25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeविशेषकार्तिकी एकादशी

कार्तिकी एकादशी

एकमत ऑनलाईन

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ असे म्हटले जाते, कारण ‘त्या दिवशी देव झोपी (ध्यानावस्थेत, निर्गुण स्थितीत) जातात’, अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात (कार्यरत होतात), म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हणतात. भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा ओलांडून) श्रीविष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही कार्तिकी एकादशी या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते.

कार्तिकी एकादशीचे महत्त्व : ‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णू आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. याला‘हरिहर-भेट’ किंवा ‘हरिहर-अद्वैत’ म्हणतात. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.

ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणा-­या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा ओलांडून) श्रीविष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.’

बैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी: कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला ‘प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी’ म्हणतात. या दिवशी ‘विष्णू प्रबोधोत्सव’ साजरा करतात; कारण आषाढ शुक्ल एकादशीपासून योगनिद्रेत असलेला भगवान श्रीविष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला योगनिद्रेतून जागा होतो. या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. सूर्योदयाला जी एकादशी तिथी असते, तिला ‘स्मार्त एकादशी’ म्हणतात. स्मृतींना पाळणारे स्मार्त एकादशी पाळतात. ‘प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे.

भागवत एकादशी : कधी कधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा सलग दोन एकादशी तिथी येतात. भागवत धर्म पाळणारे वारकरी भागवत एकादशी पाळतात. स्मार्त आणि भागवत या दोन एकादशी दोन स्वतंत्र दिवशी येतात. प्रत्येक मासाच्या प्रत्येक पक्षात अशा दोन एकादशी येतीलच,असे नाही. कार्तिक मासातील भागवत एकादशी यंदाच्या वर्षी २६ नोव्हेंबरला आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकादशीचे विविध प्रकार आणि वैशिष्ट्ये, एकादशी व्रत करण्याची पद्धत आणि महत्त्व, एकादशीचा उपवास आणि लाभ याविषयी- एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या वेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुस-या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात. प्रत्येक मासात दोन, याप्रमाणे वर्षात चोवीस एकादशा येतात. कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा आणि आमलकी.

दत्तात्रय वाघूळदे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या