24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeविशेषमहानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य

महानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य

एकमत ऑनलाईन

भारतीय असंतोषाचे जनक आणि प्रकाण्ड पंडित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १००व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना लोकमान्यांचा स्फूर्तिदायी जीवनपट मन:चक्षूसमोरून सतत सरकत राहणे स्वाभाविकच आहे. सर्वसामान्य माणसे एका आयुष्यात एक जीवन जगत असतात, तेही पुरेपूर जगणे आणि त्याला न्याय देणे सा-यांना जमतेच असे नाही; पण लोकमान्य टिळक आपल्या ६४ वर्षांच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक जीवन जगले आणि त्याला त्यांनी यथोचित न्यायही दिला. एकाच वेळी ज्योतिर्विद्या, पत्रकारिता, समाज सुधारणा, भारतीय तत्त्वज्ञान, स्वातंत्र्यलढा या आणि अशा अनेक आयुष्यांसाठी टिळकांनी स्वत:ला झोकून दिले आणि या क्षेत्रांवर आपला निर्भेळ आणि कायमचा ठसाही उमटवला.

अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढणा-या आणि जिंकणा-या टिळकांच्या आयुष्यात त्यांची ह्यकेसरीह्ण आणि ह्यमराठाह्ण या दोन राष्टÑीय वृत्तपत्रांच्या माध्यमांतून बहरलेली पत्रकारिता आणि त्यातील जाज्वल्य अग्रलेखांमुळे त्यांना झालेली मंडालेची सहा वर्षांची सजा, हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा. मंडालेहून १९१४ साली सुटून बाहेर आल्यानंतर टिळकांची मानसिकता आमूलाग्र बदललेली होती. सहा वर्षे थंड पडलेली स्वराज्याची मोहीम आणि केसरी या दोघांचीही पुनर्स्थापना करताना पुनश्च हरिओमचा मंत्र तर त्यांनी जागवलाच; शिवाय प्रकृती साथ देत नसतानाही देशव्यापी दौरे केले आणि पुढे होमरूलची चळवळ करून भारतीय कायदेमंडळाच्या स्थापनेची मुहूर्तमेढही रोवली.

मंडालेतील वास्तव्याच्या काळातच टिळकांच्या धर्मपत्नी सरस्वतीबाई यांचे निधन झाले. त्यामुळे टिळक खिन्न झाले खरे, पण त्याच वेळी त्यांनी भारतातून गीता, तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र या विषयावरील ग्रंथ मागवून गीतेवरील टीका लिहून काढली. गीता हा ग्रंथ जितका अलौकिक तितकाच टिळकांनी त्यावर केलेल्या भाष्याचा गीतारहस्य हा गं्रथही अद्वितीय मानावा लागेल. लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका होऊन ते पुण्याला परतले. पुण्यतिथीनिमित्त टिळकांच्या जीवनातील मंडालेतील दिवसांचे, विशेषत: त्यांच्या गीतारहस्याचे आणि या ग्रंथाच्या आजच्या जीवनातील महत्त्वाचे स्मरण करणे अधिक उचित ठरते.

Read More  जन्मशताब्दी विशेष : धगधगती मशाल!

अत्यंत विमनस्क अवस्थेत टिळकांनी दूर मंडालेतील तुरुंगाच्या गजाआड कोठडीत बसून या ग्रंथाची निर्मिती केली.
मोरोपंतांच्या कृतान्तकटकाऽमल-ध्वज जरा दिसतो लागली।
पुर:सर गदांदवें झगडतां तनु भागली॥..

