प्रिय पालक हो… तुमच्या मुलाच्या गुरुजींचा सप्रेम नमस्कार… पत्र लिहिण्यास कारण की, यंदा मार्च महिन्याच्या दुसºाा आठवड्यापासून मुलं शाळेपासून आणि आमच्यापासून दूर झाली. एरवी मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी म्हटलं की, मुलांना पर्वणीच असायची. स्वैरपणे, आनंदाने सगळी सुट्टी संपत आली की, पुन्हा त्यांना शाळेची ओढ लागायची. हे असच काहीसं आमच्या- तुमच्या लहानपणापासून परंपरागत चालत आलेलं चक्र.
या कालचक्राला ‘कोरोना’ नावाच्या महाभयंकर राक्षसाने खोडा घातला. सबंध जगभरातील क्षणाक्षणावर स्वत:चे भीतीचे सावट लादले. त्याला कोणीच अपवाद राहिले नाही. मग त्याला ही ‘कोवळी मनं’ तरी कसे अपवाद ठरणार? त्यांच्या बालमनालासुद्धा आजूबाजूचे ऐकून- पाहून अनेक प्रश्न पडत असणार हे निश्चितच. तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भवितव्याची, शिक्षणाची चिंता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच हे पत्र लिहुन आपल्याशी बोलावं, मोकळं व्हावं असं वाटलं.
यंदाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सर्वच मुलांना पास झाल्याचे आणि पुढील वर्गात प्रवेश केल्याचं तुम्ही ऐकला असेल. तरीही तुमचा पाल्य पुढच्या वर्गात जाण्यासाठी पात्र झाला आहे हे आम्ही कळवणे हे आमचे कर्तव्यच. त्यामुळे त्याच्या पास-नापास चिंता सोडून द्या. तो आता पुढच्या वर्गात जाणार, पण आता पुढे काय? याबाबत आपण बोलूया. गेले तीन चार महिन्यांपासून आपण आणि , मुले, कुटुंबीय सगळेजण घरीच आहोत. एरवी सतत कामात असणारे, बाहेर फिरणारे आपण आज या महा संकटामुळे बंदिस्त झालेले आहेत.
Read More आदर पुनावाला : कंपनीने घेतला मुंबई आणि पुण्यात चाचणी करण्याचा निर्णय
तुम्हाला कंटाळा येणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कंटाळला असेल तशी मुलही कंटाळले असतील. तुमच्यासमोर सुद्धा दैनंदिन जीवनाचे अनेक प्रश्न समोर असतील. तुमच्यासमोर सुद्धा अनेक समस्या निर्माण झाले असतील. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे, समस्यांची सोडवणूक परिस्थितीनुसार होत जाईल. पण कधी? केव्हा? हे निश्चित सांगता येणार नाही. असो आता तर मुलांच्या सुट्ट्यांच्या वेळेचा काय याबाबत आपण बोलूया. खरं तर शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद हा समज पहिला दूर करुया. मुलं शाळेतच शिकतात असं नाही. घर, कुटुंब, समाज, परिसर यातूनही त्याचे शिक्षण होत असतं, पण यातून त्याने जे घेतलेलं शिक्षण आहे.
त्या शिक्षणाला विधायक मार्गातून पुढे मार्गस्थ होण्यासाठी शाळा गुरुजन प्रयत्न करत असतात. आज आम्ही त्यांच्यापासून दूर आहोत. सध्या सुरु असलेला लॉकडाऊनमुळे संपर्क होणे शक्य नसलं तरी व्हाट्सअपच्या माध्यमातून मुलांच्या चाचण्या घ्या, उजळण्या घ्या, स्वाध्याय घ्या अभ्यास या असाही विचार पुढे आला आहे. ब-याच ठिकाणी सुरु असेल यावर बोलत बसण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्यासाठी काय करु शकतो? याठिकाणी हा उपाय तांत्रिक कारणाने तकलादू ठरेल तेव्हा काय करायचं याबद्दल आपण बोलूया. घरी असणा-या मुलाचे तुम्ही केवळ पालक नसून गुरुजी व्हा. होय, गुरुजी व्हा. आता गुरुजी म्हणजे लेखन, वाचन, पाठांतर घ्या असंच नव्हे. मुलांना मारुन मुटकून अभ्यासाला बसवा हेही नव्हे.
Read More मांजरांमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याची पहिली केस ब्रिटनमध्ये सापडली
यापलीकडेही आम्ही गुरुजीं मुलांना भरपूर काही देत असतो. त्यातलंच काहीसं किंबहुना जास्त हे तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं लादू नका मग काय करता येईल? आता पावसाळा सरु आहे. या सुट्टीचा आनंद घेऊ द्या त्यांना. बागडू द्या. कुटुंबात लुडबुड करु द्या. त्यांना अटकाव करु नका. हटकू नका. अभ्यास- अभ्यास- अभ्यास, पाठांतराचा लकडा त्यांच्यामागे लावू नका. लॉकडाऊनमुळे गावबंद, शहरे बंद, बाजार बंद, सगळं काही बंद आहे. कारण गल्लीत, बाजारात, शहरात कोरोना वावरत आहे.
याची काळजी घेऊनच सगळ करायचा याचं भान हे आपल्याला असलं पाहिजे़ खरंतर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाऊच नका. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावं लागलं तर तोंडाला मास्क लावून जा़ वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा.. इथूनच खºया अर्थाने मुलांच्या घरातल्या शिक्षणाची सुरुवात करा़ तुम्ही आरोग्याचे मंत्र पाळले तर मुलेही त्याचा अनुकरण करतील हळूहळू तीही शिकतील़ त्यांच्या शरीर स्वच्छतेकडे लक्ष द्या. स्वत:च्या गोष्टी स्वत:चं करण्याची सवय लावा.
अधून मधून त्यांनाही सकाळी लवकर उठवा. पहाट कशी असते? चिमणी पाखरांची स्वच्छंदी किलबिल त्यांना जाणीवपूर्वक ऐकवा. दाखवा त्याला सूर्याचे उगवणे. लाल बुंद सूर्यबिंब, पशु -पक्षांचे आवाज ऐकवा. त्याला आता बाहेरच पण घेऊ द्या. म्हणून शिकू द्या त्याला स्वत:हून. जगू द्या त्याला डोळे उघडून. लक्षात असुद्या फक्त सक्ती नको. नको घोकंपट्टीला थारा. काळजी करु नका आम्ही आहोतच त्याच्यासोबत तुमच्या सोबत आणि हो लक्षात ठेवा कोरोना मुक्तीचे नियम पाळा कुटुंबातच रहा, सुरक्षित रहा. आमच्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे सोपवत आहोत़ आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे लवकरच येत आहोत.
Read More बांग्लादेश नाही विसरला ३० लाख हत्या व लाखो महिलांवरचे बलात्कार