22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home विशेष ऑगस्ट क्रांतीदिन चिरायू होवो!

ऑगस्ट क्रांतीदिन चिरायू होवो!

एकमत ऑनलाईन

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला. कित्येक क्रांतिकारक लढले. शहीद झाले. काहींची नावं इतिहासात नाहीत. काहींची आहेत. पण जे जे या देशासाठी लढले, त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोक त्यांना शिव्या हासडताना दिसतात. ही या देशाची शोकांतिका आहे. निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करू शकलो नाही. आताही करण्यासारखे असूनही करू शकत नाही. हे सगळं विसरून त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोक करीत असतात.

खरं तर ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. पण असे असले तरी या दिवसासाठी आठ ऑगस्टलाही जास्त महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईमध्ये एक प्रस्ताव पारित केला. त्या प्रस्तावानुसार ९ ऑगस्टपासून आपण चले जाव , भारत छोडोचे आंदोलन करू असे ठरले. प्रत्येक नेत्याने रस्त्यावर उतरून अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा उठाव करू असे ठरले. त्याला कारणही तसेच होते.

१९३९ ला द्वितीय महायुद्ध सुरू झाले. त्या महायुद्धात जर्मन फौजांनी इंग्लंडवर सरशी केली. त्यावेळी येथील भारतीय नेत्यांना इंग्रजांनी म्हटले होते की, तुम्ही आम्हाला मदत करा. बदल्यात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. पण ज्यावेळी युद्ध संपले, तेव्हा इंग्रजांनी भारतीयांना दगा देत स्वातंत्र्य देण्यापासून माघार घेतली. त्यामुळे पर्यायाने भारतीय नेत्यांची मनं नाराज झाली. म्हणून त्यांनी ‘चले जाव’चा उठाव करण्याचे ठरवले. या संदर्भात ८ ऑगस्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक होण्यापूर्वी त्याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक ४ ऑगस्टला झाली.आपल्याला इंग्रजांनी धोका दिला या विषयावर ती बैठक होती.

Read More  तो लढा, ती जिद्द, ते नेते…१९४२ चा क्रांतीचा जयजयकार

आपण अहिंसक मार्गाने उद्या रस्त्यावर उतरू हेही विषय होते. परंतु याला बैठकीतील काही लोकांची सहमती झाली नाही. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. राजगोपालाचारी यांनी याच विषयाच्या संदर्भात पार्टी सोडली. त्यामुळे ४ ऑगस्टला झालेली बैठक निष्फळ झाली. त्यामुळे त्याच्याच चार दिवसांनी म्हणजे ८ ऑगस्टला परत बैठक भरली, तीही याच विषयावर.
या बैठकीतही हाच विषय होता. पण याही बैठकीत हिंदू महासभा, मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला.
त्यांचे म्हणणे होते की अहिंसक मार्गाने जरी आपण आंदोलन करीत असलो तरी इंग्रज आपल्याला सोडणार नाहीत.

ते आंदोलन दडपवून टाकण्यासाठी बळाचा वापर करतील, गोळ्या झाडतील. मग त्यात कित्येक भारतीय लोक मरतील. म्हणून हे आंदोलन नको. पण आंदोलन जर केले गेले नाही तर या देशातून इंग्रज कधीच जाणार नाहीत असे तत्कालीन भारतीय नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी काही संघटनांचा विरोध होऊनही आंदोलन छेडले. ८ ऑगस्टला प्रस्ताव पारित झाला व ९ ऑगस्टला आंदोलनाला सुरुवात झाली.

हे आंदोलन भारतीयांसाठी नवे नव्हते. यापूर्वीही दहा मे १८५७ ला देशात असेच आंदोलन झाले होते. तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. यात बहादुरशहा जफर, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई व तात्या टोपे यांचे विशेष योगदान आहे.तो इतिहास येथील भारतीयांना माहीत होता. तसेच तंट्या भिल्ल ऊर्फ भीमा नायक, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांना देश विसरला नव्हता. त्यांनी केलेले प्राणांचे बलिदान येथील भारतीयांच्या रक्तात होते.

Read More  माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन

१८५७ ते १९४२ पर्यंतचा इतिहास रक्तरंजितच होता. कित्येक भारतीय अहिंसक मार्गाने जरी इंग्रजांचा विरोध करीत असले तरी ते गोळ्या झेलत असत. सायमन कमिशनमध्ये लाला लजपतराय यांनी ‘सायमन गो बॅक’ म्हणत मिरवणूक काढताच त्यांना लाठीमार करून घायाळ केलं गेलं, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेतही तेच घडलं. म्हणून ८ ऑगस्टला झालेल्या बैठकीत प्रस्ताव पारित झाल्यानंतर ‘करो या मरो’ असा आदेश देत नेत्यांनी ‘चले जाव , भारत छोडो’चे आंदोलन छेडले. ही भारतीयांची इंग्रजांना एक चपराकच होती.

