22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषआंबा रस - फायदे

आंबा रस – फायदे

एकमत ऑनलाईन

फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा त्याच्या आंबट-गोड चवीमुळे व रसाळ गुणधर्मामुळे अगदी सर्वांना (अबाल वृध्दांना) अत्यंत लोकप्रिय व आवडता असणारा आहे. आंब्याच्या जाती व प्रकार अनेक असल्यामुळे प्रत्येक फळाचा आकार, चव आणि रंगामध्ये थोडा फार बदल झालेला असतो. आंबा किंवा त्याचा रस आपल्या शरीराला अत्यंत हितकारक असतो. त्यामुळे आहार आणि औषधी या दोन्ही बाबतीत आंबा बहुमोल असणारा आहे. असे म्हणतात की नेहमी फक्त ताजाच आंबा खावा. त्यातही आंब्याच्या फोडी कापून खाण्यापेक्षा आंब्याचा रस हे एक चवदार पेय असून अनेक महत्वाच्या खनिजासह व अनेक उपयुक्त जीवनसत्वासह आपल्या शरीराला तृप्त करतो.

एवढेच नाही तर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. आंब्यापासून तयार केलेली चटणी आणि लोणचे अत्यंत लोकप्रिय असलेले पदार्थ आहेत. याशिवाय आंब्यापासून जाम, जेली, स्कॅश, मेरीनेडस, लस्सी, तक्कू ही खाद्य पदार्थआणि मसालेचे पदार्थ सुध्दा तयार केली जातात. त्याचबरोबर आंब्याचे सरबत, मँगोशॉट, मँगोमाहितो आणि उकडलेल्या कैरीचे पन्हे यासारखी पेये तयार करून लोक आवaडीने पितात. आंबा हा अत्यंत चविष्ट आणि लज्जतदार असल्याने सर्वांना आवडतो. त्याचबरोबर त्यातील पौष्टिक पोषण मुल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते म्हणून आंब्याला सर्वांची पसंती असते. उपयोग : ४ अशक्तपणा : आंब्याच्या रसामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणाची समस्या असलेल्या लोकांसाठी आंब्याचा रस फायदेशिर असतो. नियमित व नियंत्रीत सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशीची संख्या वाढते त्यामुळे अशक्तपणा कमी होतो व तसेच हिमोग्लोबीन पातळी वाढते. प्रामुख्याने महिलांसाठी अशक्तपणा कमी करण्यासाठी आंब्याचा रस रामबाण उपाय आहे.

४ पचन क्रिया : आंब्याच्या रसामध्ये पोषक घटकांच्या स्वरूपात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. ज्यामुळे पचनशक्ती वाढून पचन क्रिया सुरळीत होते. तंतुमय पदार्थामुळे आपले पोट स्वच्छ राहते व मल हळुहळु पुढे सरकतो. तसेच यातील पाचक एन्झाईममुळे प्रथिनांचे विघटन होण्यास फायदा होतो. त्याचबरोबर या रसातील सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, टार्टरिक आम्ल असतात. त्यामुळे आल्कधर्मी पातळी सामान्य राहते व पचन चांगल्या प्रकारे होते. ४ कर्क रोग : कर्करोग हा अत्यंत गंभीर आजार समजला जातो. यावर उपाय म्हणून आंब्याचा रस उपयोगी आहे. आंब्याच्या रसामध्ये एस्कॉबींक आम्ल, कॅरोटिनॉईडस, टरपेनॉईडस आणि पॉलिफेनॉल असतात. तसेच या मध्ये चांगले अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात जे कर्करोगविरोधी प्रभाव दाखवतात तसेच आंब्यामुळे आतडे, स्तन आणि प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोगापासून बचाव होतो तसेच यातील कॅरोटिनमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून सुध्दा बचाव होतो.

४ हृदयविकार : आंब्याचा रस हृदयाच्या आजारावर महत्वपूर्ण औषधी आहे. आंब्याच्या रसामध्ये जीवनसत्व क, जीवनसत्व-ई आणि जीवनसत्व-ब-६ भरपूर प्रमाणात असतात. यातील जीवनसत्व-क मुळे आपल्या शरीरातील अपायकारक असणा-या रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता वाढते. व तसेच जीवनसत्व-ब-६ मुळे रक्तातील होमोसेस्टीन चा स्तर संतुलीत राहतो व त्यामुळे हृदयाचे विविध आजार होण्याचा धोका कमी होतो त्यासाठी आंबा किंवा त्याच्या रसाचे सेवन हृदयासाठी गरजेचे आहे. ४वजन वाढ : अनेक व्यक्तीचे वजन फारच कमी असते त्यामुळे त्याचा काम करण्याचा उत्साह कमी होतो. आंबा खाणे किंवा आंब्याचा रस सेवन करणे हा वजन वाढविण्याचा सर्वात सोपा आणि सहज करता येण्यासारखा उपाय आहे. आंब्याचा रसामध्ये पिष्टमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात जे सेवन केल्याने साखरेमध्ये बदलतात ज्यामुळे वजन वाढण्यास फायदा होतो. तसेच आंब्याचा मिल्कशेक करून सेवन करावे ज्यामध्ये साखर व दुधातील चरबीत प्रथिने असतात जे वजन वाढण्यास गती देऊ शकतात.

४ मेंदुचे आरोग्य : पिकलेला आंबा किंवा त्याचा रस जीवनसत्व-ब-६, फोलेट आणि लोहाचे उत्तम स्रोत आहे. जी मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व कार्य सुधारण्यासाठी पोषक तत्वे आहेत. आपल्या आहारात आंब्याच्या रसाचा समावेश केल्याने मज्जा तंतुचे कार्य सुधारते तसेच आंब्यातील ग्लुटामाईनमुळे आपल्या मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढू शकते.
४ डोळ्याचे आरोग्य : डोळा हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. आंब्याच्या रसामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो. आंबा किंवा त्याचा रस बीटा- कॅरोटिन आणि जीवनसत्व-अ ने समृध्द असलेला आहे. जे डोळ्यांना ओलावा प्रदान करतात व रात्रीचे अंधत्व टाळण्यास मदत करतात. तसेच अ जीवनसत्वामुळे डोळे लाल होणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे या समस्या कमी होतात त्यासाठी रोजच्या आहारात आंब्याचा समावेश करावा.

४रक्ताल्पता:- शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यास अनिमिया यासारखा आजार होऊन अशक्तपणा येतो व कोणत्याही कामासाठी उत्साह राहत नाही. आंबा किंवा त्याचा रस लोहाने समृध्द असलेला आहे. ज्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. तसेच यातील जीवनसत्व-क मुळे पौष्टिक घटक मिळतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ४ उष्माघात :- प्रामुख्याने उन्हाळयाच्या दिवसात प्रखर उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्मघाताचा त्रास होतो आणि नेमका याच मोसमात आंबा उपलब्ध असतो. ज्यामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. आंब्याच्या रसात जीवनसत्वे आणि खनिजाचा साठा विपूल प्रमाणात असतो. ज्यामुळे आपल्या शरीराला ओलावा मिळतो व उष्माघातापासून बचाव होण्यास फायदा होतो. १३) त्वचेच्या समस्या : आंब्याच्या रसामध्ये जीवनसत्व-अ भरपूर प्रमाणात असते जे आपल्या त्वचेचा चांगला मित्र समजला जातो. ज्यामुळे आपल्या चेह-यावरील सुरकुत्या करण्यास मदत करते. त्यामुळे अकाली वृध्दत्व येत नाही. तसेच त्यातील जीवनसत्व-क मुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते कारण त्यामुळे कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळते. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या