20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष गीतकार साहीर लुधियानवी

गीतकार साहीर लुधियानवी

एकमत ऑनलाईन

साहीर लुधियानवी… एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम आहे.

‘जीवन के सफर में राही,
मिलते है बिछड जाने को…’

असे जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारे साहीर वयाच्या अवघ्या ५९ व्या वर्षी हे जग सोडून गेले. साहीर यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे जमीनदार कुटुंबात झाला. माता-पित्याला एकुलते एक असल्याने साहीर यांचे पालनपोषण मोठ्या लाडात झाले. त्यांच्या वडिलांचे नाव चौधरी फजल महंमद तर आईचे सरदार बेगम. साहीर यांचे मूळ नाव अब्दुल असून साहीर लुधियानवी या नावाने ते सा-या जगात ओळखले गेले. खालसा हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी साहीर लाहोर येथे आले. मात्र पुढे परिस्थितीनुसार बी.ए. चे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना नोकरी धरावी लागली. त्यांच्या जीवनातील संघर्षाला येथूनच प्रारंभ झाला. विद्यार्थिदशेतच शायरी, गझल, गीतलेखनाचा छंद साहीर यांना जडला. ‘अदब-ए-लतीफ’ आणि ‘शाहकट’ या दोन वृत्तपत्रांचे ते संपादक बनले.

‘आजादी की राह पर’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा गाणी लिहिली. परंतु ‘नौजवान’ चित्रपटातील ‘ठंडी हवायें, लहराके आये… ’ या संगीतकार सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतापासून खूप प्रसिद्ध झाले. स्व. गुरुदत्तच्या ‘बाजी’ या चित्रपटातील गाण्यांनी साहीरला खूप लोकप्रिय बनवले. ‘तसवीर से बिगडी हुई, तकदीर बनाले…’ या त्यांच्या गाण्याप्रमाणे त्यांचे भाग्यही उजळून आले. ख-या अर्थाने जीवनाची बाजीच त्यांनी मारली.
शेरो शायरी करणे हा तर साहीरचा जन्मजात पिंड होता.

‘तुम मेरे लिये अब कोई इल्जाम न ढुंढो
चाहा था तुम्हे, यही इल्जाम बहुत है’

प्रेमभंग झालेल्या अयशस्वी युवकाचे मनोगत सांगताना हा दर्दिला शायर म्हणतो.

‘अपनी तबाहियों का, मुझे कोई गम नही
तुमने किसी के साथ, मोहब्बत निगाह तो दी’
शायरी आणि गझल हा प्रकार साहीर यांनी कौशल्यपूर्ण हाताळला.
‘कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया
बात निकली तो हर इक बात पे रोना आया’

‘फुटपाथ’ या चित्रपटातील ‘शामे गम की कसम…’, किंवा ‘गुमराह’मधील ‘आप आये तो खयाले दिल…‘ ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम…’ यासारख्या गझला आजही अजरामर आहेत. ‘गझल’ या चित्रपटातील स्व. महंमद रफींनी गायिलेली ‘रंग और रूप की बारात किसे पेश करूँ’ साहीरच्या काव्यसंपदेचा परिचय करून देणारी आहे. ‘लागा चुनरी में दाग…’ यासारखी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणीही ते समर्थपणे लिहित. ‘लागा चुनरी में दाग’ या गाण्यातील रूपकात्मक जीवनाचे तत्त्वज्ञान प्रशंसनीय आहे. ‘चित्रलेखा’तील ‘मन रे तू काहे ना धीर धरे…’, ‘कभी कभी’ या चित्रपटातील ‘मै पल दो पल का शायर हूँ’ आदी गाणी खूपच लोकप्रिय झाली. दुनियादारीबद्दल ‘एक चेहरे पे कई चेहरे लगालेते है लोग’(दाग) असे म्हणणारा शायर ‘दुखी मन मेरे, सुन मेरा कहना’ (फंटूश) म्हणून आपल्या उदास मनाला सांत्वना देतो. निसर्गाबद्दल विलक्षण ओढ असल्याने ‘निले गगन के तले…’ , ‘इन हवाओं में..’ , ‘जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात…’ अशी दर्जेदार गाणी लिहिली आपल्या शायरीतून प्रेम, दु:ख, वेदना समाजाविषयी अभिव्यक्ती, दारिद्र्य नि गरिबीविरुद्धचा संघर्ष असे अनेक विषय साहीरनी आपल्या लेखणीतून चितारले. मौलिक अर्थाने ते रोमँटिक शायर होते.

