16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeविशेषकडुलिंबाचा रस

कडुलिंबाचा रस

एकमत ऑनलाईन

कडुलिंब वनस्पती निसर्गाने दिलेला विविध आयुर्वेदीक औषधीचा खजीना मानला जातो. प्रामुख्याने या झाडाची पाने, फुले, फळे, बिया आणि साल हे भाग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे कडुलिंबाचे झाड हे एक निसर्गाने दिलेले वरदान आहे. या झाडाला आयुर्वेदामध्ये नीम नारायण असे म्हणतात. शुध्द हवेपासून ते अनेक असाध्य आजार कडुलिंबामुळे बरे होतात. कडुलिंबाची पाने चावून खाल्ली जातात किवा ताजी पाने बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करून रसाच्या रूपातही सेवन केला जातो.

कडुलिंबाच्या पानाचा रस चवीला कडू असला तरी त्याच्या सेवनाने अनेक शारिरीक समस्या टाळण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होते. कडुलिंबाच्या पानाच्या रसात अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. जे आपले शारिरीक आरोग्य चांगले राहण्यासाठी अत्यंत फायदेशिर आहे. कडुलिंबाच्या पानात किंवा पानाच्या रसात बुरशी विरोधी आणि जिवाणू विरोधी घटक असतात. त्यामुळे कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे अनेक संसर्गजन्य आजार बरे होतात. आपल्या शरीरातील अंतर्गत व्याधीपासून ते त्वचेच्या विविध आजारापर्यंत कडुलिंबाची कोवळी पाने चावून खाल्ली तरी आपले आरोग्य चांगले राहून आपल्याला कोणताही आजार होत नाही. ४ प्रतिकारशक्ती : ब-याच वेळा आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो.

त्यामुळे आपली रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी कडुलिंबाची गडद हिरवी व ताजी पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा रस तयार करावा. हा तयार केलेला १५ ते २० मिली रस पाण्याबरोबर सेवन करावा. या पानामध्ये जीवनसत्व क असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्या शरीराला आतून मजबूत करते. या रसाचा कांही दिवस नियमितपणे सेवन केल्यास शरीराचे सर्व अवयव सुरळीतपणे कार्य करते. ४मधुमेह : कडुलिंब पानाचा रस सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत होते. त्यामुळे या पानाचा रस मधुमेही रूग्णांसठी अत्यंत फायदेशिर असते. या पानामध्ये मधुमेह विरोधी (अ‍ॅन्टी- डायबेटिक) गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनच्या क्रियाकल्पावर परिणाम होतो. यामुळे साखरेचा स्तर नियंत्रणात राहतो. त्यासाठी कडुलिंबाची ताजी पाने किंवा त्याचा रस नियमितपणे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रीत राहण्यास मदत होते. ४ वजन नियंत्रण :- कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. या रसामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण भरपूर असते. तसेच कडुलिंबाच्या रसात टॅनिन सुध्दा आढळते. ज्यामुळे भूक लवकर लागत नाही व पर्यायाने वजन कमी होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करावयाचे आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचा रस मध व लिंबु मिसळून सेवन करावा किंवा ताजी पाने चावून खावीत.

४ ल्युकोरिया :- ब-याच वेळा महिलांच्या योनीमधून वारंवार सफेद किंवा पिवळ्या रंगाचा पाण्यासारखा पातळ द्रवपदार्थ बाहेर पडतो. समस्या सामान्य वाटत असली तरी गरोदरपणात कांहीशी गंभीर स्वरूपाची असू शकते. ४ पोशाचे आजार :पोटाशी संबंधीत विविध आजारासाठी कडुलिंबाची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. त्यासाठी कडुलिंबाची हिरवी व ताजी पाने बारीक वाटून त्याचा रस तयार करावा व दररोज सेवन करावा. ज्यामुळे पोटातील जंत मरून जातात तसेच विषारी व घाण पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा रस पिल्यास गॅस, अपचन व पोटाचे इतर आजार होत नाहीत. ४ कावीळ :- या आजारामध्ये रक्तार्त बिलिरुबीनचे प्रमाण वाढते व त्यामुळे डोळयात पिवळेपणा येतो तसेच बाहय त्वचा पिवळी दिसते व लघवी गडद पिवळ्या रंगाची होते. यावर कडुलिंबाच्या पानाचा रस अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी ताजी व गडद हिरव्या रंगाची पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. या २० मिली रसात १० मिली मध मिसळून दररोज नियमितपणे कांही दिवस सेवन केल्यास कावीळ कमी होण्यास मदत होते. ४ हिवताप :- हा आजार प्रामुख्याने डास चावल्यामुळे होतो. ज्यामध्ये प्लाझ्मोडियम परजिवी असतात. हिवताप हा आजार मलेरिया नावाने सुध्दा ओळखला जातो.

