28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषजांभूळ रस - फायदे

जांभूळ रस – फायदे

एकमत ऑनलाईन

जांभळाचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर निळसर जांभळ्या गडद रंगाचे एक रसरशीत फळ दिसते. जांभळाचा आस्वाद, तृप्तीदायक, वातवर्धक, आल्हादायक, यकृताला उत्तेजीत करणारे, पाचक असले तरी ही जास्त प्रमाणात खाल्यास मलावरोध होण्याची शक्यता असते. जांभळाच्या फळात उच्च लोह तत्व असल्यामुळे या फळाच्या किंवा त्याच्या रसाच्या सेवनाने रक्ताचे शुध्दिकरण होऊन हिमोग्लोबिनची वाढ होते. अपचन, डोकेदुखी आणि अशुध्द व करपट ढेकर येणे इत्यादी समश्यावर जांभळाचे सरबत अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदीक व गुणकारी औषधी तयार करण्यासाठी केला जातो. त्यामळे जांभळाच्या फळाचे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्व आहे. जांभळाचे फळ किंवा त्याच्या रसाचा मधुमेह आजारावरील एक नैसर्गीक उपाय असन तो १०० टक्के आरोग्यदायी आहे. त्यामुळे मधुमेही रूग्णांसाठी जांभूळ एक वरदानच आहे. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी आणि पावसाळा सुरू होताना निळसर, जांभळट (थोडेसे काळसर) रंगाच्या जांभळाच्या फळांचा घोस झाडाला लोंबकळत असलेला दिसतो. खरे तर निसर्गाने निर्माण केलेले हे जांभूळ फळ अमृतासमान असून आपल्या शरीरातील विविध कार्य सुरळीत होण्यासाठी औषधीपेक्षा कमी नाही. सहा ऋतंूपैकी दोन ऋतू फळाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. कारण ग्रिष्म ऋतूमध्ये आंबा हे अमृतफळ तर वर्षा ऋतूंमध्ये जांभूळ हे अमृतफळ निसर्गामध्ये भरभरून उपलब्ध असते. जांभळाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे मुती लहान अन किती महान हा वाक्यप्रचार या फळाला तंतोतंत लागू पडतो. कारण जांभूळ फळ आकाराने खूपच लहान असले तरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व महत्वाचे फळ आहे म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

उपयोग : जांभळाचा रसात रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढविण्याचे गुणधर्म आहेत. जांभळाच्या रसात मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व असतात. त्याचबरोबर पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि इतर खनिजे असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास फायदा हातो. त्यासाठी जांभळाचा ४० ते ५० मिली रस दररोज सकाळी नियमितपणे घेतल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.जांभळाचा रस मुळव्याधीच्या आजारावर अत्यंत फायदेशिर आहे. ब-याच वेळा मुळव्याधीमध्ये रक्त स्त्राव होतो. त्यासाठी दररोज दुपारी जेवणानंतर ८ ते १० जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबतात मध मिसळून सेवन करावे अथवा २०० मिली गाईच्या दुधात १०० मिली जांभळाचा रस मिसळून दररोज सकाळ-दुपार-संध्याकाळी असे सात दिवस सेवन करावा असे केल्याने मुळव्याधीतून होणारा रक्त स्त्राव थांबतो व शौचास साफ होते. जांभळाच्या रसामध्ये जीवनसत्व-क आणि उच्च प्रमाणात लोह असते. ज्यामुळे हिमोग्लोबीनची वाढ होऊन रक्ताचे शुध्दिकरण होण्यास फायदा होतो. हिमोग्लोबीन वाढल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवामध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यासाठी नियमितपणे ४० मिली जांभळाचा रस किंवा जांभूळ-फळाचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. सामान्यत: हा आजार कुपोषण आणि अस्वच्छ पाणी पुरवठा या दोन बाबीमुळे होतो. या आजाराला हगवण किंवा जुलाब असेही म्हणतात. या आजारामध्ये मल पातळ होण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे वारंवार मल प्रवृत्ती होते. ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा वाढतो. त्यासाठी दररोज जांभळाचा रस घेतल्यास फायदा होतो. प्लीहा ही ग्रंथी रक्ताभिसरण संस्था आणि प्रतिक्षम संस्था यांच्या कार्यात मदत करते.

