27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home विशेष मुक्तिसंग्राम : नांदेड जिल्ह्याचा सहभाग

मुक्तिसंग्राम : नांदेड जिल्ह्याचा सहभाग

नांदेड जिल्हा हैदराबाद संस्थानात असल्यामुळे स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी नांदेडसह मराठवाड्यातील जनतेला १५ ऑगस्ट १९४७ नंतर तब्बल एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. हैदराबादच्या जुलमी अत्याचारी रझाकार व निजाम सरकारच्या त्रासाने येथील जनता अक्षरश: होरपळून गेली होती. जनतेच्या लढ्याने व भारतीय लष्कराच्या अ‍ॅक्शनमुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली.

एकमत ऑनलाईन

ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात ५६३ संस्थाने होती. त्याचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक बघत असत. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद. या संस्थानाची स्थापना मीर कमरूद्दीन निजाम यांनी १७२४ मध्ये केली होती. १९४८ पर्यंत हे राज्य अस्तित्वात होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखलेतून मुक्ती मिळाली होती. मात्र मराठवाड्यातील जनता अजूनही पारतंत्र्यातच होती. हैदराबाद राज्य हिंदुस्थानच्या मध्यभागी वसलेले राज्य होते.

हिंदुस्थानात असलेल्या देशी राज्यात काश्मीर राज्य आकाराने सर्वांत मोठे, हैदराबाद राज्य आकाराने दुस-या क्रमांकाचे होते. १८ जुलै १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतातील सर्व देशी राज्ये आणि संस्थानिक राज्ये संघराज्यात विलीन झाली. मात्र हैदराबाद राज्याचा सत्ताधीश मीर उस्मान अली खान याने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले. देशाच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुस-या क्रमांकाचे असलेले हे राज्य स्वतंत्र राहणे देशाच्या हिताचे तर नव्हतेच त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त होणारच नव्हते. हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण व्हावे यासाठी अनेक सशस्त्र आंदोलने झाली.

स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात सर्वप्रथम आर्य समाजाने केली आणि त्यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेसने या आंदोलनाचे नेतृत्व केले. हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात मराठवाड्यातील औरंगाबाद या शहरातून वंदे मातरम् या सत्याग्रहातून झाली. राज्यात हैदराबादला उस्मानिया विद्यापीठ तर औरंगाबाद, वरंगल व गुलबर्गा येथे इंटरमिजिएट कॉलेज होती. औरंगाबादच्या कॉलेजमध्ये गोविंदभाई श्रॉफ हे गणिताचे शिक्षक होते . ते व विष्णू गोविंद कर्वे यांनी विद्यार्थ्यांत देशभक्ती निर्माण केली म्हणून गोविंदभाईंना नोकरीवरून कमी केले.

चिकमहुद महुद परिसरामध्ये तुफान पाऊस सुरू

कॉलेजच्या वसतिगृहात हिंदू विद्यार्थ्यांनी १४ नोव्हेंबर १९३० पासून कॉलेज प्रशासनाचा विरोध पत्करून प्रार्थना म्हणून वंदे मातरम् गीत म्हणण्यास सुरुवात केली. वंदे मातरम् चळवळीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना निजाम सरकारने शाळेतून काढून टाकले. सरकारच्या दडपशाहीमुळे शैक्षणिक नुकसान झाले पण अशा सत्याग्रहामुळे संस्थानात जनजागृती झाली. कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया मजबूत होण्यास मदत झाली.

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचे स्टेट काँग्रेसने ठरवले. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, झेंडा सत्याग्रह करावा असे आवाहन स्वामीजींनी जनतेला केले होते. संघराज्यात झेंडा लावला तर दोन वर्षांची शिक्षा जाहीर केली. तरीसुद्धा १५ ऑगस्टला नांदेडच्या स्टेशनवर झेंडा फडकविण्यात आला. केंद्राच्या पोस्ट ऑफिसवरही ध्वजाला सलामी देण्यात आली. नांदेडच्या एम्पिरियन बँकेच्या शाखेवरही झेंडा लावण्यात आला. १७ ऑगस्टला नांदेडला सराफ्यात झालेल्या झेंडा प्रकरणात बळवंतराव बोधनकर व विनायकराव डोईफोडे यांच्यावर अटकेचे वॉरंट काढले. डोईफोडे यांना अटक झाली.

