27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषआजीच्या बटव्यातही नागवेलीची महती

आजीच्या बटव्यातही नागवेलीची महती

एकमत ऑनलाईन

विड्याच्या पानाचं नातं भारतीय इतिहासाशी आणि परंपरेशी खुपच जुनं असलेले आहे. विड्याचे पान खायला आवडत नाही असा एकही माणूस शोधूनही आढळत नाही किंवा फार क्वचित सापडतो. दररोज नियमितपणे विड्याचे पान खाणे म्हणजे केवळ रसना तृप्तीच होणे असे नाही तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा अत्यंत पोषक आहे. या विड्याच्या पानाला नागवेलीचे पान असेही म्हणतात. आजही ग्रामीण भागामध्ये पान खाण्यामुळे तोंडाची चव वाढविण्यासोबतच या पानाचा वापर करून विविध पारंपारिक औषधी उपायासाठी सुध्दा विज्ञानाच्या आधुनिक संशोधनानुसार या विड्याच्या पानामध्ये कर्बोदके, तंतुमय पदार्थ, प्रथिने, विविध खनिजे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयोडिन, टॅनिन आढळून येतात. याशिवाय अ‍ॅन्टीऑक्सिडंटस आणि जीवनसत्वे सुध्दा मुबलक प्रमाणात असतात.

त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी विड्याचे पान नियमितपणे खाणे अत्यंत फायद्याचे आहे. विड्याच्या पानामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट (मुक्त रॅडिकल्सबरोबर लढा देणारे) मधुमेही विरोधी (मधुमेहाची लक्षणे कमी करणारे) दाहक विरोधी (जळजळ कमी करणारे) कर्करोग विरोधी (कर्करोगास प्रतिबंध करणारे) अल्सर विरोधी (अल्सरशी लढा देण्यास मदत करणारे) असे विविध औषधी गुणधर्म आहेत. विड्याचे पान सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते, तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास उपयोग होतो. तसेच दाताच्या विविध आजारापासून संरक्षण मिळते. या पानामध्ये असलेल्या गुणकारी तत्वामुळे आपल्या शरीरात असलेले हानिकारक जीवाणू कमी करण्याचे कार्य होते. याचबरोबर सर्दी, खोकला, डोकेदुखी कमी होते आणि थकवा सुध्दा दूर होतो. या व्यतिरिक्त आपल्या शरीरातील अनेक व्याधीपासून संरक्षण मिळण्यास फायदा होते त्यामुळेच या विड्याच्या पानाचा आजीबाईच्या बटव्यातही आवर्जुन समावेश करण्यात आला आहे. ४उपयोग ४ बध्दकोष्ठता: हा एक पचनक्रियेमधील विकार असून या आजारामध्ये मोठ्या आतड्यात जमा झालेला मल नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची कार्यक्षमता कमी होते व त्यामळे शौच्याच्या वेळी वेदना होतात. त्यासाठी विड्याच्या पानाचे सेवन केल्याने पचनास मदत होते.

या पानामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पी एच (सामू) पातळी सामान्य राहते व तसेच शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकले जातात. त्यासाठी विड्याची पाने बारीक तुकडे करून रात्रभार पाण्यात ठेवावीत व दुस-या दिवशी सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास फायदा होतो. ४मधुर आवाज: गायक मंडळीसाठी विड्याचे पान एक दैवी देणगी आहे. आवाजाचा पोत सुधारण्यासाठी व आवाज मंजूळ होण्यासाठी विड्याची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. ब-याच वेळा गायक मंडळी कोणत्याही संगीत मैफिलीच्या अगोदर हमखास विड्याचे पान खाताना दिसतात. कारण विड्याच्या पानाच्या सेवनाने आवाज स्वच्छ व पातळ होऊन त्याची मधुरता वाढते तसेच विड्याच्या पानाचे पाणी पिल्याने गळ्याशी संबंधीत अनेक समस्या दूर होतात. ४शिघ्रपतन : ब-याच वेळा पुरूषांमध्ये लैंगिक ताठरता जास्त वेळ राहत नाही व त्यामुळे विर्यस्खलन लवकर होण्याची समस्या असते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना समाधान मिळत नाही. त्यासाठी अश्वगंधा चूर्ण विड्याच्या पानांत टाकून त्याचे सेवन दररोज नियमितपणे करावे. तसेच केशर, वेलची, खोबरे, बेदाणे व साखरेची मिठाई विड्याच्या पानात टाकून जेवणानंतर सेवन करावी. तसेच नवविवाहितांना दुधाबरोबर रात्री दिल्यास लैंगिक सुख मिळते.

