27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी सातव्यांदा विराजमान झालेल्या नितीशकुमारांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि जागा, तसेच निसटता विजय मिळालेल्या जागांचा विचार करता त्यांनी आपला करिष्मा गमावला आहे. भाजपने त्यांच्या कुबड्यांवर प्रवासाला सुरुवात करून आता त्यांना आपल्या कुबड्यांवर आणले आहे. मित्रपक्ष म्हणून असलेली विश्वासार्हताही गमावलेल्या नितीशकुमारांना ‘सुशासन बाबू’ हा जनतेने हिरावलेला किताब परत मिळविण्यावाचून आता गत्यंतर नाही.

एकमत ऑनलाईन

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार यांच्यासोबत नसताना आणि ते सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना ते, त्यांचा जदयू हा पक्ष आणि एनडीए ही राजकीय आघाडी या ना-यातील शब्द सार्थ ठरवू शकलेली नाही. कारण बिहारमध्ये बहार असती, तर त्यांच्या आघाडीला बहुमतापेक्षा तीन जास्त, एवढ्याच आमदारसंख्येवर समाधान मानावे लागले नसते. एनडीएचे दोन घटकपक्ष बिहारमध्ये वाढलेले असताना ही स्थिती आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार हेच एकटे आश्वासक नेते असते तर लालूप्रसाद यादवांच्या जंगलराजची छाया असूनसुद्धा महाआघाडीला ३७.२३ टक्के मते मिळाली नसती. हा आकडा एनडीएला मिळालेल्या एकंदर मतांपेक्षा अवघा ०.०३ टक्क्यांनी कमी आहे. एनडीएला एकूण ३७.२६ टक्के मते मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर तेजस्वी यादव यांचा राजद हा पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. त्यांच्या पक्षाला ७५ जागा मिळाल्या असून, २३.१२ टक्के मते एकट्या राजदच्या हाती गवसली आहेत. भाजपला राजदपेक्षा एकच जागा कमी मिळालेली असली, तरी मतांच्या बाबतीत भाजपला १९.४६ टक्क्यांवरच समाधान मानावे लागले आहे. नितीशकुमारांच्या खात्यात ४३ जागा आणि १५.३९ टक्के मते जमा झाली आहेत.

नितीश कुमार यांची ही आतापर्यंतची सर्वांत खराब कामगिरी ठरली आहे. २००० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा त्यांच्याकडे ३४ आमदार होते. २००५ मध्ये त्यांच्या पक्षाचे ८८ आमदार निवडून आले होते. २०१० मध्ये जदयूचे ११० आमदार निवडून आले होते तर २०१५ मध्ये पुन्हा हा आकडा ७१ वर घसरला होता. त्यावेळी ते लालूप्रसादांच्या राजदसोबत निवडणूक लढले होते. नितीशकुमार, लालूप्रसाद आणि मोदी हे सत्तरच्या दशकातील विद्यार्थी आंदोलनातून सार्वजनिक जीवनात आलेले चेहरे आहेत. त्यांच्या अवतीभोवतीच बिहारचे राजकारण आजअखेर फिरत राहिले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे विश्लेषण करायचे झाल्यास ती नितीशकुमार यांच्याप्रमाणेच निराशाजनक आहे. भाजपला १९.४६ टक्के मते आणि ७४ जागा मिळाल्या आहेत. २०१५ मध्ये पक्ष स्वबळावर लढला होता तेव्हा ५३ जागा आणि २४.४ टक्के मते मिळाली होती. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर भाजपला २३.५८ टक्के मते आणि १७ जागा मिळाल्या होत्या.

