20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeविशेषकानोसा : लॉकडाऊननंतर निर्भीडपणे जगूया

कानोसा : लॉकडाऊननंतर निर्भीडपणे जगूया

एकमत ऑनलाईन

भारतात कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. चार वेळा लॉकडाऊन घोषित करूनसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. केवळ रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी भारतात थोडा ताणला गेला एवढेच. आपण लॉकडाऊन उशिरा जाहीर केला ही आपली पहिली चूक ठरली. आपण ३१ जानेवारीलाच आंतरराष्टÑीय उड्डाणांवर बंदी घालायला हवी होती. परंतु हा निर्णय मार्चमध्ये घेण्याचा अर्थ एवढाच होता की, आपण केवळ स्वत:लाच या आजारापासून दूर ठेवू इच्छित होतो.

लॉकडाऊनच्या वेळी कोविड-१९ ही भारतासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर न करता त्याचा समावेश आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यात करण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की, सर्व राज्यांवर केंद्राचे नियंत्रण राहिले नाही. अखेर घडायचे तेच घडले. अशा संकटाच्या घडीला ‘एक देश, एक धोरण’ तयार होऊ शकले नाही. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे धोरण तयार झाले आणि त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे निर्माण झाले. आजही असे अनेक अडथळे आपल्याला दिसून येत आहेत.

एका राज्यातून दुस-या राज्यात जाऊ इच्छित असलेल्यांचे, विशेषत: मजुरांचे काय करायचे, याचा निर्णय लॉकडाऊन जाहीर करताना झाला नाही. इटलीतही असेच घडले होते. ज्यावेळी लॉकडाऊन हटविण्यात येईल, त्यावेळी रुग्णांच्या संख्येचा आलेख वेगाने वाढेल, हे सर्वांना माहीत होते. त्याप्रमाणे लॉकडाऊन उठविल्यानंतर लगेच रुग्णसंख्या वाढू लागली आहे, हे आज आपण पाहतच आहोत. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू होता तोपर्यंत मास्क न लावता घरात बसणे योग्य होते; परंतु आता मास्कचा वापर व्हायला हवा.

लॉकडाऊन समाप्त केल्यानंतर जसजसे लोक घरातून बाहेर पडू लागतील, दुकानात जाऊ लागतील, आॅफिसमध्ये काम करू लागतील, तसे येताना ते लक्षणविरहित आजाराचा संसर्ग घरी घेऊन येतील, याचा विचार सरकारने केला नव्हता. अनेक लोक घरी आल्याबरोबर केवळ मास्क काढून ठेवतात. कपडे बदलत नाहीत आणि आंघोळही करत नाहीत. त्यामुळे हा आजार त्यांच्या कुटुंबीयांमध्ये फैलावत चालला आहे. लॉकडाऊन सुरू असतानासुद्धा संसर्ग लोकांमध्ये पसरत होता; परंतु लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर मात्र हा आजार एकाच कार्यालयातील किंवा एकाच घरातील सर्वांना होत असल्याचे दिसून आले आहे.

Read More  वीकेंडला सक्तीने लॉकडाऊन, पंजाब सरकारचा मोठा निर्णय

एलजी हाऊसमधील बºयाच कर्मचाºयांना अचानक लागण झाल्याची माहिती नुकतीच मिळाली. याचाच अर्थ असा की, आपल्या धोरणात काहीतरी चुकते आहे. ज्या लोकांनी घराबाहेर मास्क वापरणे गरजेचे आहे, त्यांनी घरातसुद्धा मास्क वापरायला हवा. जे लोक घराबाहेर पडून इतरांना भेटत आहेत, दुकानांमध्ये बसत आहेत, ऑफिसात जात आहेत, काम करीत आहेत, अशा लोकांनी घरात आल्यावरसुद्धा मास्क वापरण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच फिजिकल डिस्टन्सिंग (शारीरिक अंतर) किमान सहा फुटांचे असायला हवे. परंतु बहुतांश ठिकाणी असे अंतर राखणे शक्यच नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) म्हणणे आहे की, एका माणसाला कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी किमान शंभर चौरस फुटांची जागा असायला हवी; परंतु बहुतांश ऑफिसमध्ये हे शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांना लक्षणे न दिसणा-या संसर्गाचा धोका अधिक असतो. असे लोक जेव्हा आपल्या घरी जातात, तेव्हा संसर्ग घेऊनच घरात प्रवेश करतात.

