27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष जैविक शेतीकडे वळूया

जैविक शेतीकडे वळूया

जैविक शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक शेतीने आपल्या जमिनीचा पोत बिघडविला आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे पिकांचे उत्पादनही चांगले येत नाही. अशा वेळी शेतक-यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच खासगी संस्थाही असे प्रशिक्षण देतात. जीवामृताचा वापर करून शेतक-यांनी आपली जमीन पडिक होण्यापासून वाचविली पाहिजे.

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणूचा मुकाबला करणा-या जगाला विषाणूंचे दुष्परिणाम पुरेपूर समजले आहेत. अशा वेळी आपण आपल्या मुळांकडे वळायला हवे आणि निसर्गाचा समतोल राखणे हा संस्कृतीचा भाग बनवायला हवा. गाय, गंगा आणि वेद म्हणजे सकारात्मक ज्ञान, निसर्गाचे संरक्षण आणि जागतिक विचार हा आपल्या संस्कृतीचा आधार आहे. भारताची संस्कृती ही ऋषी आणि कृषी संस्कृती आहे. यात गोपालनाला विशेष महत्त्व आहे. गोवंशाप्रति समाजाला आस्था आहे. त्यामागे गोवंशाचे महत्त्व स्वीकृत करण्याबरोबरच धार्मिक भावनाही आहे.

परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे देशात काही ठिकाणी, विशेषत: शहरी भागांत सांस्कृतिक विद्रुपता पाहायला मिळते. परंतु ग्रामीण समाज आजही परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे आयुष्य व्यतीत करण्यालाच महत्त्व देतात. पाळीव पशूंसाठी आपल्या समाजात उत्सव, सण साजरे केले जातात, यावरूनच आपल्या समाजात पशुपालनाला असलेले महत्त्व अधोरेखित होते. दिवाळीच्या दुस-याच दिवशी झारखंडमध्ये आदिवासी समाज सोहराई पर्व साजरे करतो. हे पशुधनाच्या पूजेचेच पर्व आहे. दिवाळीच्या दिवशी समाजात ज्याप्रमाणे लक्ष्मीदेवीची आणि गणेशाची पूजा केली जाते, तशीच सोहराईच्या दिवशी पाळीव प्राण्यांची पूजा केली जाते. निसर्ग आणि पशूंबद्दल आदिवासी समुदायाला असलेले प्रेम यातून दिसून येते. शास्त्रीय अभ्यासांनुसार, जीवाणूंना ठार मारता येत नाही; मात्र त्यांची मारक शक्ती कमकुवत करता येऊ शकते. गायीचे दूध, गोमय आणि गोमूत्र या गोष्टी या कामी मोलाची भूमिका बजावतात.

जैविक शेतीचा प्रचार तर खूप जोमाने केला जातो, परंतु त्याचबरोबर जीवामृताचा प्रचार करणेही गरजेचे आहे. विशेषत: ग्रामीण क्षेत्रात तो व्हायला हवा. आज संपूर्ण जग रोगाने, युद्धांनी आणि नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त आहे. या सर्व समस्या निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. जर आपण आपल्या भोवतालचे वातावरण निसर्गाशी अनुकूल असे बनविले तर अनेक समस्यांपासून सहजपणे मुक्ती मिळू शकेल. पिकांमधील पौष्टिक घटकांमधून शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. ही शक्ती आजारांपासून आपला बचाव करते. जमीन ही माता आहे आणि रोपे ही तिची अपत्ये आहेत. जमिनीत जर रोगप्रतिकारशक्ती नसेल तर तिचीच अपत्ये असलेल्या रोपांमध्ये ती येणार नाही. याचाच अर्थ असा की, जर रोपांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करायची असेल तर आधी ती जमिनीत तयार करायला हवी.

