. ज्या पद्धतीने २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. बराक ओबामा असतील किंवा डोनाल्ड ट्रम्प असतील, या दोघांबरोबर त्यांचे ज्या पद्धतीचे संबंध होते, त्यांचे वैयक्तिक समीकरण होते त्याची फळे आता कुठे मिळू लागली आहेत. २०१४ नंतर भारत-अमेरिकेत महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत. आताचा करारही तसाच असून तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारताने शेवटचा सामूहिक सुरक्षा करार १९७१ मध्ये सोव्हिएत रशियाबरोबर केला होता. या करारानुसार, भारतावर एखादे आक्रमण झाले तर सोव्हिएत संघावर आक्रमण झाले असे मानले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. या कराराचे आयुष्य २५ वर्षांचेच होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी हा करार संपुष्टात आला. पण त्यानंतर भारताचा कोणताही सामूहिक करार झालेला नाही. आज भारताची सामरिक स्थिती भक्कम आहे. परंतु चीनसारख्या देशाचा सामना करावा लागला तर भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीची गरज लागणार आहे. अशा वेळी अमेरिकेबरोबरचा केलेला हा करार म्हणजे राजनयिक मास्टरस्ट्रोक ठरेल.

हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

१९७०च्या बांगलादेश युद्धापूर्वी ज्यावेळी अमेरिकेकडून भारतावर आक्रमण होण्याची शक्यता होती, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियाशी असाच करार केला होता. त्यामुळेच त्यावेळी अमेरिकेने हल्ला केला असता तर या कराराचा फायदा भारताला झाला असता. अमेरिकेने भारतावर आक्रमण करण्यासाठी युद्धनौकाही पाठवली होती. तसे घडले असते तर तो हल्ला सोव्हिएत संघावर झाला असे मानण्यात आले असते. पण इंदिरा गांधींनी तो करार करत मोठा मास्टरस्ट्रोक मारला. त्यामुळे अमेरिकेचा हल्ला आपण परतवून लावू शकलो. आता चीनकडून असा हल्ला होण्याची शक्यता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा करार अमेरिकेबरोबर केला आहे. हा करार चीनला हल्ला करण्यापासून रोखणारा आहे. प्रतिरोधन किंवा डेटरन्सच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे लागेल. या करारामुळे आता चीनही भारतावर हल्ला करताना घाबरेल.

अमेरिका अतिजवळच्या सामरिक भागीदारांबरोबरच असा करार करतो. या करारानंतर अमेरिका भारताबरोबर अत्यंत संवेदनशील माहिती शेअर करणार आहे. ती माहिती निश्चितच चीनच्या हल्ल्याविरोधात उपयोगी पडेल. त्यामुळेच भारतावर आक्रमण करताना चीनला दहा वेळा विचार करावा लागेल.
अर्थात, अमेरिकेने भारताबरोबर हा करार उत्स्फूर्तपणे किंवा लगेच केलेला नाही. अमेरिका टप्प्याटप्प्याने भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये काही सुविधा देतो आहे. २०१६ नंतर ज्या पद्धतीने अमेरिकेशी संरक्षण संबंध निर्माण झाले, त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे हा करार आहे.

या कराराचे पूर्ण नाव बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन अ‍ॅग्रिमेंट असे आहे. या कराराअंतर्गत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा डेटा अमेरिका भारताला देणार आहे. याला इंटेलिजन्स शेअरिंग म्हणतात. अमेरिकन उपग्रह भारताबरोबर ही माहिती शेअर करणार आहे. भारताचे उपग्रह क्षेत्रातील सामर्थ्य जगाला परिचित आहे. भारत इतर देशांना उपग्रह भाड्याने देतो. मग भारताला अमेरिकेबरोबर हा करार करून काय साध्य होणार आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु या कराराच्या माध्यमातून भारताला नकाशे, समुद्री मैल, हवाई मैल यांचे नकाशे, क्वालिफाईड आणि अनक्वालिफाईड इमेजरी तसेच फिजिकल आणि जिओ मॅग्नेटिक ग्रॅव्हिटी डेटादेखील मिळणार आहे. हा डेटा दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करताना होईल.

हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

कारण त्यासाठी शत्रूच्या स्थानाची तंतोतंत माहिती असणे गरजेचे आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करताना, समुद्रात हल्ला करताना भौगोलिक स्थानाची अचूक माहिती गरजेची आहे. चीन-भारत संघर्ष झाला तर तो पारंपरिक पद्धतीचा असेल असे नाही. चीनने अनेक क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात केली आहेत. भारताने ३ महिन्यांत डीआरडीओने १२ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी चीनच्या भौगोलिक स्थितीची योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या उपग्रहांकडून अशा प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भारताकडून होणा-या हल्ल्याची अचूकता वाढणार आहे.

अमेरिकेकडून ही माहिती मिळणार याची चीनला कल्पना आहे. पण अमेरिकेचा हा अत्यंत गोपनीय डेटा आहे. हा डेटा अमेरिका कोणालाही देत नाही. अशी चर्चा आहे की डोकलाम संघर्षाच्या वेळी अमेरिकेने अशा प्रकारची माहिती भारताला दिली होती. परंतु त्यावेळी त्याला कराराचा आधार नव्हता. आता एका करारान्वये ही माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे हा करार भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक नक्कीच म्हणता येईल.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
परराष्ट्र धोरण विश्लेषक

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...