याचा अर्थ असा की, आता घरातल्या घरातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची वेळ आली आहे. जर हे शक्य नसेल तर घरातसुद्धा मास्क वापरणे आवश्यक आहे. घरात जेवण करीत असताना एकमेकांसमोर बसू नये. समोरासमोर बैठका करू नयेत. शक्य असल्यास ९० अंशाच्या कोनात बसून बैठक करावी. असे केल्यास इतर व्यक्तींशी आपला समोरासमोर संपर्क येत नाही. अशा व्यक्तींनी घरात एअर कंडिशनरसमोर बसताना याची काळजी घेतली पाहिजे की अशी व्यक्ती आणि एअर कंडिशनर यांच्यामध्ये अन्य व्यक्ती येता कामा नये. कारण जी व्यक्ती आपल्या आणि एअर कंडिशनरच्या मध्ये बसली आहे, तिच्या उच्छवासामधून निघणारी हवा एअर कंडिशनरपर्यंत पोहोचू शकते आणि ती परतून आपल्या नाकाजवळ येऊ शकते.

Read More  15 जूनपासून संपुर्ण देशात पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’ ? मोदी सरकारनं केला खुलासा

बाहेर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ राहू नये. पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पंपावर जायचे असल्यास दहा लिटर, पंधरा लिटर असे पेट्रोल-डिझेल न मागता, हजार रुपयांचे, दोन हजार रुपयांचे पेट्रोल-डिझेल घ्यावे. त्यामुळे आपल्याला सुटे पैसे परत घ्यावे लागणार नाहीत आणि त्यासाठी जास्त वेळ थांबावेही लागणार नाही. त्याचप्रमाणे मंडईत गेल्यानंतर किलोच्या हिशेबावर भाजी घेण्याऐवजी ‘शंभर रुपयांचे बटाटे’ अशा शब्दांत व्यवहार करायला सुरुवात केली पाहिजे. अशा व्यवहारांची सवय लावून घेतल्यास आपण स्वत:ला आणि इतरांनाही आजारापासून वाचवू शकतो.

अर्थात, आता जे घडून गेले आहे त्याकडे न पाहता पुढे जायला हवे. लॉकडाऊन समाप्त झाला आहे आणि आपल्याला न घाबरता जगायला शिकले पाहिजे. कोरोनाविरुद्धची लढाई आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण या पार्श्वभूमीवरही आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. आपला खर्च आपल्याला मर्यादित करावा लागेल आणि साधेपणाने जगायला शिकावे लागेल. आपल्या घरांमध्ये आणि जीवनशैलीतही बदल करावे लागतील. एअर कंडिशनर न वापरता खिडक्या खुल्या ठेवून आपण राहायला शिकले पाहिजे.

लिफ्टऐवजी जिन्याचा वापर आपण सुरू केला पाहिजे. कमीत कमी नोकर-चाकर ठेवून जगायला शिकले पाहिजे. प्रत्येक घरात एक सायकल असायला हवी आणि तिचा वारंवार वापर व्हायला हवा. त्याचबरोबर ज्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांनी स्वत:च गाडी चालविणे उपयुक्त ठरेल. जास्तीत जास्त वेळ घरातच बसण्याची आणि घरचेच अन्न खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या उपायांमुळे आपल्या खर्चात तर बचत होईलच; शिवाय या सवयी पर्यावरणपूरक ठरतील आणि प्रदूषण कमी होईल. आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे कोरोनाला तर दूर ठेवता येईलच; शिवाय त्या निमित्ताने आपल्याला होऊ शकणारे अन्य आजारही दूर राहतील. एकंदरीत, लॉकडाऊननंतर आपल्याला न घाबरता नव्या आयुष्याला सामोरे जायचे आहे. नवी जीवनशैली आणि नव्या सवयी अंतर्भूत करायच्या आहेत.

डॉ. के. के. अग्रवाल
अध्यक्ष, हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या