या चरणांचे स्मरण टिळकांनाही होत होते. तरी आपल्या विषण्ण मानसिकतेचे आणि विशेषत: मनात रुंजी घालू लागलेल्या विरक्तीचे अजिबात दर्शन आपल्या लिखाणात येऊ न देता उलट गीतेतील कर्मयोगाकडे भारतीयांचे लक्ष आकृष्ट करण्याचा टिळकांचा मनोदय विलक्षण मानावा लागेल. आपला उद्देश वाचकांपर्यंत ठळकपणे पोहोचावा, या उद्देशानेच त्यांनी या ग्रंथाचे नामकरण ह्यगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्रह्ण असे केले. गीतेचे निरुपण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ह्यज्ञानेश्वरीह्णची रचना केलीच, शिवाय बाबू अरविंद घोष, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, एस. राधाकृष्णन, ओशो रजनीश यांनीही गीतेवर भाष्य केले. असे असले, तरी लोकमान्यांच्या ह्यगीतारहस्यचे स्थान एकमेवाद्वितीय असेच आहे.

यत्करोषि यद्श्रषि यज्जुषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरूष्व मदर्पणम्॥
शुभाशुभफलैरेवं मांक्ष्यसेकर्मबन्धनै:।
सन्यासयोगयत्कात्मा विमुतो मामुपैष्यसि॥

कुरुक्षेत्रावर रणभूमीवर उभ्या ठाकलेल्या अर्जुनाला उपदेश करून लढाईसाठी सिद्ध करताना भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की, तू जे काही करतोस, ते सारे काही स्वत:साठी न करता, तू ते मला अर्पण कर, म्हणजे त्याच्या भल्या-बु-या परिणामांना तू जबाबदार न राहता मुक्त होऊन माझ्यात म्हणजेच ब्रह्मांडात सामावून जाशील. केवळ दोन श्लोकांतून महर्षि व्यासांनी मोक्षाचा मार्ग दाखवला. हा विचार टिळकांना हृद्य आणि आश्वासक वाटल्यानेच त्यांनी तो सामान्यांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने गीतारहस्य लिहिण्याचा प्रपंच आरंभला आणि तो पूर्णही केला. त्यामुळेच गीतेच्या निरुपणाचा भर निष्काम कर्मयोगावर आहे.

Read More  संपादकीय : आपला तो बाळ्या ..??

गीतेच्या १८ अध्यायांतील अनेक जटील प्रमेये उलगडण्याचे काम जसे संत ज्ञानेश्वरांनी केले, तसेच टिळकांनीही केले. फरक इतकाच की, चौदाव्या शतकातील यवनांच्या आक्रमणांमुळे आणि त्यांच्या सैनिकांनी केलेल्या अत्याचारांमुळे गांजलेल्या आणि निरर्थक धार्मिक रूढींमुळे पिचलेल्या अशिक्षित गावक-यांना जीवनाचा अर्थ समजावून सांगून त्यांना स्वत्वाविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने ज्ञानेश्वरांनी गीतेचे प्रथमच प्राकृतात निरुपण करून तत्कालीन धर्ममार्तंड आणि संस्कृत भाषाभिमान्यांविरुद्ध बंडखोरी केली, तर टिळकांनी थंड मातीचा गोळा होऊन पडलेल्या आणि ब्रिटिश सरकारचे अत्याचार ह्यपूूर्वजन्मीचे फलित म्हणून स्वीकारणा-या स्वकीयांना गीतेतील कर्मवादाचे दर्शन घडवून त्यांच्यात असंतोषाची ठिणगी पेटवली.

टिळकांचा गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अन्य तत्त्ववेत्त्यांपेक्षा बराच वेगळा, नव्हे त्यांच्या विचारांना छेद देणारा आहे. हा बुद्धिप्रामाण्यवाद जपताना टिळकांनी केवळ आपल्या विद्वत्तेच्या सामर्थ्यावर अनेक प्रमेयांची उत्तरे वेगळ्या वाटेने शोधली आणि अनेकदा सिद्धतेचे संकेतही बदलले आणि आपले बदल सिद्धही केले. इतके खोलवरचे चिंतन करताना टिळकांनी कमालीचा आत्मसंयम आणि आत्मभान राखले. ते म्हणतात, ह्यमोक्ष आणि नीती-धर्म यांची तत्त्वे गहन असून, त्यासंबंधाने अनेक प्राचीन आणि अर्वाचीन पंडितांनी इतके विस्तृत विवेचन केले आहे की, फाजील संचार होऊ न देता त्यातील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथात घ्याव्या याचा योग्य निर्णय करणे पुष्कळदा कठीण पडते. ५७५ पानांच्या या साक्षात ग्रंथराजाला टिळकांनी लहानसाण म्हटले. ज्ञानामुळे आलेली ही विनम्रता.

