21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeविशेषलार्ज कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीरच

लार्ज कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीरच

एकमत ऑनलाईन

सध्याचा काळ हा उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार यास मुळीच अपवाद नाही. बाजारातील चांगल्या कंपन्यांची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट ठरते. अशा कंपन्यांचे व्यवस्थापन हे कार्यक्षम असेल. ग्राहकाने टाकलेला विश्वास, बाजारातील असलेली सकारात्मक प्रतिमा किंवा वलय अशा अनेक गोष्टींमुळे शेअर बाजारात काही कंपन्या लोकप्रिय ठरल्या. त्यांच्यासाठी सर्वांगीण विकास हा अर्थपूर्ण होतो. अशा कंपन्यांच्या विकासासाठी भांडवलाची गरज ही कमीअधिक प्रमाणात भासते. भांडवल बाजारात अशा कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाला गुंतवणूकदार उदंड प्रतिसाद देत असतो. काही वेळेला गरजेपेक्षा जास्त भांडवल हे सामान्य गुंतवणूकदारांकडून सहज उपलब्ध होते.

अशा भांडवलातूनच कंपन्यांची कामगिरी व कामाचा विस्तार हा वाढत जात असतो. त्यातूनच कंपन्यांना सातत्याने नफा होत असतो. त्यामुळे अशा कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार मूल्य व भाव सातत्याने वधारतो. सामान्य गुंतवणूकदार अशा चांगल्या कंपन्यांतच गुंतवणूक करण्यास सदैव तयार असतात. चांगल्या व फायदेशीर X blue-chip कंपन्यांची सर्वोत्तम कामगिरी व सकारात्मक प्रतिमा अव्वल असते. त्यांचा काम करण्याचा धमाका व आवाका मोठा असतो. अशा कंपन्यास लार्ज कॅप कंपन्या असे म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात. लार्ज कॅप फंडामध्ये प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांची गुंतवणूक जास्त असते. त्या सदैव लोकप्रिय असतात. हमखास नफा देणा-या असतात.

लार्ज कॅप फंड हे मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक प्रामुख्याने करीत असल्यामुळे अशा फंडाचा नेट असेट व्हॅल्यू हा सातत्याने वाढत असतो. नेट असेट व्हॅल्यूमधील चढ किंवा उतार हा मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंडाच्या तुलनेत स्थिर असते. बाजारातील तेजी- मंदीच्या या आवर्तनाचा परिणाम हा लार्ज कॅप फंडामध्ये कमी असतो. यामुळेच नेट असेट व्हॅल्यूमधील चढ-उतार यात बदल कमी होत असतो. त्यामुळे सामान्य गुंतवणूक व गुंतवणूकदार यावरील परिणाम कमी स्वरूपात दिसत असतो. त्यामुळेच सामान्य गुंतवणूकदारास फायदा अशा फंडात हा हमखास होतो. म्हणून सामान्य गुंतवणूकदार लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असतो. मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये जोखीम जास्त असते पण गुंतवणूक कमी सुरक्षित असते. अनेक वेळा याचा मानसिक त्रास सामान्य गुंतवणूकदारांना होत असतो. लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये असणारी गुंतवणूक ही जास्त सुरक्षित असते. त्यातील जोखीम कमी होत असते, परंतु लोकप्रिय कंपन्या असल्यामुळे हमखास नफा होतो. पर्यायाने याचा अप्रत्यक्ष फायदा म्युच्युअल फंडातील युनिट धारकाला होत असतो. त्यामुळे फंडाचा ल्लं५ वाढतो.

देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी

लार्ज कॅप म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर गुंतवणूक करीत असताना जास्त भांडवल असणा-या व कार्यक्षम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत असतात. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे कंपन्याचे मार्केट कॅपिटल हे दहा हजार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असते. शेअर बाजारात अशा कंपन्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट असते. सध्याचा विचार करता अशा कंपन्या म्हणजे रिलायन्स, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो इत्यादी कंपन्यांची नावे आपल्यासमोर येत असतात. अशा कंपन्यांचे व्यवस्थापन सकारात्मक व उच्च कार्यक्षम असते. मोठ्या कंपन्या या जास्त नफा मिळवीत असतात. पर्याप्त किंवा कमी भांडवलाचा उपयोग करण्याचे तंत्र त्यांना अवगत असते. शेअर बाजारातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये शेअरची खरेदी- विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा व्यवहारात तरलता भरपूर असते. व्यवहारात तरलता जास्त असल्याने शेअर्स खरेदीदार व विक्रीदार यांची गर्दी सातत्याने होते. लार्ज कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केल्यास ती गुंतवणूक अडकून पडत नाही. अशी गुंतवणूक लवकर मोकळी होते. त्यामुळेच अनेक सामान्य गुंतवणूकदार व बाजारातील तज्ज्ञ व्यक्ती लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास जास्त उत्सुक असतात. कमी जोखिमेत जास्त फायदा मिळतो.

