22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home विशेष कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

एकमत ऑनलाईन

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. कोरोनाच्या आजारावर कदाचित पुढील सहा महिन्यांत लस येईल असा अंदाज व्यक्त होत आहे. परंतु आर्थिक गाडी रुळावर यायला किमान दोन ते अडीच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. यामुळे एकूणच सर्वत्र चिंतेचे वातावरण असून समाजातील सर्वच स्तरांत, क्षेत्रांत अस्वस्थता आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने अडचणीत असलेल्या शेतक-यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना केंद्राच्या काही निर्णयांमुळे शेतकरीवर्गही अडचणीत आला आहे.

फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने कांद्यासह काही शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळल्याने शेतक-यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु या निर्णयाची शाई वाळण्यापूर्वीच केंद्राने पुन्हा कांद्यावर निर्यातबंदी घालणारा फतवा काढून शेतक-यांना दणका दिला आहे. याशिवाय कृषीविषयक तीन विधेयकं संसदेत संमत करण्यात आल्याने अनेक राज्यांत आंदोलने सुरू झाली आहेत. केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये सुधारणा केली असून यामुळे आता खाद्यपदार्थांच्या साठेबाजीला प्रतिबंध नसेल. याचा अर्थ व्यापारी आता धान्य, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाट्याचा अमर्याद साठा करू शकतील.

तसेच कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयकामुळे कृषीमाल बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी आणि विक्रीची मुभा मिळणार आहे. तर तिस-या विधेयकाद्वारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच करार शेतीला परवानगी दिली जाणार असून यामुळे मोठे व्यावसायिक आणि कंपन्या करारावर शेतजमीन घेऊन शेती करू शकणार आहेत. ही विधेयके वरकरणी शेतक-यांच्या फायद्याची वाटत असली तरी त्यामुळे असंघटित शेतकरीवर्ग भविष्यात अडचणीत येईल अशी भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे या विधेयकाला जोरदार विरोध सुरू झाला आहे.

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

कांदा धोरण, शेतक-यांच्या मुळावर!
कांद्याच्या दरवाढीमुळे खूप वर्षांपूर्वी भाजपला तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. तेव्हापासून बहुधा त्यांनी कांद्याचा धसकाच घेतला आहे. कोरोनामुळे तब्बल चार महिने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे शेतक-यांना फार मोठा फटका बसला. बाजारपेठा बंद व निर्यात ठप्प झाल्यामुळे नाशवंत माल शेतातच सडून गेला. आर्थिक अडचणीमुळे धान्यही मातीमोल भावाने विकावे लागले. वेळेत खरेदी न झाल्याने कापूस भिजला. पूरक व्यवसाय म्हणून संसाराला चार पैसे देणा-या दुधाचे भाव कमी झाल्याने चा-याचे पैसेही मिळणे कठीण झाले. अशा स्थितीत कांद्याला थोडा बरा भाव मिळत असताना सरकारने निर्यातीवर बंदी घालून भाव पाडले आहेत.

बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप होतो आहे. असंघटित शेतक-यांपेक्षा थोडी भाववाढ झाली की ओरड करणा-या मध्यमवर्गीयांच्या नाराजीला राजकीय पक्ष अधिक महत्त्व देतात हे यामुळे पुन्हा एकदा दिसून आले. कांद्याच्या दरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात फेरबदल होतात. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे दर पाच रुपये किलोपर्यंत घसरले होते. शेतक-यांना आपला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेतही घेऊन जाणे परवडत नव्हते. त्यामुळे अनेक शेतक-यांनी कांदा, टोमॅटो काढून बांधावर फेकून दिल्याचे दृश्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात तेव्हा तो चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत जातो. दोन वर्षांतील पडलेल्या व चढलेल्या दराची सरासरी काढली तर ग्राहकांना साधारणत: २० ते २५ रुपये दराने कांदा उपलब्ध होत असतो. पाचशे रुपये डझन दराने हापूस आंबा घेणा-या ग्राहकांना कांद्याला पन्नास रुपये द्यायला एवढा त्रास का व्हावा… बिसलरीच्या एक लिटर पाण्याला २० रुपये मोजणा-यांना दुधाला चाळीस रुपये द्यायला अडचण वाटण्याचे कारणच काय..? की सरकारने याबाबतीत नको तेवढी धास्ती घेतली आहे… शेतमालाचे दर थोडे जरी वाढले तरी सरकार खडबडून जागे होते.