नांदेडात कोरोनाचा आलेख वाढला

बिहारमध्ये खरोखर नितीशकुमारांची बहार आहे का, हे समजून घेण्यासाठी काही जागांचे निकाल पाहावे लागतील. हिलसा मतदारसंघातून त्यांच्या पक्षाचे कृष्णमुरारी शरण १२ मतांनी विजयी झाले आहेत. बाराबिघा मतदारसंघातून जदयूचे सुदर्शनकुमार ११३ मतांनी जिंकले आहेत. रामगढमध्ये सुधाकर सिंह १८९ मतांनी, तर भोरेमधून सुनील कुमार हे जदयूचे उमेदवार ४६२ मतांनी विजयी झाले आहेत. बछवाडा मतदारसंघातून भाजपचे सुरेंद्र हे ४८४ मतांनी निवडणूक जिंकले आहेत तर परबत्ता येथून जदयूचे डॉ. संजीव कुमार हे ९५१ मतांनी विजयी झाले आहेत. ही ‘कामगिरी’ दुर्लक्षित करता येण्याजोगी नाही. अर्थात, नितीशकुमारांनी बिहारवरील जंगलराजचा शिक्का पुसला आणि विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. २००४-०५ मध्ये बिहारमधील गरिबीचा दर ५४.४ टक्के होता तर सध्या हा दर ३३.७४ टक्के इतका कमी झाला आहे. नितीशकुमारांच्या कार्यकाळात शहरीकरणाचा वेग सर्वांत कमी होता आणि हा सुशासन आणि विकासाचा निदर्शक मानला जातो.

नितीश यांच्या काळात ग्रामीण खर्चात ७१० रुपये एवढी मासिक वृद्धी झाली तर शहरी विभागात लोक दरमहा ८११ रुपये अधिक खर्च करू लागले. व्यवसाय सुलभीकरणात ६५.५ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. दरडोई उत्पन्न (जीएसडीपी) २००५ मध्ये ८७७३ होते ते २०१९ पर्यंत वाढून ४७५४१ झाले आहे. म्हणजेच बिहारमधील प्रतिव्यक्ती उत्पन्न ३८७६८ रुपयांनी वाढले आहे. एनएसडीपीच्या आकडेवारीनुसार २००५ मध्ये बिहारमधील प्रतिव्यक्ती उत्पन्न ७९१४ होते, ते २०१६-१७ मध्ये २५९५० झाले आहे. म्हणजेच, या आकडेवारीनुसार १८०३६ रुपयांची वाढ झाली. परंतु ‘सुशासनबाबू’ म्हणून परिचित असणा-या नितीशकुमारांच्या बाबतीत बिहारच्या जनतेने ही आकडेवारी मतदानावेळी महत्त्वाची मानली नाही. एवढेच नव्हे तर काही जणांच्या मते, एनडीएला महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केले आहे, अशीही चर्चा अनेकांनी केली.

नांदेडात कोरोनाचा आलेख वाढला

परंतु कमीत कमी दहा मतदारसंघ असे आहेत जिथे पुरुषांच्या तुलनेत महिलांनी सर्वांत कमी मतदान केले आहे. एकंदर २४३ मतदारसंघांपैकी १६६ ठिकाणी महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक संख्येने मतदान केले आहे. विशेषत: सीमांचल, तिरहुत, कोसी आणि मिथिलांचल भागातील महिला सर्वाधिक संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या. सीमांचलचा विचार करता ओवैसी यांचा एमआयएम, राजद, काँग्रेस आणि भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) या पक्षांना महिलांनी घसघशीत मतदान केल्याचे दिसते. त्याच वेळी तिरहुत आणि सारण या भाजपच्या प्रभावक्षेत्रातील महिलांनी एकतर्फी मतदान केलेले नाही.

आकडेवारी पाहिली असता, बायसी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ७५.३८ टक्के महिलांनी मतदान केले होते तर पुरुषांच्या मतदानाचा आकडा ५४.६३ टक्के होता. म्हणजेच महिलांच्या मतदानाचे प्रमाण २१.७५ टक्के अधिक राहिले. या ठिकाणी ओवेसी यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. आमौर विधानसभा मतदारसंघात महिलांची मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा २०.५२ टक्क्यांनी अधिक होती. तिथेही ओवेसी यांच्या पक्षाचा विजय झाला. त्यानंतर बदलापूर मतदारसंघात महिलांनी पुरुषांच्या तुलनेत १८.९४ टक्क्यांनी अधिक मतदान केले. येथून भाकप (मा-ले) पक्षाचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर हसनपूर येथील महिलांनी पुरुषांच्या तुलनेत १७.५ टक्के अधिक संख्येने मतदान केले. या मतदारसंघात राजदचे तेजप्रताप यादव निवडून आले आहेत.