४ निद्रानाश : ब-याच लोकांना अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागत नाही किंवा सलग चांगली झोप येत नाही. त्यासाठी विड्याचे पान गुणकारी औषधी आहे. त्यासाठी रात्री जेवल्यानंतर व झोपण्या अगोदर विड्याच्या पानात थोडे मीठ व ओवा टाकून चावून चावून नियमितपणे दररोज खावे. त्यामुळे चांगली झोप लागून आराम मिळतो व निद्रानाशाची समस्या दूर होते. ४ गुडघेदुखी : पायाला मुका मार लागला असेल किंवा गुडघे दुखीची समस्या असल्यास विड्याचे पान अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी विड्याच्या पानाला थोडे तूप लावावे व नंतर जे तव्यावर ठेवून गरम करावे. हे गरम झालेले विड्याचे पान दुख-या भागावर लावावे. त्यामुळे त्रास होत असलेला भाग किंवा गुडघ्याला चांगला शेक मिळतो. ४ डोकेदुखी :- विड्याच्या पानाचा वापर डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या आजारावर अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी विड्याचे पान चावून खावे व तसेच विडयाचे पान बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. हा तयार केलेला स्वरस कपाळावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे काही मिनिटातच डोकेदुखीचा त्रास कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते. ४ तीळ/मस : आपल्या शरीरावर नको असलेल्या ठिकाणी तीळ किंवा मस आल्यास सौंदर्यामध्ये बाधा निर्माण झाल्यासारखे वाटते. या तीळ किवा मस पासून सुटका मिळण्यासाठी विड्याचे पान अत्यंत गुणकारी औषधी आहे.

त्यासाठी विड्याच्या पानावर थोडा (पांढरा) चुना लावून हे पान मस किंवा तीळ असलेल्या ठिकाणी लावावे. असे आठवड्यातून तीन ते चार वेळा लावल्यास फायदा होतो. यामुळे थोडीशी जळजळ होते. पण कोणतेही नुकसान होत नाही. ४नाकाचा घोळणा : प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना उन्हाचा (जास्त तापमानाचा) त्रास होऊन नाकातून रक्त स्त्राव होतो. हे टाळण्यासाठी विड्याची पाने अत्यंत उपयोगी आहेत. त्यासाठी विड्याची पाने बारीक कुस्करून व त्याचा लगेच वास घ्यावा त्यामुळे नाकातून होणारा रक्तस्राव कमी होऊन आराम मिळण्यास लाभदायक होते. ४ भाजणे :प्रामुख्याने महिलांना स्वयंपाक घरामध्ये काम करताना भाजणे किंवा पोळणे या समस्याचा सामना करावा लागतो. अशा वेळी विड्याची पाने अत्यंत उपयोगी आहेत. त्यासाठी विडयाची पाने बारीक वाटून त्याची पेस्टी तयार करावी. ही पेस्टी प्रभावीत भागावर लावून काही वेळाने धुवून टाकावी आणि त्यावर मध लावावा त्यामुळे जळजळ कमी होऊन आराम मिळतो.

४ कफ : ब-याच वेळा छातीत कफ वाढल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो व छातीत जळजळ झाल्यासारखे वाटते. त्यासाठी विड्याच्या पानावर तेल किंवा तूप लावून तव्यावर गरम करून छाती शेकावी छाती शेकल्यामुळे कफ सुटतो व छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते. ४ तोंडाची दुर्गंधी : आपल्या तोंडामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू असतात. त्यातील हानिकारक जंतूची वाढ झाल्यास तोंडाला दुर्गंधी येते. विड्याच्या पानामध्ये तोंडातील दुर्गंधी कमी करण्याचे घटक असतात. ज्यामुळे तोंडातील जंतूचा संसर्ग कमी होतो. त्यासाठी विड्याच्या पानात कात, चुना, बडीसोप आणि विलायची टाकून खाल्यास लाभदायक होते. ४ तोंड येणे: शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण इ. पाल्यावर तोंडात फोड किंवा लाल चट्टे निर्माण होतात. त्यासाठी विड्याची पाने पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून घ्यावीत व ते पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात त्यामुळे त्रास कमी होऊन आराम मिळतो.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या