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्।
यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो व्रिद्धि मामकम्॥

असे ज्ञानाचे आणि तेजाचे महत्त्व गीता विशद करते. या ज्ञानप्रकाशाने टिळकांना मोहित केले.गीतेचा प्रवास अज्ञाताकडून ज्ञाताकडे नेणारा असल्याने श्री शंकराचार्यांनी गीतेला शास्त्र असे संबोधले. ज्ञानेश्वर तत्त्ववेत्ते होते. त्यांनी गीतेचे वर्णन अध्यात्मशास्त्र असे केले. ज्ञानेश्वर प्रत्येक संज्ञा तोलून मापून वापरत. अध्यात्म या संज्ञेची फोड करायची, तर अधि म्हणजे आत आणि आत्म म्हणजे स्तव म्हणजे स्वत:विषयी आतले ज्ञान आणि त्याचे शास्त्र ते अध्यात्म. टिळकांनी गीतेतील अध्यात्माच्या अंगाचा विचार करताना वेद, उपनिषदे, ऋचा आणि त्यावरील संहिता या सा-यांचा धांडोळा गीतारहस्यात घेतला.

Read More  लातुरात पुनश्च लॉकडाऊन

गीतारहस्य रचताना टिळकांनी अनेक रूढ संज्ञा आणि प्रमेयांच्या सिद्धता आणि व्याख्याही बदलल्या, असे मागे म्हटले आहेच. ह्यकर्मह्णया संज्ञेबाबतही असेच आहे. कर्माच्या विविध अंगांविषयी गीतेत ठायीठायी मतप्रदर्शन आहे. ते कधी तर्कट वाटते, तरी या तर्कांच्या पलिकडला त्याचा अर्थ मानवतेच्या हिताचा आहे. ह्यगीतारहस्यह्णमध्ये टिळकांनी या श्लोकांमागील रहस्य प्रयत्नपूर्वक धुंडाळले आणि तर्काच्या कसोटीवर त्याची परीक्षा घेत, ते वाचकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच गीतेवरील आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ भाष्यांमध्ये गीतारहस्यला स्थान मिळते.

यस्य सर्वे समारम्भा: कामसंकल्पवर्जित:।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा:॥

(ज्याचे सर्व उद्योग फलेच्छेपासून दूर असतात, त्यालाच ज्ञानाग्नीचे दुग्ध झालेला पंडित असे ज्ञाते पुरुष संबोधतात) या गीतेतील प्रसिद्ध श्लोकाच्या सिद्धान्तालाही टिळकांनी असेच बुद्धिप्रामाण्यवादी आव्हान दिले. ह्यज्ञानाने कर्मे भस्म होतात याचा अर्थ कर्मे सोडणे असा नसून फलेच्छा सोडून कर्मे करणे असा समजायचा,असे टिळकांनी गीतारहस्यमध्ये म्हटले. गीतेतील वैराग्य कर्मयोग किती उदात्त आहे, याचे दर्शन गीतारहस्यमधील तर्कशुद्ध विवेचनातून घडते. टिळकांना आपले ईप्सित कार्य बाजूला ठेवून मंडालेचा तुरुंगवास भोगावा लागला, हे वाईटच. त्यामुळे भारतीय स्वराज्य चळवळ खोळंबली. टिळकांची प्रकृती कायमची ढासळली. पण वाईटातून चांगले असे निघाले की, गीतारहस्यनामक अद्भूत ग्रंथाची निर्मिती झाली आणि मानवतेला ज्ञानाचा चिरंतन ठेवाही लाभला.

डॉ. भारतकुमार राऊत
ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या