जोकिहाटमध्ये मतदान करणा-या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी अधिक आहे. कसवामध्ये पुरुषांपेक्षा १८ टक्के अधिक संख्येने महिलांनी मतदान केले. परंतु येथून काँग्रेसने निवडणूक जिंकली. निर्मली मतदारसंघातून पुरुषांच्या तुलनेत १७ टक्के अधिक महिलांनी मतदान केले होते आणि तेथून जदयूने निवडणूक जिंकली. भागलपूर, बांका, लखीसराय आणि मुंगेर जिल्ह्यांत महिलांनी पुरुषांच्या तुलनेत दोन-तीन टक्क्यांनी अधिक संख्येने मतदान केले असून, तिथे भाजप आणि जदयूला चांगले यश मिळाले आहे. पटनासाहिब मतदारसंघात महिला सर्वांत कमी संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या. तेथील ५७.०३ टक्के पुरुषांनी आणि ४६.९५ महिलांनी मतदान केले. या ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. त्याचप्रमाणे दीघा, बाकपूर, कुम्हरार, बाढ, बिहार शरीफ, कटिहार, पूूर्णिया, सहरसा, दरभंगा, छपरा, हाजीपूर यांसह सुमारे डझनभर जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा कमी संख्येने मतदान केले आणि तिथे भाजप, जदयूने विजय प्राप्त केला आहे.

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला लोकशाही दाखविली

नालंदा या नितीश कुमार यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात हरनौत, हिलसा, इस्लामपूर, राजगीर या जागांवर पुरुषांनी अधिक संख्येने मतदान केले असून, जदयूला विजय प्राप्त झाला आहे. म्हणजेच, महिला उमेदवारांनी एनडीएला भरभरून मतदान केले ही ‘थिअरी’ सपशेल चुकीची आहे. ‘‘मुख्यमंत्री भाजपचा व्हावा असे मला वाटते; पण भाजप नेत्यांच्या निर्देशानुसार मी मुख्यमंत्रिपद स्वीकारत आहे,’’ असे नितीशकुमारांना म्हणावे लागले, यातच सर्वकाही आले. हे वक्तव्य त्यांची ताकद नव्हे तर अगतिकता दर्शविणारे आहे. आपली आणि आपल्या पक्षाची उंची खूपच घटली आहे, तो भाजपपेक्षाही छोटा पक्ष बनला आहे, याचा अंदाज नितीशकुमारांना आलेला आहे. म्हणूनच एनडीएने जेव्हा त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली, त्यानंतर माध्यमांना सामोरे जाताना ना त्यांच्या चेह-यावर आनंद होता, ना आवाजात उत्साह! कारण सुशील मोदी यांना दूर ठेवून भाजपने केलेले बदल नव्या दिशेचा संकेत देणारे आहेत. तारकिशोर प्रसाद वैश्य आहेत तर रेणु कुमारी या नोनिया समाजातील आहेत. सुशील मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होईल तेव्हा तेथे स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भाजप कमी भावनिक आणि अधिक व्यावहारिक आहे. म्हणूनच मोदींना पंतप्रधान करण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्यामुळे नाराज असलेल्या नितीशकुमारांना पुन्हा एनडीएचा हिस्सा बनविण्यात आले. कारण सुशील मोदी यांनी भाजपला बिहारमध्ये जदयूच्या कुबडीवर उभे केले होते आणि त्यामुळे काही काळ नितीश कुमारांसोबत चालण्यावाचून भाजपकडे गत्यंतरही नव्हते. या छोट्याशा प्रवासातच भाजपने नितीशकुमारांना आपल्या कुबडीवर आणून ठेवले. दुसरीकडे ‘सुशासन बाबू’ हा नितीश यांचा किताब जनतेने परत घेतला आहे.

योगेश मिश्र
ज्येष्ठ विश्लेषक-स्तंभलेखक

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या...

दीदींना ‘टक्कर’

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

जैविक शेतीकडे वळूया

कोरोना विषाणूचा मुकाबला करणा-या जगाला विषाणूंचे दुष्परिणाम पुरेपूर समजले आहेत. अशा वेळी आपण आपल्या मुळांकडे वळायला हवे आणि निसर्गाचा समतोल राखणे हा संस्कृतीचा भाग...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...