22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषकोरोना काळातील लाभदायक म्युच्युअल फंड

कोरोना काळातील लाभदायक म्युच्युअल फंड

एकमत ऑनलाईन

सध्या कडक लॉकडाऊनच्या काळात आपण सक्तीने घरी बसला आहात. कोरोना महामारी कमी करण्यात आपला देखील खारीचा वाटा आहे. दरम्यानच्या काळात घरी बसून आपल्या घरातील अर्थनियोजन करीत असताना सध्याचा विचार करता कोणत्या चांगल्या गुंतवणूक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यास आपल्या कुटुंबास आर्थिक फायदा होतो. सध्याच्या रिकाम्या वेळात बँकेचा चांगला उपयोग केल्याचे समाधान देखील आपणास लाभेल.

सध्याची कोरोनामय परिस्थिती लक्षात घेता आपली बचत तर वाढत आहे. कारण घरी बसल्याने चांगल्या व चमचमीत पदार्थांची फर्माईश करून त्या पदार्थांचा आस्वाद घेता. तेवढा खर्च वगळता अन्य खर्चावर सध्या नियंत्रण आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आपली बचत वाढत आहे. अशा वाढत जाणा-या बचतीस चांगला न्याय देण्याचे काम आपले आहे. याचाच दुसरा असा अर्थ की, वाढत्या बचतीचे रुपांतर चांगल्या व सुयोग्य गुंतवणूक योजनेत व्हावे, असे झाले तर लॉकडाऊनमध्ये सकारात्मक व चांगले काम केल्याचे समाधान आपणास मिळेल. म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करताना अनेक कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारास मोफत विमा संरक्षण देण्यासाठी सुरुवात होतेय. म्हणजेच ‘आम के आम गुठली के दाम’ आमरसासाठी आंबा घेतल्यानंतर फायदाच फायदा खवय्ये व गुंतवणूकदारांना मिळतो.

म्युच्युअल फंडात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करणा-या ग्राहकास अशा प्रकारची जादा सवलत नक्कीच मिळू शकते. वास्तविक पाहता कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स व एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढली आहे. असे असले तरी आरोग्यासाठी जनतेच्या मनात सध्या जागृती वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले व सुरक्षित ठेवण्याची इच्छा मनापासून वाढत आहे. ही बाब म्युच्युअल फंडाच्या योजना करणा-या तज्ज्ञास लक्षात आली. त्यामुळे काही म्युच्युअल फंडाच्या कंपन्या याचा फायदा उठवून गुंतवणूक वाढीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. यासाठी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणा-या त्यांच्या ग्राहकास मोफत विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

कोवॅक्सिन केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी, लसीच्या तुटवड्यामुळे सरकारचा निर्णय

अशा मोफत संरक्षण विम्याचा फायदा देणा-या म्युच्युअल फंडाच्या कंपन्यांच्या यादीत पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रोड्युन्शियल फंड, एलआयसी इन्शुरन्स, आदित्य बिर्ला सनलाईफ सेन्चुरी इ. कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकास एसआयपीद्वारे गुंतवणूक करणा-यास मोफत स्वरूपाचे विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकदारांनी वरील फंड हाऊसच्या एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास गटविमा योजने अंतर्गत वैद्यकीय तपासणीशिवाय आरोग्य विम्याचा फायदा घेता येईल. यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करणा-या ग्राहकांनी आरोग्य विमा संरक्षण असा पर्याय निवडावा लागेल. बहुतांश अनेक फंड हाऊस आपल्या इक्विटी व हायब्रीड प्लान योजनेसाठी लाभ मिळवू शकतो.

इक्विटी म्युच्युअल फंड यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक प्रामुख्याने शेअर्स किंवा इक्विटीमध्ये होते. तसेच हायब्रीड किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक होते. तसेच हायब्रीड किंवा बॅलन्स म्युच्युअल फंडात रोखे व इक्विटीचे ठराविक प्रमाणात गुंतवणूक करीत असतात. याचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकाचे वय हे किमान १८ व कमाल ५१ वर्षांच्या दरम्यान असावे लागते. अशा प्रकारचे मोफत विम्याचे संरक्षण वयाच्या ५५ वर्षापर्यंत मिळू शकेल. समजा मंगेश ५० वर्षांचा आहे. त्याने ५० वयात एसआयपी १० वर्षांसाठी सुरू केली तर त्यास जास्तीत जास्त ५५ वर्षंापर्यंतच मोफत विमा संरक्षण मिळू शकेल. काही म्युच्युअल फंड हे वयाच्या ६० वर्षांपर्यंत विम्याचे संरक्षण अशा स्वरूपाचे देण्याचा विचार करीत आहेत.

अनेक म्युच्युअल फंडातील आरोग्य विमा मोफत सुविधा देण्यासाठी काही नियम व अटींची पूर्तता करावी याकडे लक्ष असते. संबंधित असा लाभ घेणा-या म्युच्युअल फंडाच्या ग्राहकांनी लक्ष द्यावे. कारण नियम व अटींची पूर्तता झालेल्या ग्राहकांना मोफत आरोग्याची सुविधा म्युच्युअल फंड देत आहेत. त्यातील पहिली अट म्हणजे अशा ग्राहकांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजनेस पहिल्या वर्षभरात एसआयपीद्वारे रक्कम जेवढी जमा झाली आहे त्याच्या २० पट मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल. दुस-या वर्षी एकूण हप्त्याच्या ७५ पट मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल. तसेच तिस-या वर्षाच्या वार्षिक एसआयपी रकमेच्या १२० पट मोफत संरक्षण सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. अशा लाभार्थी ग्राहकास जास्तीत जास्त ५० लाखांचे मोफत विमा संरक्षण मिळविता येईल.

मोफत विमा संरक्षणाचा लाभ घेणारा ग्राहक मंगेश आहे. त्याची मासिक ५००० रुपयांची सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक असेल तर मोफत विमा संरक्षण पहिल्या वर्षी एक लाखाचे असेल. दुस-या वर्षी ७५ पट ५००० च्या म्हणजेच ३ लाख ७५ हजार विमा संरक्षण मिळेल. तिस-या वर्षी ५००० च्या १२० पट विमा संरक्षण म्हणजे मोफत विमा संरक्षण हे ६ लाखांचे असू शकते. यासाठी म्युच्युअल फंडाच्या ग्राहकांनी सातत्याने तीन वर्षे एसआयपीद्वारे रक्कम भरणे सक्तीचे आहे.

दुर्दैवाने अशा लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास म्युच्युअल फंडाची एकूण युनिट अधिक विम्याची रक्कम असा लाभ त्यांच्या वारसास मिळू शकतो. तीन वर्षांत एसआयपीची रक्कम भरणे खंडित किंवा बंद पडले तर अशी सुविधा मिळणार नाही. तसेच तीन वर्षांनंतर एसआयपी बंद केल्यास विम्याचा लाभ कमी मिळेल. यासाठी सध्याची परिस्थिती ओळखून आपली गुंतवणूक ही सकारात्मक पध्दतीने वाढविणे काळाची गरज ठरेल… बघा पटतंय का?

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या