20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

एकमत ऑनलाईन

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर मागच्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या नाराजीची, संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू होती. पण त्यांचा उभी हयात घालवलेल्या पक्षातून पाय निघत नव्हता. आज नाही उद्या आपल्या आजवरच्या योगदानाची दखल घेऊन पुनर्वसन होईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांच्या दिल्लीत चकराही सुरू होत्या.

पण दिल्लीतील काही हितचिंतकांनी तुम्हाला आता पक्षात भवितव्य राहिलेले नाही असे स्वच्छपणे सांगितल्यावर खडसे यांनी अखेर निर्णय घेतला व राष्ट्रवादीत दाखल झाले. पक्ष किंवा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घाणेरड्या राजकारणाला व छळवादाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणा-या खडसे यांची राजकीय घसरण का झाली? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील एक स्पर्धक कमी करण्यासाठी फडणवीस यांनी त्यांचा काटा काढला, की खडसे यांनी स्वत:च आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला? याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत व ती स्वाभाविक आहेत. मात्र खडसे यांनी पक्ष सोडलेला नाही, तर त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडले गेले.

खडसे यांच्याही काही चुका आहेत, पण पक्षासाठी हयात घालवणा-या नेत्याची गेल्या चार वर्षांत जी अवहेलना झाली ती व्हायला नको होती असे म्हणणारांची संख्या खूप मोठी आहे. पक्षाच्या निष्ठावंत व जुन्या नेत्यांची अस्वस्थता यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. २०१४ नंतर भाजपच्या राजकारणाचा पोत पूर्णत: बदलला असून जुने नेते बदललेल्या राजकारणात ‘समृद्ध अडगळ’ झाली आहे. काहींनी आपली अडगळ होतेय हे लक्षात घेऊन मार्गदर्शक मंडळाचे सदस्यत्व विनातक्रार स्वीकारले. काहींनी जुळवून घेऊन काही काळासाठी ‘राजभवनात’ व्यवस्था लावून घेतली. काहींनी या नव्या स्वरूपाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने आयुष्य घालवले त्या पक्षातून बाजूला जाणे स्वीकारले किंवा त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडले गेले.

सॅमसंगच्या चेअरमनचा हृदयविकाराने मृत्यू

या यादीमध्ये एकनाथ खडसे या आणखी नावाची भर पडेल, अशी अटकळ कोणी बांधली असेल तर त्यांचा अंदाज चुकू शकतो. कारण खडसे इतरांप्रमाणे सरळ वानप्रस्थाश्रमात जाणार नाहीत. तिकडे पाठवणा-यांना तसे सोडणार नाहीत. हातात असलेल्या सत्तेच्या बळावर तुम्ही मला त्रास दिलात, माझी ‘ईडी’ लावलीत, तर मीही तुमची ‘सीडी’ लावेन, असा गर्भित इशारा देऊन त्यांनी याचे सूतोवाच केले आहे.

खडसेंना मात्र क्लीन चिट नाहीच!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीने देशाचे राजकारण बदलून टाकले. भाजपला लोकसभेत स्वत:चे बहुमत मिळाल्याने रालोआमधील मित्रपक्षांची आवश्यकता उरली नाही. ज्यांच्या मदतीने महाराष्ट्रात पक्षाची पाळेमुळे रुजवली त्या शिवसेनेचीही गरज उरली नाही. त्यामुळे दोन दशकांची युती मोडून स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. तो थोडक्यात हुकला. तरी राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे सत्ता स्थापण्याची संधी मिळाली. आधीची पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारविरुद्ध घनघोर संघर्ष करणारे एकनाथ खडसे यांना आपल्याकडे सरकारचे नेतृत्व येईल असे वाटत होते. परंतु ‘दिल्लीत नरेंद्र-महाराष्ट्रात देवेन्द्र’ हे सूत्र आधीच ठरलेले होते. दिल्लीतून निर्णय झालेला होता. खडसे नाराज झाले.

१३ खाती देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. पण आपल्याला डावलले गेल्याचे व आपल्यापेक्षा अत्यंत ज्युनिअर असलेल्या फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद दिल्याचे शल्य खडसे यांना होते. भाजपचे बदललेले स्वरूप, मोदी-शहा यांचा शब्द हा अंतिम असल्याचे वास्तव खडसे यांनी स्वीकारले नाही. तेथून त्यांच्या राजकारणाची उतरण सुरू झाली. त्यातच भोसरी जमीन प्रकरण आले. जमीन व्यवहाराची नोंदणी करणारांनासुद्धा कागदपत्र मिळायला वेळ लागतो. पण त्याआधी मीडियापर्यंत कागदपत्रं पोचली व खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. चौकशांचा ससेमिरा मागे लागला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर आरोप झाले. त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देऊन त्यातून मुक्त केले. खडसे यांना मात्र शेवटपर्यंत क्लीन चिट मिळाली नाही. फडणवीसांशी संघर्ष करण्याऐवजी जुळवून घेतले असते तर कदाचित तेही दोषमुक्त झाले असते, असे सांगितले जाते. पण संघर्ष न करताही तावडे व बावनकुळे यांची अवस्था काही वेगळी झाली नाही. कुढत बसण्यापेक्षा अन्य पक्षात जाऊन लढण्याची भूमिका अखेर खडसे यांनी स्वीकारली आहे.

