22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeविशेषआठवण : हृदयातील लोकनेता

आठवण : हृदयातील लोकनेता

एकमत ऑनलाईन

भारतमातेच्या स्वातंत्र्याचा दिवस व लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचा पुण्यतिथी दिवस या एक दिवसाच्या अंतरात काहीतरी तथ्य आहे, साम्य आहे, समानता, सारखेपणा असे राहून राहून मनाला वाटते, ही हुरहुर लातूरकरांना कायम या दिवसाच्या स्मृतीने जागृत होते… देशाचे स्वातंत्र्य जसे अनेक वीरांनी स्वत:च्या आयुष्याची आहुती देऊन मिळवले, तसेच या लोकनेत्याने स्वत:चे आयुष्य झिजवून हा महाराष्ट्र व आपला लातूर जिल्हा घडविला….तो कायम स्मृती-स्वरूपात येथील जनसामान्यांच्या हृदयात आजही व कायमचाच राहणार.

त्यांच्या शब्दांत साक्षात सरस्वती वसत होती, त्यामुळे कोणतीही सभा ते सहज गाजवत. एक किस्सा आठवतो. मुख्यमंत्री असताना पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात चांगला पाऊस होऊन शेतकरीवर्गाने पेरणी उरकली होती व पिकेही उत्तम होती; परंतु अचानक पाऊस गायब झाला व जिल्ह्यातील शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून या बाबतीत चिंता व्यक्त करत होते… त्या वेळी दयानंद सभागृहातील हा किस्सा आहे… शेतक-यांच्या चेह-यावरील भाव साहेबांच्या मनाने ताडला होता… ‘सध्या महाराष्ट्रात मान्सून बरा पडतोय, परंतु लातूरकरांकडे त्याने पाठ फिरवलेली दिसतेय. काही लोकांनी भेटून मला निवेदने दिली आहेत व सांगितले की, साहेब आंवदा पावसाने लय ताण दिलाय. काही खरं नव्हं!

तो धागा पकडून त्यांनी जो शेतकरीवर्गास दिलासा दिला त्यास तोड नव्हती, ‘जरी ताण दिला तरी तुम्ही कोणीही ताण घेऊ नका, आम्ही आहोत यासाठी. आम्ही थोडी ढील देऊत व जास्त ताणलं जाईल असे हाऊ देणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. पेरलं आणि उगवलं नाही तरी ते कसं विकलं जाईल व तुमच्या खिशात पैसा कसा येईल ही काळजी शासनाची आहे.’ किती मोठे आश्वासक वाक्य होते. महाराष्ट्रातील सर्व शेतकरीवर्गाची अस्वस्थता एका वाक्यात मिटवली. त्यांच्या कृतीतून जनकल्याणाची साक्षात लक्ष्मी खळाळत होती हे ही तितकेच सत्य आहे. असे बरेच काही आहे जे शब्दांत बांधता येत नाही, ते ब-याच जणांनी अनुभवले आहे. त्याला आज उजाळा मिळणे स्वाभाविकच आहे,
लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतीस विनम्रतापूर्ण अभिवादन.

-अभि. नितीन बळवंतराव पाटील
व समस्त जलसंंपदा विभाग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या