ज्यामध्ये थंडी वाजून ताप येतो. अंग दुखणे, ताप कमी अधिक होणे, डोके दुखणे आणि मळमळ किंवा उलटया होणे अशी लक्षणे दिसतात. त्यासाठी कडुलिंबाच्या पानाचा रस पाण्याबरोबर दररोज सेवन करावा त्यामुळे विषाणूच्या वाढीस प्रतिबंध होतो व यकृताचे कार्य करण्याची क्षमता वाढून कावीळ कमी होतो. ४ प्रसुती वेदना:- कडुलिंबाचा रस गर्भधारणे दरम्यानच्या योनी मार्गातील वेदना कमी करण्यास अत्यंत उपयोगी आहे. अनेक महिला प्रसुती दरम्यान होणा-या वेदनापासून आराम मिळण्यासाठी कडुलिंबाच्या पानाच्या रसाने मसाज करतात. त्याचबरोबर बाळाच्या जन्मानंतर कडुलिंबाच्या पानाचा रस कांही दिवस सेवन केल्याने गर्भाशयाच्या आजूबाजूच्या अवयवांना आलेली सुज कमी होण्यास फायदा होतो. तसेच भूक मंदावते व जुलाब दूर होतात आणि ताप येत नाही. आला तर त्याचा वेग जास्त असत नाही. ४ वृश्चिक दंश : विंचु चावल्यावर अस वेदना होतात यावर कडुलिंबाच्या पानाचा रस अत्यंत गुणकारी औषध आहे. त्यासाठी कडुलिंबाची ताजी पाने बारीक वाटून किंवा चांगली चोळून त्याचा लगदा (पेस्टी) तयार करावा. हा तयार केलेल्या लगदा विंचू चावल्याने प्रभावीत झालेल्या भागावर लेप करावा. यामुळे जळजळ कमी होते व विषाचा प्रभाव हळुहळु कमी होऊन लवकरात लवकर आराम मिळण्यास फायदा होतो.

४ कॉलरा : हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार असून जीवाणूच्या संसर्गामुळे अन्न नलिका व आतड्यामध्ये विषजन्य प्रथिने निर्माण झाल्यामुळे होता. यालाच पटकी किंवा महामारी सुध्दा म्हणतात. यामध्ये जुलाब आणि उलट्या होणे, तहान लागणे व अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसतात. त्यासाठी कडुलिंबाचा पानाचा २० मिली रस अर्धा ग्लास पाण्यात मिसळून नियमितपणे कांही दिवस सेवन केल्याने कॉलरा बरा होऊन आराम मिळतो. ४ डोळ्याची दृष्टी :-कडुलिंबाच्या पानाचा रस आपल्या डोळ्याच्या दृष्टी वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ब-याच वेळी डोळ्यात दाह आल्यामुळे दृष्टी कमकुवत होते. त्यासाठी कडुलिंबाची ताजी व गडद हिरव्या रंगाची पाने व बारीक वाटून त्याचा रस तयार करून गाळून घ्यावा. ४ कांजण्या : कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून विषाणूच्या संसर्गामुळे होतो. प्रामुख्याने रूग्णांच्या शिंका, लाळ, खोकला, दृष्ति कपड्याच्या संपर्कात आल्यामुळे दुस-या व्यक्तींना होतो. या आजारात अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे पुरळ येऊन खाज सुटते व त्याठिकाणी काळसर डाग दिसतात. तसेच ताप येणे, सर्दी-खोकला येणे, भूक मंदावणे व डोकेदुखीची लक्षणे दिसतात त्यासाठी कडुलिंबाच्या पानाच्या रसाने प्रभावीत भागावर मसाज करावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या