मोघा गावची आनंदमय, विधायक दिवाळी

जमिनीला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणा-या जीवनद्रव्याची निर्मिती फक्त आणि फक्त जैविक शेतीमधूनच होते. यालाच आपण नैसर्गिक शेती असेही म्हणतो. रासायनिक शेतीमुळे जीवनद्रव्ये, मस नष्ट होतो. जर आपल्याला आपले आणि समाजाचे रक्षण करायचे असेल, तर जैविक शेतीला प्रोत्साहन द्यावे लागेल. जैविक शेती केल्यास आपल्या परंपराही खंडित होत नाहीत. जैविक शेतीत कीटकांच्या हल्ल्याची शक्यता असते; परंतु त्यांना थोपविण्यासाठी काही जैविक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. ही कीटकनाशके बाजारातून न आणता घरच्या घरीच तयार केली पाहिजेत. ही वनस्पतीजन्य कीटकनाशके कीटकांना मारत नाहीत, तर पळवून लावतात.

या कीटकनाशकांचा शिडकावा केल्यामुळे पीक सुरक्षित राहते आणि वातावरणावरही त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे मूत्र आणि शेण, जुना गूळ, कोणत्याही डाळीचे पीठ, पाणी तसेच पिंपळासारख्या मोठ्या वृक्षाखालची मूठभर माती किंवा शेतातील पिकाच्या मुळाला चिकटलेली थोडी माती या घटकांचा वापर केला जातो. सर्वांत आधी गोमूत्र एका कंटेनरमध्ये ठेवले जाते आणि त्यात दहा किलोग्रॅम गायीचे शेण मिसळले जाते. मूत्रात शेण विरघळेपर्यंत हलविले जाते.

त्यानंतर एक किलो गूळ दुस-या एखाद्या भांड्यात पाण्यात विरघळवला जातो. मिश्रणातील बॅक्टेरिया सक्रिय व्हावेत यासाठी गुळाचा वापर केला जातो. नंतर गूळ विरघळलेले मिश्रण शेण विरघळलेल्या मूत्रात मिसळले जाते. नंतर त्यात एक किलो बेसन मिसळले जाते. हे मिश्रण एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवले जाते आणि थोडा वेळ लाकडी दांडक्याने ढवळले जाते. त्यानंतर त्यात २०० लिटर पाणी मिसळले जाते. त्यानंतर हे मिश्रण चार दिवस तसेच ठेवून दिले जाते. परंतु दररोज वेळोवेळी ते लाकडी दांडक्याने ढवळले जाते. चार दिवसांनंतर या मिश्रणाचा वापर रोपांवर केला जातो.

शेतक-यांसाठी दिलासा: रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार

अशाच प्रकारे कडुलिंबापासून प्रभावी असे कीटकनाशक तयार केले जाते. रस शोषणारी अळी आणि अन्य कीटकांवर हे द्रावण प्रभावी ठरते. याचे जैविक विघटन होत असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हे मिश्रण केवळ हानिकारक कीटकांनाच मारते, लाभदायक कीटकांना धक्काही पोहोचवीत नाही. हरितक्रांतीनंतर भारतीय शेतीत ज्या प्रकारे रासायनिक खतांचा अंधाधुंद वापर झाला, त्यामुळे आपल्या जमिनीचा पोत बिघडला आहे. शेतीयोग्य जमीन वेगाने पडिक जमीन बनली आहे. शेतक-यांचा पैसा रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

या रासायनिक खतांमुळे पिकांच्या उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आता जैविक शेतीलाच प्राधान्य दिले पाहिजे. शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचेच योग्य व्यवस्थापन करून पिकांचे उत्पादन वाढविणे हे जैविक शेतीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, वर्मी कम्पोस्ट, जीवामृत, गोमूत्र आदींचा उपयोग वाढवायचा आहे. सध्या सरकारी यंत्रणांबरोबरच काही खासगी संस्थाही जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. अशा ठिकाणी प्रशिक्षण प्राप्त करून शेतकरी आपल्या घरी जीवामृत तयार करू शकतात आणि आपली जमीन पडिक होऊ नये, यासाठी प्रयत्न करू शकतात.

पद्मश्री अशोक भगत

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या...

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार...

दीदींना ‘टक्कर’

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...