22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeविशेषसाखर कारखानदारीला दिशादर्शक मांजरा कारखाना

साखर कारखानदारीला दिशादर्शक मांजरा कारखाना

एकमत ऑनलाईन

मराठवाडा म्हटले की मागास भाग असे म्हटले जाते. हे वाक्य ३० वर्षांपूर्वीही म्हटले जायचे. त्यात लातूर म्हटले की नद्या, पाणी, शेती उत्तम, उद्योग नाही नगदी पीक मिळायचे सोर्स नाहीत. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, संस्थापक लोकनेते विलासराव देशमुख यांनी ३५ वर्षांपूर्वी उजाड माळरानावर मांजरा साखर कारखाना उभा केला. हा अद्वितीय विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना दीपस्तंभासारखा उभा आहे. या साखर कारखान्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने उभे राहिले.

त्याला दिशा देण्याचे काम लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने केले असून चालू वर्षाच्या २०२१-२२ च्या हंगामात साखर कारखान्याने मागचे सर्व गाळप कामगिरीचे रेकॉर्ड तोडून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. यावर्षी चालू हंगामात साखर कारखान्याने ८ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून ८ लाख ९० हजार क्विंटल साखर उत्पादन केले असून कारखान्याने एफआरपीप्रमाणे २,६५६ रुपये मेट्रिक टन प्रमाणे तब्बल २२८ कोटी ५६ लाख रुपये ऊस उत्पादक शेतक-यांना दिले आहेत तसेच कारखान्याचे को-जन विभागाकडून ४ कोटी ९० लाख ७८ हजार ५० युनिट वीज महावितरण कंपनीकडे निर्यात केली आहे तर अर्कशाळा विभागाने १ कोटी १ लाख ३४ हजार १४८ लिटर अल्कोहल व ८३ लाख ३९ हजार १८८ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेऊन आतापर्यंत कारखान्याने केलेल्या सर्व गाळप हंगामांचा विक्रम मोडीत काढून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा साखर कारखान्याची घोडदौड सुरू आहे. मराठवाड्यातील सहकारी साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम याच विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने केले आह.े

अवर्षण परिस्थिती, अतिरिक्त ऊस मात्र अचूक कामगिरी
यावर्षी चालू हंगामात उसाची अतिरिक्त लागवड, पावसाचे थैमान, आदी संकटे समोर असताना कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी गाळप हंगामात सर्व उसाचे गाळप व्हायला पाहिजे याची व्यूहरचना केली. अतिशय काटेकोर पालन करण्यासाठी कारखाना प्रशासन, ऊस तोडणी, कामगार, कृषि विभाग, अधिकारी, कर्मचारी यांना सूचना दिल्या. तात्काळ सूचनांचे पालन करत कार्यक्षेत्रातील सर्व ऊसउत्पादक शेतक-यांच्या उसाचे गाळप करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उसाचे टिपरू शिल्लक राहणार नाही असा शब्द जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी चाकूर येथील कार्यक्रमात दिला होता. तो साखर कारखान्याने पाळला आहे.

मराठवाड्यात उसतोडणी यंत्राची सुरुवात केली
दरवर्षी ऊसतोड कामगारांची कमतरता लक्षात घेऊन माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख साहेब यांनी पहिल्यांदा गेल्या वर्षी मराठवाड्यात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने ऊस तोडणी यंत्राची सुरुवात केली. कारखान्याने १३ ऊस तोडणी यंत्रांचे वाटप केले होते मात्र ते ही कमी पडत असल्याने ऊस गाळप लवकर व्हावे यासाठी साहेबांनी बाहेरून ऊस तोडणी यंत्र मागवून चालू वर्षात कार्यक्षेत्रातील उसाचे विक्रमी गाळप करून मांजरा साखर कारखान्याने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे

दिलीपराव देशमुख साहेबांचे दूरदर्शी निर्णय एक पाऊल पुढे
यावर्षी चालू हंगामात उसाची अतिरिक्त लागवड झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील हंगामात अडचण होऊ नये यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ३० ऊस तोडणी यंत्रांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसेच गाळप क्षमतेत वाढ करून ४,७५० टीसीडी वरून ७,५०० टीसीडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची कार्यवाही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रनवरे, सन्माननीय संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यामुळे मराठवाड्यातील साखर कारखानदारीला दिशा मिळाली
मराठवाड्यात लातूर येथे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी ३५ वर्षांपूर्वी मांजरा साखर कारखाना उभा केला. तो दीपस्तंभासारखा उभा आहे. त्यांच्या प्रेरणेने माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा परिवारात रेणा, विलास, जागृती, मारुती, विलास २, ट्वेंटी वन शुगर साखर कारखाने उभे राहिले. नुसते उभे राहिले नाहीत तर त्यातून जिल्ह्यात सहकार चळवळ टिकवून ठेवली. दरवर्षी या साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना १५०० ते १८०० कोटी रुपये मिळत आहेत. तो पैसा बाजारात फिरत आहे. विकासाला चालना देण्यासाठी या मांजरा साखर परिवाराचा मोठा सहभाग राहिलेला आहे.

-हरिराम कुलकर्णी, लातूर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या