हदगाव तालुक्यातील डोरलीला अशाच प्रकरणात गोळीबार झाला. तेथे झेंडावंदनाचा व जंगल सत्याग्रह हा कार्यक्रम आखला होता. उमरी, पाथरड, सोनारी व आजूबाजूच्या खेड्यांतील लोक पावसाची पर्वा न करता त्या गावी जमा झाले. तामसा पोलिस ठाण्याचा अमिन पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. हदगाव तालुक्यात असलेल्या शिरड गावी १५ ऑगस्ट १९४८ ला राष्ट्रीय झेंडा फडकवला व झेंड्याला सशस्त्र सैनिकांनी रायफल सलामी दिली. या समारंभाला दक्षिणकर सर्कल इन्स्पेक्टर, मंजिथराव देशमुख व इतर गावातील मान्यवर मंडळी हजर होती. भगवानराव गांजवे यांनी या झेंड्याला सलामी दिली. ३२ गावे स्वतंत्र झाल्याची घोषणा यावेळी केली. या प्रकरणानंतर निजाम पोलिसांची घाबरगुंडी उडाली पण त्याआधी सीताखंडी, लालसिंग तांडा, आमठाणा तांडा असे काही तांडे पोलिसांनी जाळून टाकले. चितगिरीचे चंद्रू नाईक, त्याचा भाऊ लालसिंग व आणखी दोन-तीन जणांचे पोलिसांनी खून केले. त्याचा प्रमुख नाईक आनंदा मंचा पोलिस अत्याचाराला बळी पडला.

खामसावडीच्या तरुणाने कोरोनात यशस्वी ड्रॅगन शेती फुलवली

उमरखेड कॅम्पकडून १५ ऑगस्ट हा दिवस निजामी हद्दीत साजरा करण्याची तयारी होती. भोकरमधील सोनारी गावच्या लोकांनी दोघा पोलिसांना पकडून बंद करून ठेवले होते. सोनारीचे माली पाटील भुजंगराव त्यांनी गावाच्या संरक्षणासाठी बंदुका जमवल्या. बंदुकीच्या बारूदचे डबेच्या डबे तयार करून ठेवले होते. हैदराबादला पाठवून फुले (कॅप्स) मागविल्याची खबर मिळताच भोकर पोलिस ठाण्यातून दोन पोलिस झडती घेण्यासाठी पाठवले होते. भुजंगरावांनी त्यांना पकडून ठेवले. या घटनेचे वृत्त पोहोचताच नांदेड जिल्ह्याच्या पोलिस अधिका-यांनी हैदराबादहून मदत मागवली. मोठी फौज आली पण सामोपचाराने प्रश्न मिटवला. आठ-दहा गावांचे गावकरी सोनारीचे रक्षण करण्यासाठी धावून आले होते. सुटका केल्यानंतर भुजंगराव यांना पकडले नाही.

हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कृति समितीने राज्यातील जनतेला जंगल सत्याग्रह करण्याचा आदेश दिला. मराठवाड्यात २५ ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. पाटनूरचा जंगल सत्याग्रह प्रसिध्द आहे. त्यावेळी दहा-अकरा लोक पकडले गेले. आंदोलनाचा पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. नंतर मुदखेड ठाण्यातून बाराशे लोकांवर एफआयआर निघाला. नांदेड जिल्ह्यातील टेळकी येथे जंगल सत्याग्रह झाला. तेथे झालेल्या गोळीबारात रघुनाथराव हंबर्डे, मोतीराम लक्ष्मण, भिकाजी तुळशीराम व धोंडिबा काळे मरण पावले. किरगुळच्या शेतक-यांनी लेव्हीविरुद्ध लढा दिला पोलिसांना सळो की पळो करून सोडले. चाळीस लोकांना किरगुळ, इटोली व आसपासच्या गावांत जाऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पकडले.

तेव्हा स्वामीजी व हैदराबादचे मजूर पुढारी व्ही. बी. राजू यांनी या भागाचा दौरा केला. किरगुळ, पळशी, म्हैसा, किनी, पाळज या गावांना भेटी दिल्या. पाळजला त्यांनी मुक्काम केला होता. तेथील मल्लारेडीनी आपल्या गावच्या कार्यकर्त्यांना घेऊन सत्याग्रह केला. भोकर व म्हैसा येथील रझाकारांनी किनीमध्ये धाड टाकली. सोने-नाणे लुटून किनी, पाळज गावाची राखरांगोळी केली. भोजन्ना बोईलवाड, चिकू आयतालवाड, मुत्येन्ना नरसापुरे, श्रीमती पोसानबाई गोलवाड व अन्य दोन परगावचे मजूर यांचा खून केला.