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

कधी निर्यातीवर बंदी घालून तर कधी मोठ्या प्रमाणात आयात करून कांद्याचे दर पाडले जातात. त्यासाठी ज्या पाकिस्तानचा दिवस-रात्र उद्धार केला जातो त्यांचाही कांदा सरकारला वर्ज्य नसतो. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा एकीकडे केल्या जातात. मात्र दुसरीकडे कृषी धोरणे शेतकरी केंद्रित न ठेवता ग्राहक केंद्रित केली जातात. हा विरोधाभासच शेतक-यांबाबतचा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात पत राहील का?
सरकारच्या धरसोडीच्या धोरणाचा केवळ त्यावर्षीच नाही, तर पुढील काळातही शेतक-यांना फटका बसतो. भारतात साधारणत: दोनशे ते सव्वा दोनशे लाख टन कांद्याचे उत्पादन होते. देशाची गरज साधारणत: १७५ लाख टनांच्या आसपास आहे. साधारणत: एकूण उत्पादनाच्या केवळ दहा ते पंधरा टक्के कांद्याची निर्यात होते. मागच्या वर्षी सुमारे २१ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. इराण, पाकिस्तान आदी देशही कांद्याची निर्यात करतात. पण भारतीय कांद्याची प्रत व किंमत अधिक चांगली असल्याने त्याला मागणी अधिक आहे.

पण सरकारच्या धरसोडीच्या धोरणांमुळे भारतीय पुरवठादारांकडून कांदा मिळणार की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे दीर्घकालीन करार करता येत नाहीत. त्याचा लाभ भारतीय निर्यातदारांना व पर्यायाने शेतक-यांना मिळत नाही. तत्कालीन राजकीय लाभापेक्षा शेतक-यांच्या हिताचा विचार करून कृषीमाल निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण आखण्याची भूमिका कोणता राजकीय पक्ष घेईल अशी सुतराम शक्यता नाही. तसे व्हायचे असेल तर शेतक-यांना संघटित होऊन एखाद्या निवडणुकीत या राजकीय पक्षांच्या डोळ्यात पाणी आणावे लागेल.

करार शेती शेतक-यांच्या मुळावर येणार का?
कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणारी विधेयके मंजूर करून घेतली. यामुळे शेतक-यांना मोठा लाभ होईल असा सरकारचा दावा आहे. तर ही विधेयके शेतक-यांच्या नावावर व्यापा-यांची धन करणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी ही शेतकरीविरोधी विधेयके आणल्याचा निषेधार्थ केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची खरेदी-विक्री करण्याची मुभा देणा-या विधेयकामुळे शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, व्यापा-यांकडून लूट होणार नाही, असा सरकारचा दावा आहे. तर याला विरोध करणारांच्या मते या कायद्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-यांच्या हिताची जपणूक होते आहे की नाही यावर जी देखरेख होत होती तीच संपणार असून शेतक-यांना लुटण्यासाठी खुली सूट व्यापा-यांना मिळणार आहे. आजही शेतक-यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा होती व कायद्यातील तरतुदीमुळे आता व्यापा-यांना खरेदीची मुभा मिळणार असून, किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे. विशेषत: डावे पक्ष याबाबत आक्रमक आहेत.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर शेतमालाला विक्रीची मुभा देण्याचे सूतोवाच काँग्रेसनेच २०१३ साली केले होते. त्यामुळे त्यांची भूमिका घेताना पंचाईत होणार आहे. या विधेयकापेक्षा कंत्राटी शेतीला मुभा देणा-या विधेयकाबद्दल मात्र खूप आक्षेप घेतले जात आहेत. यामुळे शेती क्षेत्रात मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक येईल व शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळेल. लहरी हवामानामुळे व बाजारपेठेतील चढ-उतारामुळे होणा-या नुकसानीची जोखीम त्यांच्यावर राहणार नाही, असा सरकारचा दावा आहे. परंतु या व्यवस्थेत शेतक-यांचे कंपन्यांकडून शोषण तर होणार नाही ना? याची दक्षता घ्यावी लागणार आहे. किंबहुना या कायद्याच्या माध्यमातून नवी कार्पोरेट जमीनदारी निर्माण होणार नाही याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान

केंद्राने आणलेले तिसरे व महत्त्वाचे विधेयक म्हणजे ‘अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक’ या विधेयकाद्वारे १९५५ च्या कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे आता खाद्यपदार्थांच्या साठेबाजीवरील प्रतिबंध हटणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर व्यापारी आता धान्य, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाट्याचा अमर्याद साठा करू शकतील. निर्बंध हटवल्याने यात गुंतवणूक वाढेल व शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल असा सरकारचा दावा आहे. तर सरकारने एकाधिकार खरेदी योजनेतून अंग काढून घेण्यासाठी हे पाऊल उचलले असून यामुळे शेतक-यांची लूट होईल असा आरोप विरोधक करत आहेत. कोरोनामुळे अजून आंदोलनाची धग जाणवण्याइतपत वाढली नसली तरी भविष्यात याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

आणखीन बातम्या

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...