36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषआता तर खांदा द्यायचीसुद्धा हक्क हिरावला

आता तर खांदा द्यायचीसुद्धा हक्क हिरावला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो, पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना मदतीचा हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते.

माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत… ? खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाºया माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला अंत्यविधी केल्याशिवाय राहणार नाहीत, पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत़ जीवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणा-या अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल़ माणसांच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत नानाप्रकारचे संसर्गजन्य, साथीचे आजार पाहिले, अनुभवले आहेत.

अत्यंत कठीण काळालाही त्यांनी धैर्याने सामोरे जात त्यावर मात केलेली आहेच़ प्लेग (पटकी-माणसांच्या काखेत किंवा जांघेत गाठ यायची आणि माणुस काही क्षणातच मरायचा) हा रोग आताच्या ५० ते ६० वर्षे वयाच्या पिढीच्या अधीच्या पिढीने अनुभवलेला एक महाभयंकर जीवघेणा रोग होता़ घरातला एकजण मेला की त्यावर अंत्यविधी करुन परत घरी येईपर्यंत दुसरा मेलला असायचा़ अखी गावची गाव या रोगाने संपली पण माणुसकी जीवंत राहिली होती, असं आजही त्या रोगाशी यशस्वीपणे लढा दिलेली ज्येष्ठ माणसं सांगतात.

कसा असे तो काळ? ज्या काळात ना वैद्यकीय सेवा सुविधा होत्या ना दळणवळणाच्या़ तरीही त्याकाळातील माणसांनी केवळ माणुसकीच्या बळावर त्या महाभयंकर रोगावर मात केली़ संकटातील माणसांना समर्थपणे साथ दिली, एकमेकांच्या सुख-दुखात तितक्याच आत्म्यितेने सहभागी होत आलेल्या प्रसंगाशी लढा दिला़ एकवेळ आपण समजू की, त्याकाळात वैद्यकीय क्षेत्राचा विकास झालेला नव्हता, सुविधा नव्हत्या़ पण आजतर सर्व काही आहे पण माणुसकीच हरवत चालली की काय?,
असे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन दिसायला लागले आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग जितका व्यापक होत चालला आहे तितकी माणुसकी खुजी होत चालली आहे़ एखाद्या वयक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर त्याची होणारी हेळसांड माणुसकीला काळीमा फासण्याच्या पलिकडची असते, हे एक ना अनेक घटनांमुळे समोर आले आहे़ पटकीने मेलेल्या माणसाला किमान खांदा तर देता येत होते, आता करोनाने तो हक्कसुद्धा हिरावून घेतला आहे़ ही बाब लक्षात घेता किमान माणुसकी तरी जीवंत राहावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरु नये.

Read More  सोलापुरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या