सॅमसंगच्या चेअरमनचा हृदयविकाराने मृत्यू

खडसेंमुळे आघाडीला बळ !
राज्यातील आघाडी सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळे कोसळेल असे दावे केले जात असताना खडसे यांच्या निर्णयामुळे भाजपातील अंतर्विरोध समोर आला आहे. राज्यातील आघाडी सरकारला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपकडे धाव घेतली होती. विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, मधुकरराव पिचड हे शरद पवारांचे खंदे सहकारी, पाच विरोधी पक्षनेते असणारे विखे पाटील असे अनेकजण भाजपाकडे गेले. पण त्यांचे अंदाज चुकले. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे ‘गयारामांमध्ये’ अस्वस्थता आहे. राज्यात केव्हाही सत्तांतर होऊन आपली सत्ता येईल, असे चित्र निर्माण करून अशा लोकांची अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न सुरू असतो.

परंतु आघाडी सरकारची पकड मात्र दिवसेंदिवस पक्की होताना दिसते आहे. भाजपात गेलेले काही आमदार परत येऊ इच्छितात, पण कोरोनाच्या संकटात पोटनिवडणूक नको म्हणून आम्हीच थोपवले असल्याचा दावा आघाडीतील तिन्ही पक्ष करतायत. खडसे यांच्या पाठोपाठ मीरा-भाईंदरच्या भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकारणाच्या बदलत्या हवेचे संकेत दिले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीत आणखी काही मोठे धक्के मिळतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. खडसे यांनी एक मार्ग दाखवला आहे व आघाडी सरकार जसजसे स्थिर होईल तसतशी या मार्गावरील वर्दळ वाढली तर नवल वाटण्याचे कारण नाही.

पायाचे दगड का निखळतायत?
एक काळ होता जेव्हा निवडणुकीत अनामत रक्कम वाचली तरी जिंकल्यासारखे वाटायचे. आज तोच पक्ष देशातच नव्हे तर जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष झाला आहे, असा उल्लेख भाजपाचे अनेक नेते वेळोवेळी अभिमानाने करत असतात. १९८४ साली ज्या पक्षाचे देशभरात केवळ दोन खासदार निवडून आले होते तो पक्ष २०१४ साली स्वबळावर बहुमत मिळवून केंद्रातील सत्तेत आला. २०१९ च्या निवडणुकीत त्यापेक्षा अधिक यश मिळवून सत्ता कायम राखली. स्वातंत्र्यापासून देशाची सत्ता हातात असलेल्या काँग्रेसचा सलग दुस-या निवडणुकीत मोठा पराभव तर झालाच, पण विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले १० टक्के खासदारही निवडून आणता आले नाहीत.

उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी लागणार २६८ कोटी

राममंदिराच्या मुद्यापासून सुरू केलेले ध्रुवीकरणाचे व बहुसंख्याकांचे राजकारण, नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन, प्रादेशिक पक्षातील गैरकाँग्रेसवाद, काँग्रेस नेतृत्वाचा ओसरलेला करिष्मा, अशा अनेक बाबींनी भाजपाच्या यशाला हातभार लावला. पण एवढ्या यशावर समाधान न मानता भाजपने विरोधी पक्ष पुन्हा आपल्या पायावर उभाच राहू शकणार नाही यासाठी ‘खुल्या आयातीचे’ धोरण स्वीकारून अन्य पक्षातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात आवक केली. यामुळे ज्या भागात आजपर्यंत भाजपचा झेंडाही लागत नव्हता तेथेही भाजपची सत्ता आली. ही वाढ नव्हे तर सूज आहे, तुमच्या झेंड्याखाली बसलेली सगळी मंडळी मूळची काँग्रेसची आहे, अशी टीका झाली. पण त्याची फारशी पर्वा न करता भाजपने पक्षाचा विस्तार सुरू ठेवला आहे. बाहेरून येणा-या लोकांना मोठमोठी पदं व महत्त्व मिळते आहे. आजच्या घडीची उपयुक्तता पाहून व्यावहारिक निर्णय घेताना नव्या-जुन्याचा ताळमेळ अनेकदा चुकतो.

यामुळे ज्यांच्या मेहनतीवर पक्ष उभा राहिला त्यांच्यातील अस्वस्थता वाढताना दिसत असून ती कमी करण्याकडे भाजपला पुढील काळात लक्ष द्यावे लागणार आहे. शाश्वतधर्मापेक्षा आपतधर्म व भाजप खुर्द पेक्षा आयारामांचे भाजप बुद्रुक अधिक मोठे होऊ देऊ नका, ही भाजपच्याच एका जुन्या नेत्यांची खाजगीतील प्रतिक्रिया खूप बोलकी व प्रातिनिधिक आहे.

अभय देशपांडे

उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी लागणार २६८ कोटी

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...