20.8 C
Latur
Saturday, October 31, 2020
Home विशेष मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगाने दिला गरिबांना आधार

एकमत ऑनलाईन

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती आपले भविष्य सुरक्षित करणारी आहे. फक्त या योजनेअंतर्गत केल्या जाणा-या कामांच्या टिकाऊपणाची हमी असायला हवी. या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले जलसाठे शेजारच्या गावांशी तातडीने जोडले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांची देखभाल होईल आणि भविष्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

कोविड-१९ च्या संसर्गकाळात नोक-या गेल्या आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले; मात्र गेल्या तीन महिन्यांत ५.६ कोटी कुटुंबांना काम मिळत आहे आणि त्यामुळे या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. हे काम या कुटुंबांना देणारी योजना म्हणजेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा. सामाजिक सुरक्षितता देणारी ही कदाचित सर्वांत मोठी योजना असेल. ‘डाऊन टू अर्थ’ या नियतकालिकाच्या बातमीदारांनी विविध भागांचा दौरा केल्यानंतर त्यांना असे दिसून आले की, ग्रामीण रोजगारात वाढ झाली आहे आणि काही ठिकाणी तर शिकले-सवरलेले लोक आणि कुशल कामगारही या योजनेत सहभागी झाले आहेत. गरिबीच्या दुष्टचक्रापासून अनेकांचा या योजनेने बचाव केला आहे.

या कार्यक्रमातून लोकांना कौशल्याची गरज नसणारी कामे मिळाली हे मान्य; परंतु अनेकांना दैनंदिन मजुरी मिळत राहिली आणि हे लोक संकटाच्या काळात आपापल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करू शकले. रोजगारनिर्मितीचा हा सर्वांत मोठा कार्यक्रम शाश्वत संपत्ती उभारण्यासाठी कसा वापरता येईल, हा खरा प्रश्न आहे. या कार्यक्रमाने आजमितीस लोकांना दिलासा दिला आहे, परंतु भविष्यात उपजीविका सुरक्षित ठेवण्याचा तो आधार कसा बनू शकेल, याविषयी आपण चिंतन करायला हवे.
कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर आपापल्या गावी पोहोचलेल्या मजुरांनी एप्रिल ते जून या काळात या योजनेअंतर्गत सहा लाखांहून अधिक जलाशये आणि जलभरावाची निर्मिती आणि दुरुस्ती केली. त्याचप्रमाणे लोकांना तलाव खोदण्याचे किंवा छोटे बांध बनविण्याचे आणि असलेल्या बांधांची दुरुस्ती करण्याचे काम आपल्या घरांच्या जवळच मिळाले.

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

मान्सूनच्या पावसाने हे जलाशय काठोकाठ भरले असून, त्या जलाशयांनी भूजलाचा स्तर वाढविण्याबरोबरच पूर रोखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी काळात अनेक ठिकाणी पडू शकणारा दुष्काळ या जलाशयांमुळे सुस होणार आहे. त्यामुळे शेतीची परिस्थिती सुधारेल. आपल्या देशात अनेक ठिकाणची शेती पाटपाण्यावर नव्हे तर भूजलावर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याचा आपला प्रत्येक प्रयत्न आर्थिक वृद्धीचा मार्ग प्रशस्त करणारा ठरणार आहे. माझ्या सहका-यांनी त्यांच्या दौ-यात घेतलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी असे तलाव आणि बांध-बंधारे बांधण्यात आले आहेत. याचा अर्थ, वास्तवात काम झालेले आहे. आता या जलाशयांच्या टिकाऊपणाची पारख करायला हवी. हे जलाशय खरोखर टिकाऊ आहेत का? पाण्याच्या उपलब्धतेत यामुळे वाढ होईल का? हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

परंतु या जलाशयांचा टिकाऊपणा पारखला जात आहे, असे दर्शविणारे मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. मनरेगासंबंधीची सरकारी आकडेवारी असे सांगते की, २०१७ आणि २०१८ या दरम्यान जलसंरक्षण आणि भूजल पुनर्भरणाची १३ लाख कामे करण्यात आली. जर शेतात बांधलेल्या ३.५ लाख छोट्या तळ्यांची भर यात टाकली, तर आपल्या देशात जलसंरक्षणासाठी एक मोठी क्षमता तयार व्हायला हवी होती. हीच बाब आता सोप्या अंकगणितामार्फत तपासून पाहूया.

सन २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात ६.५ लाख गावे आहेत आणि यातील प्रत्येक गावात दरवर्षी जलसंवर्धनाची कमीत कमी चार कामे व्हायला हवीत. जलस्रोतांच्या संख्येत दरवर्षी होत असलेली वाढ लक्षात घेता, काही काळानंतर देशात कोणत्याही प्रकारचे जलसंकट जाणवताच कामा नये. परंतु जलसंकटाची स्थिती आपल्याकडे सर्वत्र दिसते. आपल्याकडील गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता जाणवते आणि पिण्याचे पाणी दूषित असल्यामुळे अनारोग्याच्या रूपाने त्याची किंमत मोजावी लागते आहे. पेयजल मिशन हे घरोघर नळाद्वारे पाणी पुरविण्यासाठी नसून, प्रत्येकाला पिण्यायोग्य पाणी पुरविणे हे लक्ष्य आहे, असे सरकारने सांगितले ते योग्यच आहे. जेव्हा भूजल पुनर्भरण प्रभावी आणि टिकाऊ असेल तेव्हाच नळाद्वारे स्वच्छ पाणी घराघरांत पोहोचू शकेल. त्यासाठी पावसाचे पाणी जमा होण्याचे अनेक मार्ग शोधावे लागतील. या पार्श्वभूमीवर मनरेगा कार्यक्रमांतर्गत तयार झालेले लाखो जलसाठे जवळच्या लोकसंख्येशी जोडले जाणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांची देखभाल करता येईल आणि ते सुस्थितीत राखता येतील. असे झाल्यास हे जलसाठे टिकाऊ बनतील.

