23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeविशेषकान्होपात्रा आणि तरटीचे झाड

कान्होपात्रा आणि तरटीचे झाड

एकमत ऑनलाईन

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत कान्होपात्राची समाधी आहे. या समाधीच्या नजीक जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे. अगदी तेव्हापासून या तरटीच्या झाडाच्या रुपात संत कान्होपात्राला पाहिले जाते. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी दर्शन रांगेतील भाविक याचा झाडाचे मोठ्या भक्तीने दर्शन करतात व या झाडाच्या फांदीला मिठी मारून प्रत्यक्ष कान्होपात्रेचे दर्शन झाल्याने कृतकृत्य होतात. दर्शन रांगेच्या अगदी जवळच (हाताच्या अंतरावर) हे तरटीचे झाड असल्याने सर्व भावीक या झाडाला प्रेमाने/मायेने स्पर्श करतात व त्याचे दर्शन घेतात. या झाडाचे दर्शन झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही अशी वारक-याची धारणा आहे. या वृक्षाचे नाव तरटी म्हणले तर ती म्हणजेच भवसागर तारूण जाण्यास मदत करणारा वृक्ष अशीच भावना प्रत्येक वारक-याची असते.

निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक सजीवाला (प्राणी/वनस्पती) एक ठरावीक आयुष्य असते. या निसर्ग नियमाप्रमाणे हे दहा दशकापेक्षा जास्त वर्षापूर्वीचे कान्होपात्राचे म्हणजेच तरटीचे झाड आता पूर्णपणे वटून गेले/वाळून गेले आहे. या ठिकाणी आता फक्त वाळलेल्या फांद्या शिल्लक उरलेल्या आहेत. सध्या या झाडावर एकही पान दिसत नाही. तरीसुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे भाविक कान्होपात्राचं झाड समजून याच वाळलेल्या फांद्यावर डोके ठेवून मनोभावे दर्शन घेतात. कान्हो पात्रेच्या समाधीजवळ हे झाड असल्याने ते कान्होपात्रेचे झाड म्हणूनच ओळखले जाते.

मंदिरातील हे तरटीचे झाड व संत कान्होपात्रा या दोन्ही विषयी प्रत्येक भाविकांच्या मनात अपार श्रद्धा व भक्ती आहे. भावीक भक्ताच्या भावनेचा आणि श्रद्धेचा आदर करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पुन्हा नव्याने कान्होपात्राच्या समाधीजवळ नवीन तरटी वृक्षाचे रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेक महिन्यापासून मंदिर समितीमधील प्रत्येक सदस्यांकडून तरटी वृक्षाची शोध मोहिम चालू होती. पण फार यश आले नव्हते. कारण तरटीचा वृक्ष कुठेही दिसत नव्हता. एके दिवशी मंदिर समितीच्या एका कार्यक्रमाला तरटीच्या वृक्षाची माहिती मिळाली व त्याने स्वत: खात्री करून चार ते पाच वर्षाचे तरटी वृक्षाचे रोपटे मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

दि. २० जुलै रोजी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते कान्होपात्रा समाधी जवळील जागेत तरटी वृक्षाचे रोपण करण्यात आले. या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणा-या सर्व भाविक-भक्तांना आता कान्होपात्राच्या बहरलेल्या नवीन वृक्षाचे दर्शन मिळणार आहे.

एकूण १०३ गावे पुराने बाधित

संत कान्होपात्रा : कान्होपात्रेचा सत्संग आणि विठ्ठल भक्ती नियतीला मान्य नव्हती आपल्या आईचा वेशा व्यवसाय पुढे चालवावा ही समाजाची सक्ती तिने धुडकावून लावली आणि स्वतंत्र अशी भक्तीमार्गाची वाट निवडली. खरं तर तत्कालिन समाजव्यवस्थेच्या विरोधातच तिने बंड पुकारले होते. यासाठी तीला वारकरी विचाराच बळ मिळालं होतं. प्रामुख्याने मंगळवेढ्यातील संत चोखोबाचं, ज्यामुळे वारक-यांच्या मेळाव्यात आणि विठ्ठलाच्या मंदिरात तिचं मन रमून गेले. कान्होपात्राच्या गोड, सुस्वर व रसाळ वाणीतील अभंग ऐकण्यासाठी वारक-याची गर्दी होत असे.

कान्होपात्राला अनेक गावातील सावकाराच्या मागण्या येऊ लागल्या पण तिने प्रत्येकवेळी नकार दिला. ती म्हणायची गायन केले तर ते फक्त विठ्ठलासाठीच, माझ्या पांडुरंगाशिवाय कुणासमोरही माझी कला सादर करणार नाही. गावातील लोकांनी कान्होपात्राला अद्दल घडविण्यासाठी ठाणेदाराच्या मनात विष भरले. त्याने बोलविल्यानंतर, कान्होपात्रा एकही शब्द बोलली नाही ना आपले नृत्य सादर केले ना गायन कला. सूड भावना ठेवूनच ठाणेदाराने बिदरच्या बादशहाला दहापानी पत्र लिहिले ज्या पत्रात प्रत्येक पानावर कान्होपात्राची अतिशय सुंदर असे सौंदर्य वर्णन केलेले होते. तरटी वृक्ष: हा वृक्ष पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मार्गावर आहे. त्यामुळे भाविकांच्या मनात अत्यंत पुजनीय झालं आहे.

म्हणून या वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या झाडाचे हिंदी नाव अर्दंडा व लॅटिन नाव कॅपॅरिस हॉरिडा असून कुठ कॅपॅरिडेसी असे आहे. ही वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) एक काटक वेल (महालता) असून भारतामध्ये सामान्यत: सह्याद्रीच्या घाटात आढळते. या वनस्पतीच्या कोणत्या भागावर लव (केस) असून वाकडे उपपर्णी काटे असतात. पाने साधी, जाड असून पानांच्या टोकास लांब काटा असतो. पाने लंब गोल आकाराची असून २.५ ते ७.५ सेंमी. लांब आणि २.५ सेंमी. रुंद असतात. फुले पानांच्या बगलेवर एकएकटी किंवा ओळीने २.३ असतात. फुले सुरुवातीला पांढरी व नंतर गुलाबी रंगाची दिसतात व नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यात येतात. फळे मृदूफळ असून तांबूस पिंगट रंगाचे व गोलसर चौकोनी आकाराचे असते. फळामध्ये अनेक बिया असतात. याच्या फळाचे व फुलाचे लोणचे करतात. तरटी ही वनस्पती आयुर्वेदिक औषधी असून प्रामुख्याने याची साल पोटदुखी व पटकी यावर गुणकारी औषधी आहे. ही झाडे
काटेरी असल्याने कुंपणासाठी अतिशय चांगली असतात.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या