19.7 C
Latur
Friday, December 4, 2020
Home विशेष ओंगळवाणा चेहरा

ओंगळवाणा चेहरा

एकमत ऑनलाईन

मुलींना आपले विचार मुक्तपणे मांडता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांपासून उपयुक्त मंच ठरत आहे. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच या आभासी जगातही त्यांना अवमान सहन करावा लागत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ऑनलाईन गलिच्छ भाषा आणि अवमानकारक शब्द यामुळे अनेक मुलींना सोशल मीडिया सोडून देणेही भाग पडले आहे. ब्राझील, भारत, नायजेरिया, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेसह २२ देशांमधील मुलींशी संवाद साधून सोशल मीडियासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ५८ टक्क्यांहून अधिक मुलींना सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या रूपाने अवमान सहन करावा लागला आहे.

प्लान इंटरनॅशनलने केलेल्या या सर्वेक्षणात १५ ते २५ वर्षे वयोगटातील १४ हजार मुलींचा अभिप्राय समाविष्ट करण्यात आला होता. ऑनलाईन दुनियेत अभद्रतेच्या बाबतीत फेसबुकची परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे. अवमानकारक शब्दांनी एखाद्या मुलीवर हल्ला चढविण्याच्या सर्वाधिक घटना फेसबुकवर घडतात. ३९ टक्के महिलांच्या मते, त्यांना फेसबुकवर अवमान सहन करावा लागला आहे. त्याच वेळी इन्स्टाग्रामवर २३ टक्के, व्हॉटस् अ‍ॅपवर १४ टक्के, स्नॅपचॅटवर १० टक्के आणि ट्विटरवर ९ टक्के महिलांना अशा अभद्र व्यवहाराला सामोरे जावे लागले.

या अभद्र व्यवहारामुळे पाचपैकी एका मुलीने सोशल मीडिया साईटवर जाणे एकतर बंद केले आहे किंवा खूपच मर्यादित ठेवले आहे. एवढेच नव्हे तर अनेक मुलींनी आपली मते खुलेपणाने मांडणेही बंद केले आहे. या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, ट्रोलिंग किंवा असभ्य भाषेत केलेला अवमान सहन केल्यानंतर १० पैकी एका मुलीने सोशल मीडियावर स्वत:ला व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. ४१ टक्के मुलींच्या म्हणण्यानुसार, आभासी दुनियेत केवळ अपमानजनक भाषा आणि शिवीगाळच नव्हे तर लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन हेतुपुरस्सर केले जाते. बॉडी शेमिंग आणि लैंगिक हिंसा, जातीय अल्पसंख्याकांवर हल्ले, वर्णद्वेषी व्यवहार आणि एलजीबीटी समुदायाशी निगडित मुलींशी गैरवर्तन होण्याचे प्रकार मुलींना प्रामुख्याने पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर आपल्याला आणि आपल्या मैत्रिणींना शारीरिक हल्ल्याचीही भीती वाटत असल्याचे २२ टक्के मुलींनी नमूद केले आहे.

महसूलचे अधिकारी-कर्मचारी जाणार सामुहिक रजेवर

सायबरच्या या मायावी जगात स्क्रीनच्या आड लपलेल्या विकृत मानसिकतेच्या पुरुषाच्या वाईट व्यवहारामुळे महिलांची मन:शांती हरवली आहे, हे खरोखर दु:खद आहे. विचार मनोकळेपणाने मांडण्यासाठी असलेल्या या मंचांवर मुलींना विनाकारण भावनिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे एकतर त्यांना व्यक्त होणे बंद करावे लागत आहे किंवा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून व्यक्त व्हावे लागत आहे. परिणामी, आभासी मंचांचा दुरुपयोग तर सुरूच राहतो; शिवाय महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण होतो. ऑनलाईन विकृतीचा बळी ठरलेल्या मुलींपैकी निम्म्या मुलींना शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराची धमकी दिली जाते, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