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

नेमकी याच ठिकाणी समस्या आहे. आजही या कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांचीच मोजदाद केली जाते. खासगी शेतांमध्ये बांधलेल्या छोट्या तलावांव्यतिरिक्त जलसंवर्धनासाठी जी कामे झाली, त्या कामांची माहिती अभावानेच उपलब्ध आहे. जलसंपदा मंत्रालयाने म्हटले आहे की, यापुढे मनरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जलसाठ्यांमार्फत भूजल पुनर्भरण किती झाले, यावर लक्ष ठेवले जाईल. हे एक स्वागतार्ह पाऊल मानले पाहिजे. यामुळे हा कार्यक्रम केवळ आजचा विचार न करता परिस्थितकीय आधारांच्या निर्मिती आणि सशक्तीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

त्यामुळे लोकांची उपजीविका सुरक्षित होऊन भविष्यकाळासाठी लवचिकताही प्राप्त होईल. मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामांचे स्वरूप बदलणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. यात नैसर्गिक खत तयार करण्यापासून वृक्षलागवड करण्यापर्यंत अनेक कामांचा समावेश केला गेला पाहिजे. सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी व्यक्तिगत जमिनींवर शौचालये उभारण्याचे कामही या योजनेत अंतर्भूत केले आहे. एप्रिल आणि ऑगस्ट या दरम्यानच्या काळात जेव्हा कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली, त्या काळात मनरेगा अंतर्गत १.५५ कोटी खासगी कामेही करण्यात आली. यात जनावरांसाठी शेड उभारणे आणि शेतांमध्ये तलाव खोदण्यापासून शेतांना कुंपण घालण्याच्या कामापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे. गरिबांना आपले भविष्य सुरक्षित करण्याची एक संधी मिळाली आणि त्यासाठी त्यांच्या हाती पैसा येईल, अशी व्यवस्था करण्यात आली.

या योजनेच्या गुणदोषांचा अंदाज असल्यामुळेच हे लिहावे लागत आहे. खड्डे खोदणे किंवा दरवर्षी खराब होणारे रस्ते तयार करणे याला आपण कन्सवादी मॉडेल म्हणतो. परंतु हे अनुत्पादक श्रम आहेत. शिवाय, मनरेगा ही स्थानिक पुढारी मंडळींच्या संरक्षणाखाली चालविली जाणारी एक भ्रष्ट योजना असल्याचे सांगून ती पूर्णपणे नाकारणारी मंडळीही आहेतच. परंतु काम मागण्याचा अधिकार देणारी ही योजना कोविडच्या प्रतिकूल काळात तर लोकांना मदतीचा हात देत आहेच; शिवाय येणा-या काळासाठीही आपल्याला सुरक्षित करीत आहे. अर्थात ‘कामाचा अधिकार’ न म्हणता ‘उपजीविकेचा आधार’ असे म्हणून या योजनेचा विस्तार होण्याची गरज आहे.
(लेखिका सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)च्या संचालिका आहेत.)

-सुनीता नारायण
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, नवी दिल्ली

ताज्या बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...

आणखीन बातम्या

भारताचा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक

भारत-अमेरिका संबंधांमध्ये ऐतिहासिक घडामोड घडली आहे. दोन्ही देशांदरम्यान एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झालेली आहे. हा करार आहे बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन अ‍ॅग्रिमेंट. भारत गेल्या...

हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यासह युरोपीय महासंघ आणि आसियानच्या सदस्य देशांपर्यंत सर्वच देश हिंद प्रशांत संकल्पनेला पुरेसे महत्त्व देऊ लागले आहेत. चीनपुढे क्षेत्रातील इतर...

सामाजिक एकतेचा संदेश देणारे प्रेषित

प्रेषित महुम्मद सल्ल यांनी धार्मिक सहिष्णुता व चारित्र्य या गुणांच्या बळावर इस्लाम धर्मास एक नवी दिशा, नवी ओळख निर्माण करून दिली व जगात एक...

राजकीय देणग्या आणि पारदर्शकता

राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांच्या संदर्भाने कोणतीही माहिती पुढे आली, तरी ती सुखद आणि स्वागतार्हच असते. राजकारणात पैसा कोठून येत आहे, याची संपूर्ण माहिती देशातील...

नोबेल आणि महिला

इमॅन्युएल शार्पेंतिए आणि जेनिफर डाउडना या दोन महिला शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नुकतेच देण्यात आले. महिला शास्त्रज्ञांसाठी ही खरोखर आनंदाची आणि समाधानाची घटना आहे....

काळ सोकावता कामा नये!

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक कलाकारांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये जो हलकल्लोळ सबंध देशभरात उडालेला दिसून आला...

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत भारताचा संघर्ष सुरू असतानाच स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या एका पाठोपाठ एक चाचण्या करून भारत आपल्या क्षेपणास्त्रशक्तीचा स्पष्ट अंदाज जगाला देत...

गरज शाश्वत आर्थिक संरक्षणाची

जागतिक हवामान बदलांचे आणि तापमानवाढीचे दृश्य बदल अलीकडील काळात सातत्याने अनुभवास येत आहेत. विशेषत: याचा पर्जन्यमानावर झालेला बदल दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत आहे....

ओंगळवाणा चेहरा

मुलींना आपले विचार मुक्तपणे मांडता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांपासून उपयुक्त मंच ठरत आहे. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच या आभासी जगातही त्यांना अवमान...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...
1,325FansLike
120FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...