20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष ‘विजयोत्सवा’चा भावार्थ

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

दसरा हे देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. एकता, बंधुभाव आणि सत्यमेव जयते हा संदेश दसरा देतो. प्रादेशिक विविधता असूनसुद्धा हा सण संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. देशभरात जागोजागी दस-याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. प्रभू रामचंद्रांचा आदर्श आत्मसात करणे आणि आपल्या इंद्रियांवर, दुष्प्रवृत्तींवर विजय मिळविणे हाच यामागील उद्देश असतो. या दिवशी आत्मचिंतन करून आपल्यातील दोष शोधून आपल्यातील रावणाचा विनाश केला, तरच दस-याचा सण ख-या अर्थाने साजरा केला असे होईल.

एकमत ऑनलाईन

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून हा शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ ‘घेऊन जाणे’ असा आहे. अशा प्रकारे दशहरा या शब्दाचा मूळ अर्थ दहा अवगुण घेऊन जाणे असा असून, या दिवशी आपल्या आतील दहा दोष किंवा अवगुण नष्ट करण्याचा संकल्प करायचा असतो. वस्तुत: प्रत्येक मनुष्याच्या आत रावणरूपी अनेक दोष असतात आणि या सर्व दोषांवर एकाच वेळी विजय प्राप्त करणे शक्यही नसते. त्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर अशाच काही दोषांचा नाश करण्याचा संकल्प करण्यातच या पर्वाचे सार्थक असते.

प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळविलेल्या विजयाचे तसेच दुर्गादेवीने महिषासुर आणि चंड-मुंड या महाबलशाली राक्षसांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. चांगुलपणाचा वाईटावर विजय, सत्याचा असत्यावर विजय असाच या घटनांचा अर्थ घेतला जातो. रावणाचा वध करण्यासाठी याच दिवशी श्रीरामांनी प्रस्थान ठेवले होते, असे मानले जाते. हिंदू राजे याच दिवशी विजयासाठी प्रस्थान ठेवत होते, असे स्पष्ट करणारे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. या दिवशी अपराजिता देवीचीही पूजा केली जाते. श्रीरामांनी समुद्रतटावर सर्वप्रथम शारदीय नवरात्राच्या पूजेस प्रारंभ केला होता आणि त्यानंतर दहाव्या दिवशी लंकेवर विजय प्राप्त केला होता, अशी मान्यता आहे. तेव्हापासून दसरा हा असत्यावर सत्याचा विजय तसेच अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो.

दस-याच्या दिवशी रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय अर्थात असुरी शक्तीवर सात्विक शक्तीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, पापावर पुण्याचा विजय आणि द्वेषावर प्रेमाचा विजय झाला असे मानले जाते. दस-याचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच सांस्कृतिक महत्त्व आहे. हा देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सत्यमेव जयतेचा मंत्र हा सण देतो. पश्चिम बंगाल आणि मध्य भारताव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यात प्रादेशिक विविधतेचा अडथळा अजिबात जाणवत नाही. देशभरात दस-याला जागोजागी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. श्रीरामांच्या आदर्शानुसार वाटचाल करणे आणि आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त करणे हीच त्यामागील भावना असते. हा सण ख-या अर्थाने आपल्या आत असलेल्या दुर्गुणरूपी रावणाचा वध करून सर्व अवगुणांवर विजय प्राप्त करण्याचा शुभकाळ आहे.

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

दस-याचा संबंध नवरात्राशीसुद्धा आहे. शक्तीची उपासना करण्याचा हा काळ असून, शारदीय नवरात्र प्रतिपदेपासून सुरू होऊन नवमीपर्यंत नऊ तिथी, नऊ नक्षत्रे आणि नऊ शक्तींची नवविधा भक्ती करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रात देवीच्या शक्तींनी दशदिशा व्यापलेल्या असतात आणि देवी दुर्गेच्या कृपेमुळेच दहा दिशांना विजय प्राप्त होतो म्हणूनच नवरात्रानंतर येणा-या सणाला विजयादशमी म्हणतात, असे मानले जाते. दसरा हा असुरी शक्तीवर नारीशक्तीचा विजय मानला जातो. आदिशक्ती दुर्गेला शक्तीचे रूप मानून शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त करण्यासाठी नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. व्रत, अनुष्ठान केले जाते. जागोजागी दुर्गादेवीच्या विशाल मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दुर्गा पूजेमुळे सुख-समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा, आरोग्य, अपत्य, सुख आणि आत्मिक शांतीची प्राप्ती होते असे मानले जाते.