अशा विकृत वर्तनामुळे आपल्याला मानसिक धक्का बसल्याचे सर्वच मुलींनी सांगितले तर एक चतुर्थांश मुलींना शारीरिकदृष्ट्या आपण असुरक्षित आहोत, असे वाटू लागले. या पार्श्वभूमीवर, हे व्हर्च्युअल शोषण महिलांची मानसिक स्थिती किती मोठ्या प्रमाणात बिघडत असेल, याची सहज कल्पना करता येते. एखाद्या विचारपूर्वक केलेल्या पोस्टवरसुद्धा धमक्या, अपशब्द, अभद्र टिप्पणी आणि अन्य अनेक प्रकारच्या नकारात्मक बाबी प्रतिक्रिया म्हणून पाहायला मिळतात, हे अत्यंत पीडादायक आहे. सायबर विश्वात संचार करणा-या सर्वच वयोगटातील महिलांना या समस्येचा मुकाबला करावा लागत आहे. शाळेत जाणा-या मुलींपासून प्रौढ महिलांपर्यंत, व्यवसायापासून राजकारणाशी संबंधित महिलांपर्यंत, सिनेमाशी संबंधित महिलांपासून सर्वसामान्य गृहिणींपर्यंत सर्वांनाच या सायबर विकृतीचा सामना करावा लागतो आहे.

गेल्या काही दिवसांत असे दिसून आले आहे की, ऑनलाईन विकृतीला कोणतीही सीमाच राहिलेली नाही. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा परफॉर्मन्स सातत्याने खराब राहिला. त्यानंतर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या टीका-टिप्पणीला कोणताही स्तर किंवा दर्जा नव्हता. एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या मुलीविषयी केली गेलेली टिप्पणी अत्यंत विचित्र आणि संतापजनक होती. सोशल मीडियावर ट्रोलर मंडळींनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पाच वर्षांच्या त्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचीही धमकी दिली.

नळदुर्ग येथे निघाला मनसेचा भव्य महिला मोर्चा

धोनीच्या मुलीबद्दल अशा प्रकारची धमकी देणा-या व्यक्तीची मानसिक स्थिती किती विचित्र असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एका कोवळ्या मुलीकडे अशा नजरेतून पाहून इतकी भीतीदायक धमकी देण्याचे धारिष्ट्य या मंडळींना होतेच कसे? विचार करण्याची शक्ती गमावून केल्या जाणा-या अशा बीभत्स कमेन्ट सोशल मीडियावर सातत्याने सुरूच आहेत. इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल क्रांतीमुळे सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या काळात युजर्स आपला बराचसा वेळ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर व्यतीत करतात. परंतु राजकीय चर्चा, व्यक्तिगत अपडेट्स, अनेक विषयांवर केले जाणारे मतप्रदर्शन आणि उपयुक्त विचारविनिमय याऐवजी हा घाणेरडा कोलाहलच अधिक प्रमाणात बघायला मिळतो.

माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उपलब्ध असलेले हे मंच सध्या महिलांच्या मानसिक छळणुकीचे अड्डे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ट्रोलिंग असो किंवा असहमती दर्शविण्याचा असभ्य मार्ग असो, डिजिटल छळणुकीच्या या दुनियेत महिलांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येते. कधी अत्याचार करण्याची धमकी तर कधी शिवीगाळ, कधी फोटोमध्ये हवे तसे आपत्तीजनक बदल करून बदनामी तर कधी महिलांच्या कामाच्या क्षेत्राशी संबंधित अभद्र टीका-टिप्पणी… या मायावी सायबर दुनियेत स्क्रीनच्या पलीकडे लपलेला विकृत पुरुष महिलांची शांतता आणि सुरक्षिततेला धोकादायक ठरतो आहे. ऑनलाईन माध्यम या नात्याने महिलांना व्यक्त होण्यासाठी हा मीडिया सशक्त माध्यम उपलब्ध करून देत आहे हे खरे; परंतु महिलांच्या सुरक्षिततेला धोका असणारे सोशल मीडियाचे अनेक पैलू आता दररोज समोर येत आहेत.