किल्लारीचा कारखाना महाविकास आघाडीच्या ताब्यात

गोविंद विनायक पानसरे हे हैदराबादचे राहणारे. जन्माने औरंगाबाद जिल्ह्यातले. बदनापूरला इंटरपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे खात्यातली नोकरी सोडून जनतेवर होणा-या अन्याय-अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम केले. त्यांच्यावर मुधोळ तालुक्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. कोंडलवाडीच्या रझाकाराने अर्जापूरच्या वेशीजवळ पानसरे यांची तलवारीने हत्या केली. त्यांच्यासोबत असलेल्या पंधरा-सोळा वर्षांच्या हंगीरग्याच्या पुंडलिक पाटलावरसुध्दा तलवारीने वार करून जखमी केले. २१ डिसेंबर १९४६ ला सायंकाळच्या वेळी उमरी स्टेशन येथील आर्य समाजाचे तरुण तडफदार कार्यकर्ते दत्ता उत्तरवार यांचा स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अरब पहारेक-­यांनी क्षुल्लक कारणावरून खून केला. नागेलीला पोलिस घोडदळांचा वेढा, उमरीचे बँक ऑपरेशन, इस्लापूर पोलिस ठाण्यावर हल्ला, कल्हाळीचे हत्याकांड, देगलूरमधील हणेगाववरील रझाकारांची धाड, लोहा गावावर झालेला रझाकारांचा हल्ला व लुटालूट, अशा अनेक हिंसक घटनांचा साक्षीदार नांदेड जिल्हा आहे.

१३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्यावर पोलिस कारवाई करावी लागली. या घटनेला ‘ऑपरेशन पोलो’ असेही म्हणतात. भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई केली होती परंतु लष्करी कारवाई म्हटल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होईल. या कारवाईस ‘पोलिस अ‍ॅक्शन’ असे नाव कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू यांनी पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी चर्चा करून पोलिस कारवाई करण्याची विनंती केली होती त्यामुळे १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजता पोलिस कारवाई सुरू झाली. भारतीय लष्कर पाच भिन्न दिशांनी हैदराबाद राज्यात घुसले. निजामी पोलिसांशी झुंज दिली.

रझाकार व निजामी पोलिस भारतीय लष्करापुढे टिकले नाहीत. १७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता निजाम मीर उस्मान अली खान बहादुर या निजामाने रेडिओ स्टेशनवर भाषण केले व आपण युद्ध थांबवित असल्याची घोषणा केली. त्यानंतर हैदराबाद लष्कराचे प्रमुख शरण आले. १०९ तासांत पोलिस कारवाई यशस्वी झाली. हैदराबाद राज्यातली जनता निजामाच्या जाचातून मुक्त झाली. स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मेजर जनरल चौधरी यांनी हैदराबाद राज्याचा राज्यकारभार ताब्यात घेतला. पुढील १४ महिने तेथे लष्करी राजवट होती. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अर्थात अखंड भारतनिर्मितीच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या व मुक्तिलढ्यात कार्य केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

मिलिंद जाधव
जि. प. कन्या शाळा, भोकर
मोबा. ९४२३९ ०२४५४

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...

जड झाले ‘ओझे’…

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुमारे पंचवीस टक्क्यांनी आकुंचन पावली. मार्च महिन्यात लागू केलेला कडक लॉकडाऊन हे याचे मुख्य कारण ठरले. अंदाजे तीन...

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी येथील ७ डिसेंबर २००४ रोजीची माझी मुलाखत अविस्मरणीय, वेगळे वळण देणारी ठरली. मुळातच किल्लारी गावची पहिलीच भेट कुतुहलाने, औत्सुक्याने भारावलेली...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

मुंबई पोलिस अन् महापालिकेची मान खाली

सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली मान खाली घालून घेतली. नंतर कंगना राणावत प्रकरण उद्भवले. सत्ताधारी पक्षाकडून धमक्या आणि खुद्द गृहमंत्री यांच्या...

कोनालाबी सोडना गेलाय

पार जगाचा वास उटलाय. किडे-मुंग्या मेल्यावानी लोकं मरूलालेत. नरसाळ्या कोनालाबी सोडना गेलाय. चिनमदून ईमानातून गेलाय म्हन त्यो समदीकडं. हिथं आमाला आनी ईमानात बसनं व्हैना...

कोरोना महामारी ‘देवाची करणी’, ‘आर्थिक महामारी’ कोणाची करणी?

‘देश रसातळाला गेला आहे’, असे विधान माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, ‘जलयुक्त शिवार योजना घोटाळा’फेम बोलबच्चन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी...

कांद्याचं रडगाणं

केंद्र सरकारने नुकतीच केलेली कांद्याची निर्यातबंदी ही चुकीच्या आकडेवारीनुसार करण्यात आली आहे. बाजारात कांद्याची दरवाढ सप्टेंबर महिन्यात दरवर्षी होत असते. ती उन्हाळी कांदा संपत...

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...