नवरात्राच्या अंतिम दिवशी कुमारिकांना भोजन देऊन नवरात्राची सांगता केली जाते. नवरात्राच्या नऊ दिवसांत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. परंतु हे करताना आपण समजून घेतले पाहिजे की, आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रिया या दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती यांचीच रूपे आहेत. त्यामुळे या पर्वाची सार्थकता ख-या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा आपण आपल्या समाजातील देवीरूपातील नारीशक्तीचा उचित सन्मान करू. स्त्रियांना गर्भातूनच नाहिशा करण्याचा राक्षसीपणा आपण करणार नाही. मुलींना वाचवून, त्यांना शिकवून त्यांचा हक्क देऊ. त्यांना आत्मनिर्भर बनवून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देऊ.

शारदीय नवरात्राचे अभिन्न अंग म्हणजे दसरा होय. दरवर्षी दुर्गोत्सवाची सांगता या पवित्र पर्वाने होत असताना वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय मानला जाणारा हा सण मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी लढल्या गेलेल्या प्रत्येक लढाईत विजय प्राप्त करण्यासाठी बळ देतो. महाबली असुरसम्राट महिषासुराचा वध दुर्गादेवीने विजयादशमीलाच केला होता असे मानले जाते. जेव्हा महिषासुराच्या अत्याचारांनी भूलोक आणि देवलोक त्राहि-त्राहि करीत होते तेव्हा आदिशक्ती दुर्गादेवीने नऊ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय प्राप्त केला होता. हा नऊ दिवसांचा काळ दुर्गोत्सव म्हणून, शक्तीसंचयाचे प्रतीक मानून साजरा केला जातो. आदिशक्तीने महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दहावा दिवस विजयादशमी या नावाने साजरा केला जातो.

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

नवरात्राच्या प्रारंभी मातीच्या घड्यात माती भरून धान्य पेरले जाण्याची परंपराही देशाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. दस-यापर्यंत रोपे वाढलेली असतात. मातीच्या ज्या घड्यात धान्य पेरले जाते, त्याला स्त्रीच्या गर्भाचे प्रतीकसुद्धा मानतात. उगवून आलेली रोपे ही अपत्ये मानली जातात. दस-याच्या दिवशी मुली त्यांच्या भावांना पगडी बांधतात किंवा घड्यात उगवून आलेली रोपे त्यांच्या डोक्यावर ठेवतात तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. दसरा आणि शक्तिपूजा यांच्यातील संबंधांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, ज्या दिवसांत प्रभू रामचंद्रांनी शक्तीची उपासना केली होती त्याच काळात रावण आणि मेघनाद यांनीही उपासना केली होती. आदिशक्तीने दोन्ही बाजूंच्या पूजा आणि उपासनेने प्रसन्न होऊन वरदान दिले. परंतु विजय मात्र प्रभू रामचंद्रांचा झाला, कारण त्यांच्यासोबत धर्म, मानवता, सत्य, निष्ठा आणि पुण्य होते तर रावण स्वत: प्रचंड विद्वान असूनसुद्धा त्याच्यासोबत घमेंड, वासना, क्रोध आदी दोष होते.

पुराणांमध्ये असे सांगितले गेले आहे की, देवीने श्रीरामांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता तर रावण आणि मेघनाद यांना त्यांचे कल्याण व्हावे, असा आशीर्वाद दिला होता. गर्व, दानवता आणि अधर्म नष्ट होण्यातच रावणाचे कल्याण होते, म्हणूनच श्रीरामांच्या हातून त्याला सद्गती प्राप्त झाली. त्यामुळेच जर या दिवशी आपण आत्मचिंतन करून आपल्या आतील दोष शोधून आपल्यातील रावणाचा विनाश केला, तरच दस-याचा सण ख-या अर्थाने साजरा केला असे होईल.

-सु. ल. हिंगणे
अध्यात्म अभ्यासक

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...