28.9 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home क्रीडा मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

एकमत ऑनलाईन

रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या खडूस कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३व्या पर्वात अबूधाबी येथील पाचव्या सामन्यात बुधवारी कोलकता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी पराभव केला. आयपीएलमधील पहिला सामना जिंकण्याची कोलकताची परंपरा तुटली तर वाळवंटात झालेल्या सहा पराभवानंतर पहिला विजय मुंबईनी मिळवला.

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर मुंबई इंडियन्सने ५ बाद १९५ धावा केल्या.यात रोहित शर्माच्या ५४ चेंडूतील ८० धावांचा प्रमुख वाटा होता. त्याने ३ चौकार आणि सहा षटकार ठोकले. त्याला सूर्यकुमार यादवने ४७ धावा करून सुरेख साथ केली. कोलकता संघाचा डाव ९ बाद १४६ असा मर्यादित राहिला. दिनेश कार्तिक आणि नितीन राणा यांच्यापेक्षा शेवटी पॅट कमिन्सने १२ चेंडूत तडकावलेल्या ३३ धावांच लक्षात राहिल्या मुंबई गोलंदाजाची अचूकता हा महत्वाचा घटक ठरला.सर्व गोलंदाजानी आपापली जबाबदारी पार पाडली.

आव्हानाचा पाठलाग करताना कोलकताला सुरवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांच्या अचूक टप्प्यावरील माºयामुळे कोलकताची शुभमन गिल, सुनील नारायण ही जोडी स्थिरावू शकली नाही. बोल्टने गिल, तर पॅटिन्सनने नारायणला बाद करून कोलकतासमोरील संकटाला सुरवात केली. कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितीश राणा यांची ४६ धावांची भागीदारी वगळता कोलकत्याच्या डावात फारसे काही घडले नाही. जसप्रित बुमराहच्या कमालीच्या भेदक गोलंदाजीचा सामना त्यांना करता आला नाही.

सोळाव्या षटकांत बुमराने केवळ दोन धावा देत आंद्रे रसेल आणि इयॉन मॉर्गन हे दोन महत्वाचे आणि अखेरचे मोहरे टिपत त्यांच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. त्यानंतर पॅट कमिन्स आणि शिवम मावी यांनी काहिशी फटकेबाजी करून मुंबईचे विजयाधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यातही कमिन्सने बुमराहच्या १८व्या षटकांत चार षटकारांची आतषबाजी केली. या षटकांत त्याने २७ धावा कुटल्या. त्यामुळे बुमराहचे गोलंदाजी पृथक्करण ३-०-५-२ वरून ४-०-३२-० असे झाले.

तत्पूर्वी, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर कोलकता संघाच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली . मुंबईची सलामीची जोडी फोडताना त्यांनी क्वीटॉन डी कॉकला झटपट बाद केले.त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांना त्यांना रोखता आले नाही. दोघांनी पॅट कमिन्सचा खरपूस समाचार घेतला. संदीप वॉरियरही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. कुलदीप यादवला देखील लय गवसली नाही. त्यामुळे शिवम मावी आणि सुनील नारायण घेत असलेले परिश्रम व्यर्थ ठरले.

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव या जोडीने पूर्ण वर्चस्व गाजवल. यानी ९० धावांची भागीदारी केली. सुर्यकुमार बाद झाल्यावर मुंबईच्या डावाचा वेग काहीसा कमी झाला. सौरभ तिवारी रोहितला साथ देऊ शकला नाही. रोहितही धावगती वाढविण्याच्या नादात बाद झाला. अखेरच्या दोन षटकांत किरॉन पोलार्डने २३ धावांची भर घालून मुंबईला द्विशतकाजवळ आणले .मर्यादित षटकांच्या सामन्यात सहजतेने खेळणारÞ्या रोहितच्या कारकिर्दीला खरे वळण टी २० क्रिकेटमुळेच लागले. रोहितने आज कोलकताविरुद्ध सहावी धाव घेतली तेव्हा आजच्या पहिल्या विक्रमाची नोंद केली. त्याने कोलकताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळविला. आतापर्यंत कोलकताविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने ८२९ धावा केल्या होत्या. पण, आज रोहितने त्याला मागे टाकले.

त्यानंतर त्याने आपल्या खेळीत सहावा षटकार मारताना आयपीएलमधील षटकारांचे द्विशतक साजरे केले. आयपीएलमध्ये आतापर्यंत ख्रिस गेलने ३२६, डिव्हलर्सने २१४ आणि धोनीने २०९ षटकार मारले आहेत. रोहितने आयपीएलमध्ये ८३ झेल घेतले असून, सर्वाधिक १०२ झेल सुरेश रैनाने घेतले आहेत.

मैदानाबाहेरून
डॉ़ राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या