प्लीहा हा अवयव लहान असला तरी आपल्या शरीरातील सर्व कार्यात मदत करतो. बहुतेक वेळा प्लीहामध्ये दुखापत होऊन सुज येते व वेदना होतात त्यासाठी २० मिली जांभळाचा रस नियमितपणे घेतल्यास फायदा होतो. कावीळ हा आजार प्रामुख्याने विषाणूमुळे किंवा यकृतावरील दुष्परिणामामुळे होतो. यामध्ये रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्याने त्वचा आणि डोळ्यामधील बा भाग पिवळा या रंगाचा दिसू लागतो व तसेच गडद पिवळी लघवी होते. त्यासाठी जांभळाच्या १० ते २० मिली रसात दोन चमचे मध मिसळून दररोज दोन वेळा सेवन करावा त्यामुळे कावीळ लवकर बरा होऊन आराम मिळतो. जांभळाच्या फळात/रसात ऑक्झेलीक आम्ल, मॅलिक आम्ल, बेट्यूलीक आम्लसारखे अनेक घटक असतात जी प्रतिजैविकाचे कार्य करतात. ज्यांच्यामुळे रोगकारक जीवाणूचा नाश होतो किंवा त्याच्या वाढीला प्रतिकार होतो. जांभळाचा रस हे उत्तम प्रतिजैविक म्हणून कार्य करते. त्यासाठी नियमितपणे ४० ते ५० मिली जांभळाचा रस सेवन करावा. निरोगी जीवनशैलीसाठी हाडाची मजबुती अत्यंत आवश्यक असते. मात्र काही लोकांची हाडे कमी वयामध्ये कमकुवत व ठिसूळ होतात याचे महत्वाचे कारण म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता. त्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ सेवन करणे गरजेचे असते. जांभळाच्या फळात आणि त्याच्या रसात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे पोषक घटक असल्याने हाडाची घणता वाढण्यास फायदा होतो. ज्यामुळे हाडे ठिसुळ होण्यास प्रतिबंध होतो.

त्यासाठी जांभळाच्या फळाचा किंवा त्याच्या रस सेवनाचा सल्ला महिला व वृध्दांना दिला जातो. जांभळाच्या रसात भरपूर तंतुमय पदार्थ व कमी कॅलरिज (उष्मांक) असतात. तंतुमय पदार्थामुळे पोट बराच काळ भरलेले राहते व त्यामुळे लवकर भूक लागत नाही. भूक लागत नसल्यामुळे आपण चुकीचे पदार्थ खात नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कलरिज आपल्या शरीरात जात नाहीत. प्रत्यक्षात जांभळामध्ये कॅलरिज खूप कमी असल्याने वजन वाढत नाही. म्हणजे वजनावर नियंत्रण राहण्यास फायदा होतो. त्यासाठी वाढत्या वजनावर नियंत्रण राहण्यासाठी दररोज ४० ते ५० मिली जांभळाचा रस सेवन करावा. जांभळाचा रस हा अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि अनेक खनिजाचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आपले हृदय निरोगी ठेवण्यास फायदा होतो. या रसाच्या सेवनाने हृदयाशी संबधीत विविध आजारापासून (उच्च रक्तदाब, हृदयविकार, हायपर टेन्शन, स्ट्रोक आणि रक्त वाहिन्यासंबंधी विकार) संरक्षण मिळण्यास मदत होते. यासोबतच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रीत ठेवण्याय मदत होते. तसेच १०० ग्रॅम जांभळामध्ये ५५ मि. ग्रॅम पोटॅशियम असते ज्यामुळे हदय निरोगी राहण्यास फायदा होतो. त्यासाठी जांभळाच्या फळाचे रसाचे नियमित सेवन करावे. पोटाचे विकार दूर करण्यासाटी जांभळाच्या रसाचे सेवन गरजेचे आहे. टिप: वनौषधीचा वापर करताना आयर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या