29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home विशेष मार्केटफ्रेंडली अर्थसंकल्प

मार्केटफ्रेंडली अर्थसंकल्प

एकमत ऑनलाईन

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या नव्या दशकातील पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचे वर्णन ‘बाजारस्रेही’ असे करावे लागेल. याचे कारण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर होणा-या या बजेटकडून शेअर बाजाराला असणा-या बहुतांश अपेक्षांची पूर्तता झाली आहे. त्यामुळेच गेल्या दोन सत्रांत झालेल्या प्रचंड मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक तितक्याच वेगाने झेपावताना दिसला.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणताही नवा कर केंद्र सरकारकडून लावण्यात आलेला नाही. पेट्रोल-डिझेलवर सेस लावण्यात आलेला असला तरी त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार नाहीये. अर्थसंकल्पाचा एकंदर लसावि पाहिल्यास सरकारने वित्तीय तुटीची पर्वा न करता कोविड संकटातून सावरण्यासाठी आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेली संधी साधण्यासाठी अधिक खर्चावर भर दिला आहे. या खर्चाचे केंद्रस्थान हे पायाभूत सुविधांचे क्षेत्र असल्याने त्यातून रोजगारनिर्मितीलाही आपसूकच हातभार लागणार आहे. तसेच मेक इन इंडियाकडून सरकारने आता असेंब्ल इन इंडियाकडे वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. दुसरीकडे, एलआयसी, बीपीसीएलसह, आयडीबीआयसह दोन सरकारी बँका यांच्या खासगीकरणाला चालना देण्याबाबतचा सरकारचा निर्धार अर्थमंत्र्यांनी प्रकट केल्याने बाजारात मोठा उत्साह दिसून आला.

आरोग्यसेवांसाठीची भरीव तरतूद, निर्गुंतवणुकसाठीचे १.७५ लाख कोटींचे लक्ष, विम्याच्या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकची वाढवलेली मर्यादा, टॅक्स ऑडिटसाठीची वाढवलेली मर्यादा, परवडणा-या घरांसाठीची वाढवलेली सवलत मर्यादा यांसारख्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारांत मोठा उत्साह पाहायला मिळाला. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठीच्या या सुधारणा करताना, खर्च वाढवताना नवा कर न लादता सरकारने खासगीकरणाबरोबरच विविध सरकारी मालमत्तांची मोजणी करुन त्यांच्या विक्रला प्राधान्य दिल्याचे दिसते, ही बाब खूप महत्त्वाची आहे. २०२१-२२ साठीचे हे अंदाजपत्रक दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे असल्याने शेअर बाजार येणा-या काळात नव्या उंचीवर जाईल, यात शंका नाही. असे असले तरी मध्यमवर्गीयांना अपेक्षित असलेली आयकर सवलत आणि पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला ज्या दिलाशाची अपेक्षा होती ती न मिळाल्याची खंत आहे. पण एकूणात पाहता दूरदर्शी अर्थसंकल्प असल्याने गुंतवणूकदारांत आनंदोत्सव साजरा होणे अपेक्षितच होते
– संदीप पाटील

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा शुभारंभ, तर संघटित कामगारांसाठी पोर्टल सुरु करणार : अर्थमंत्री

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या