सोशल नेटवर्किंगच्या साईट्स या एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि नवनवीन विचार तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मंच आहेत. परंतु काही लोक दुर्दैवाने या मंचचा गैरफायदा घेत आहेत. या माध्यमाद्वारे दोस्ती करून फसवणुकीची प्रकरणे, गैरव्यवहार, वाईट वर्तन, फोटोंचा दुरुपयोग आणि ट्रोलिंग असे धोके महिलांसाठी अधिक खतरनाक ठरले आहेत. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी मनेका गांधी यांनी ऑनलाईन बिहेविअर संहिता बनविण्याचा विषय लोकांसमोर आणून महिलांच्या सोशल मीडिया ट्रायलचा मुद्दा गुन्ह्यांच्या वर्गवारीत आणण्याची मागणी केली होती. कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक, अभद्रता, अश्लीलता सहन न करण्याचा मुद्दा या मागणीत अंतर्भूत होता.

थरार सीसीटीव्हीत – प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीची दिवसा ढवळ्या हत्या!

वास्तव दुनियेत असुरक्षितता आणि अपमान हे स्त्रियांच्या वाट्याला नेहमी येतच असतात. परंतु ऑनलाईन दुनियेतसुद्धा ट्रोलिंग, शिवीगाळ, धमकावण्याचे प्रकार आणि वाईट व्यवहार यामुळे महिला तणावाखाली येऊन त्यांना असुरक्षित वाटू लागते आणि अनेक महिला तर मानसिक आजारांनाही बळी पडतात. आत्मनियमन आणि सकारात्मक संवाद यांची समज सर्वांनाच असणे गरजेचे आहे. त्यासाठी एक निर्धारित मार्गदर्शक नियमावली (गाईडलाईन) तयार करणे आत्यंतिक गरजेचे आणि तातडीचे बनले आहे.

प्रा. शुभांगी कुलकर्णी

ताज्या बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

आणखीन बातम्या

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

‘एमडीएच’चे महाशय गुलाटी यांचे निधन

नवी दिल्ली : मसाल्यांचे बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे गुरूवारी निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे...

आघाडीचा ‘बाजीगर’

राजकारणात ज्याला राजकीय हवामानाचा अचूक अंदाज येतो त्याला चाणाक्ष नेता म्हणून ओळखले जाते. अनेकांना हा अंदाज येतो; परंतु त्याआधारे मोर्चेबांधणी करता येत नाही. पण...

शीघ्र कृतीची गरज

पिण्याच्या पाण्याची समस्या भारतात आजही गंभीर आहे. लोकसंख्येचा सातत्याने वाढता दबाव आणि भूगर्भातील पाण्याचा अतोनात उपसा या समस्यांबरोबरच जलसंरक्षणाचे कोणतेही ठोस धोरण नसल्यामुळे पिण्याच्या...

आता तरी प्रतिमा सुधारेल?

राज्य सरकारची अनुमती असल्याखेरीज केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कोणत्याही राज्यात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू करू शकत नाही. केंद्र सरकारसुद्धा राज्याच्या अनुमतीखेरीज तपासाला मंजुरी...

शीतलताई, थोडं थांबायला हवं होतं…

डॉ. शीतल आमटे या जेमतेम चाळीशीच्या उमद्या सामाजिक मनाला स्वत:ला संपवावे वाटले. बाबा आमटे आणि आमटे परिवाराचा अविरत आणि नि:स्पृह समाजसेवेचा वसा बाळकडू म्हणून...

विराटची पितृत्वरजा : गैर काय?

भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर १९७६ मध्ये न्यूझिलंडमध्ये एका मालिकेत खेळण्यासाठी गेला होता. त्याचदरम्यान त्याला आपला मुलगा रोहन गावसकरच्या जन्माची बातमी समजली. साहजिकच गावसकरला...

रोगप्रतिकारक मंजिष्ठा वनस्पती

मंजिष्ठ ही प्रतानरोही वेल उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळ असलेली आहे. या वेलीचे मुळस्थान भारतातील असून भारतातील दाट जंगलात सामान्यपणे आढळते. सामान्यात: ही...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...