शेअर बाजारातील प्रत्येक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणा-या पहिल्या शंभर कंपन्यांच्या यादीत लार्ज कॅप कंपन्यांचा समावेश होतो. अशा कंपन्या या मोठ्या व अवाढव्य कारभार करीत असताना चौफेर प्रगती विस्तार करीत असतात. अशा मध्येच लार्ज कॅप म्युच्युअल फंडातील फंड मॅनेजर त्यात गुंतवणूक करीत असतात. चांगल्या व मोठ्या कंपन्या सातत्याने जास्त नफा देणा-या कंपन्या, सर्वोत्तम व्यवस्थापन असणा-या कंपन्या इत्यादी घटकांच्या निकषावर गुंतवणूक केल्याने अशी गुंतवणूक नेहमीच सुरक्षित व फायदेशीर ठरत असते. त्यामुळे फंड मॅनेजरच्या डोक्याला होणारा ताप टाळला जाऊ शकतो. अनेक वेळा सामान्य गुंतवणूकदाराचा पैसा सुरक्षित व खात्रीने नफा देणा-या कंपन्यांत गुंतविल्याने फंड मॅनेजरचे ब्लड प्रेशर कमी-जास्त होत नाही. लार्ज कॅप कंपन्या अनेक वेळा ब्लूचिप कंपन्या असतात. संपूर्ण शेअर बाजारात अशा लार्ज कॅप कंपन्यांची पकड अधिक असते. अशी पकडही ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वर्चस्व बाजारात असते.

जवळपास अशा कंपन्या शंभरच्या घरात असतात. त्यातील चांगल्या व सर्वोत्तम क्षेत्रातील निवडलेल्या कंपन्यांचा सहभाग हा निफ्टीमध्ये ५० व सेन्सेक्समध्ये ३० कंपन्यांचा समावेश होत असतो. अशा कंपन्यांची कामगिरी कमी-जास्त झाली असेल तर त्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये चढ-उतार होत असतात. त्यामुळेच निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये वाढ किंवा घट होत असते. निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये समावेश असणा-या कंपन्यांच्या क्रमवारीच्या यादीत सातत्याने बदल होतो. अनेक वेळा लार्ज कॅप त्यामधील असणारी गुंतवणूक पॅसिव्ह स्वरूपाची ठरते. कारण लार्ज कॅप म्युच्युअल फंडात प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्याची निवड करणे सोपे ठरते. अशा कंपन्यांची कामगिरी व नफा देखील चांगला असतो. अनेक वेळा फंडव्यवस्थापक हे प्रामुख्याने यात गुंतवणूक करीत असताना लार्ज कॅप कंपन्यांत गुंतवणूक करतात. फंड मॅनेजर पोर्टफोलिओ तयार करीत असताना लार्ज कॅप कंपन्यांचा राखीव हिस्सा ठरवीत असतात.

वास्तविक पाहता लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत असताना फंड मॅनेजरला विशेष संशोधन करावे लागत नाही. कारण लार्ज कॅप कंपन्यांची निवड करणे सोपे असते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने नेहमी फायदेशीर ठरते. त्यात खरे बोलायचे झाल्यास लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये कमी संशोधन करून जास्त नफा मिळवायचे तंत्र फंड मॅनेजरला आत्मसात असते. अशी गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीर ठरत असते. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक कमी सुरक्षित असून ती आक्रमक होत असते. त्यातूनच नफा जास्त मिळविला जातो. सामान्य गुंतवणूकदारास लार्ज कॅप फंड व इंडेक्स फंड यातील फरक समजत नाही. लार्ज कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असताना लार्ज कॅप परिघातील शंभर चांगल्या कंपन्यांपैकी चांगल्या कंपन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य फंड मॅनेजरला असते. इंडक्स फंडाचा विचार करता असे स्वातंत्र्य निफ्टीमध्ये ५० तर सेन्सेक्समध्ये ३० कंपन्यांमध्येच निवड केली जाते. ही गोष्ट सामान्य गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण सेन्सेक्स व निफ्टीच्या समूहात येणा-या जवळपास सर्व कंपन्यांत इंडेक्स फंडाची गुंतवणूक असते. लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना लार्ज कॅप समूहातील शंभर कंपन्यांपैकी निवडक व चांगल्या कंपन्या त्याच्या शेअरची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. ही बाब खूप महत्त्वाची आहे.

आपणास माहिती असेलच, लार्ज कॅप म्युच्युअल फंडातील नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू हा काहीसा स्थिर व कमी बदलणारा असतो. बाजारातील तेजी व मंदीच्या आवर्तनाचा जास्त परिणाम अशा फंडावर जाणवत नाही. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंडामध्ये अस्थिरता जास्त आढळते. मल्टी कॅप फंडात गुंतवणूक करीत असताना पूर्वीच्या काळी गुंतवणूकदाराचे लक्ष हे लार्ज कॅपकडेच असायचे. त्यामुळे गुंतवणूक ही ठराविक ठिकाणी केंद्रित व्हायची. याचा परिणाम मिडकॅप व स्मॉल कॅपमधील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे काहीसे दुर्लक्ष व्हायचे. सेबीच्या सुधारित नियमानुसार गुंतवणूक व गुंतवणूकदाराचे विकेंद्रीकरण झाल्याने लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप फंड यात कंपन्यांमध्ये समतोल साधला जातो. यामुळेच गेल्या काही काळात सुमारे ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही लार्ज कॅपमधून बाहेर पडून ती मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये प्रवाहित झाली. त्यामुळे चांगल्या कंपन्यांची निवड करण्याची प्रोसेस वेगाने सुरू झाली. तशा प्रकारचे काम फंड मॅनेजरवर आले. तशी जबाबदारी निर्माण झाली. गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण यातून झाल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा शेअर बाजारावर झाला. एकंदरीत लार्ज कॅप म्युच्युअल फंड हे नेहमी सदाबहार असतात. त्यामध्ये होणारी गुंतवणूक ही कमी जोखिमेत व जास्त सुरक्षित राहते. त्यामुळेच सामान्य गुंतवणूकदारांचा जास्त विश्वास लार्ज कॅप फंडाकडे वाढतोय. बदलत्या काळात लोकप्रियता देखील वाढतच आहे.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या