‘मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी कभी’(आँखे, ‘ये आँखे देखकर..’ (धनवान), ‘हाथों में किताब बालों में गुलाब, करना है आज इसका हिसाब…’ इत्यादी गाण्यांतून त्यांच्या अल्लड रोमँटिक मनाचे दर्शन झाल्याशिवाय रहात नाही. ‘तोरा मन दर्पण कहलाये…’ (काजल) , ‘हे रोम रोम में बसनेवाले राम’ (नील कमल) यासारख्या अनेक गीतांतून त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन घडविले. ‘ये देश है वीर जवानों का, मस्तानों का….’ या भांगडा गीताच्या माध्यमाने देशप्रेम, आपल्या संस्कृतीचा अभिमान प्रतित होतो. स्त्रियांबद्दल नितांत आदर बाळगणारा हा शायर ‘औरत ने जनम दिया मर्दों को …’ किंवा ‘लोग औरत को फखत जिस्म समझ लेते है, रूह भी होती है उसमें कहाँ सोचते है’ असे परखड कटू सत्य निर्भीडपणे मांडून आपला निषेध नोंदवताना दिसतो. श्रमिक, कामगार, शेतकरी यांच्याविषयी बरीच आस्था साहीरच्या काव्यातून दिसून येते.

आज से ऐ किसानों
मेरे राग तुम्हारे है
आज से मेरे फन का मक्सद
जंजिरे पिघलाना है
आज मै शबनम के
बदले अंगार बरसाऊंगा

अशी विद्रोही भूमिका स्वीकारण्यात पण साहीर
तयार होत असत. जीवनातील विविध चढ-उतार रंगवणारा हा अफलातून शायर शेवटपर्यंत अविवाहित राहिला. ‘परछाईयां’, ‘गाता जाये बंजारा’, ‘आओ कोई ख्वाब बुने’ इत्यादी कवितासंग्रहांना चाहत्यांनी डोक्यावर घेतले. भारत सरकारने साहीर लुधियानवी यांना त्यांच्या काव्य प्रांतातील मौलिक सेवेबद्दल ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. ‘आओ ख्वाब बुने’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला अ‍ॅवॉर्ड मिळाले. उर्दू अकादमी तसेच महाराष्ट्र राज्यातर्फेही पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया,
हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया’

अशी व्यथा मांडणारे साहीर एका शेरमधून आपला अनुभव सांगताना म्हणतात-

देखा है जिंदगी को कुछ इतने करीब से
चेहरे तमाम लगने लगे है अजीब से’
जीवनातील सूक्ष्म निरीक्षण आपल्या काव्यातून
प्रकट करताना साहीर शेर पेश करतो.
‘कौन रोता है किसी और की खातीर ऐ दोस्त
सब को अपनी ही किसी बात पे रोना आया’

असा हा प्रतिभासंपन्न दर्दिला शायर २५ ऑक्टोबर १९८० रोजी हे जग सोडून गेला. आज साहीर लुधियानवी आपल्यात नसले तरी काव्यरूपाने ते साहित्य नि संगीत क्षेत्रात अमर आहेत. त्यांचे साहित्य चिरकाल स्मरणीय राहील यात वादच नाही.

‘तुम न जाने, किस जहां में खो गये’
हे साहीर यांचे शब्द त्यांना श्रद्धांजली देताना आठवतात.
‘जीवन के सफर में राही मिलते है बिछड जाने को…’ असे अजरामर गीत लिहिणारे गीतकार साहीर लुधियानवी यांना विनम्र अभिवादन!

-शांतिलाल शर्मा
शारदानगर, लातूर
मोबा : ९२२६७४९८९३

पुढील काही महिने धोक्याचे – डब्ल्यूएचओ इशारा

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...