प्रस्ताव पारित होताच व उद्या आंदोलन छेडणार आहे हे माहीत होताच इंग्रजांनी येथील भारतीय नेत्यांना कैद केले. महात्माजींना पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये ठेवले. नेहरू तसेच इतर नेत्यांनाही पकडून देशातल्या वेगवेगळ्या तुरुंगांत ठेवले. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की, आता प्रत्येकजण नेता आहे. इंग्रजांना घाबरू नका. प्रतिकार करा. स्वत:ला स्वत:चा नेता समजा.

शेवटी ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या अहिंसक आंदोलनाला पांगविण्यासाठी इंग्रज सैनिकांनी निरपराध भारतीयांवर जालियनवाला बागेसारखा गोळीबार केला. त्यात निरपराध माणसे मरण पावली.कित्येक आंदोलन करणारी आणि न करणारीही. त्यामुळे चिडून जाऊन येथील भारतीय लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. कित्येक पोलिस ठाणे जाळले. सरकारी इमारती जाळल्या. कित्येक लोक भूमिगत झाले. यात कित्येक विद्यार्थीही शहीद झाले. जेव्हा ही घटना महात्मा गांधींना समजली तेव्हा त्यांनी तुरुंगातच एकवीस दिवसांचे उपोषण केले. त्यातच त्यांचे स्वास्थ्य बिघडले. त्यातच ते मरण पावतील व पुन्हा देशात रोष वाढेल याचा विचार करून इंग्रजांनी त्यांना १९४४ मध्ये तुरुंगातून सोडले.

Read More  लॉकडाऊन संपताच औशात तोबा गर्दी

या देशात हिंदू-मुस्लिम भांडणं नसताना इंग्रजांनी दोघांच्याही धर्म भावना भडकवून ज्या चाली चालल्या, त्या चालीतून भारत-पाकिस्तान बनले. तसेच अजूनही हा भारत-पाकिस्तान वाद भारतात धुमसतच आहे. काल काश्मीर वाद होता. आज सीमावाद आहे. अन् आम्ही भारतीय कालही आपापसांत लढत होतो. मी हिंदू, मी मुस्लिम म्हणत आजही लढतो. कोणत्याही देशात वाईट गोष्टी घडल्याच तर त्या ते ते धर्मीय मंडळी त्या-त्या धर्मांनीच केल्या असे भांडतो नव्हे तर या देशाच्या एकात्मतेला तोडण्याचे काम करतो.

एवढेच नाही तर या देशातील शांतता भंग करतो. नेत्यांच्या आश्वासनांत फसतो. नेत्यांबरोबर आपणही आपल्या महापुरुषांना शिव्या द्यायला लागतो. पण याचा विचार करीत नाही की त्या नेत्यांनी त्या काळात जे काही कार्य केले, ते अतुलनीय होते. ते नसते तर देश स्वतंत्रही झाला नसता. आपण गुलाम असतो इंग्रजांचे आणि आपली पिढीही गुलाम राहिली असती.देशाला स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते. कारण कालच्या नेत्यांत जी लढण्याची ताकद होती, ती आजच्या नेत्यांत दिसत नाही. हे नेते फक्त आश्वासनं देऊ शकतात, शिव्या हासडू शकतात.

-अंकुश शिंगाडे
मोबा.: ९९२३७ ४७४९२

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

चीनमधील शेनझेनस्थित झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन कंपनीकडून भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आदी राजकारणी व्यक्तींपासून प्रख्यात उद्योजक, न्यायसंस्था, संरक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र आदींमधील उच्च पदस्थ व्यक्तींवर पाळत...

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५०-३०० गॅ्रम भाजीपाला आहारात घेणे गरजेचा असतो आणि याकरिता आपण दैनंदीन गरजेकारिता भाजीबाजारातून भाजी खरेदी...

टीआरपी

‘जग कशावर चालतं,’ या प्रश्नाला ‘अन्नावर’ हे विश्वव्यापी उत्तर असलं, तरी आजकाल तसं कुणी म्हणत नाही आणि मान्यही करत नाही. कारण भूक विश्वव्यापी असली,...

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे...

जीन एडिटिंगचे धोके

कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून जन्माला आला हे अद्यापतरी पुराव्यानिशी सिद्ध झालेले नसले तरी या दाव्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही. या प्रकारामुळे...

मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या खडूस कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३व्या पर्वात अबूधाबी येथील पाचव्या सामन्यात बुधवारी कोलकता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी...

आर्थिक घसरण आणि पर्यावरण

अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत असतानाच पर्यावरण संरक्षणाच्या चळवळी आणि अन्य प्रयत्न गतिमान असतात. अर्थव्यवस्था मंदावल्यानंतर लोक आत्मसंरक्षणाला प्राधान्य देतात आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. सरकारला हे दोन...

मराठा आरक्षणासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागेल

दिनांक ९ जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत, हे प्रकरण स्वतंत्र खंडपीठाकडे सुनावणीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. मा.न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मागील एक...

षटकारांची आतषबाजी

शारजाच्या छोटया मैदानाचा फायदा घेत फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वातील चौथ्या सामन्यात राजस्थानने तगड्या चेन्नई संघाचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा...

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...