24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषजांभूळ बिया - फायदे

जांभूळ बिया – फायदे

एकमत ऑनलाईन

जांभळाच्या विविध भागाचा आयुर्वेदीक औषध बनविण्यासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जांभळीच्या झाडाचे आयुर्वेद शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जांभूळ फळ हे मधुमेह आजारावरील एक नैसर्गीक व सोपा उपाय आहे. त्याचबरोबर त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियामध्ये अनेक आरोग्यदायी संयुगे असतात. ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यासाठी जांभळाचे फळ खाऊन त्याच्या बिया फेकून न देता त्याचे चूर्ण करून सेवन करावे. ___ जांभळाच्या बियांची भुकटी/चुर्ण – कृती- १) चांगली पिकलेली व निरोगी फळाची निवड करावी. २) हाताने अथवा पल्पर यंत्रातून गर काढून बिया चांगल्या धुवून घ्याव्यात. ३) धुतलेल्या बिया उन्हामध्ये अथवा ड्रायर ट्रेमध्ये (५० ते ६० अंश सेल्शियस) १८ ते २० तास चांगल्या वाळवून घ्याव्यात. ४) सुकलेल्या/वाळलेल्या बिया बारिक वाटून अथवा ग्राईंडर मधून बारिक पावडर तयार करून घ्यावी. ५) ही पावडर वस्त्रगाळ करून भुकटी आणि चूर्ण म्हणून औषधीसारखी वापरावी.

उपयोग :४ मधुमेह : जांभळाच्या रसासोबतच जांभळाच्या बियासुध्दा मधुमेह आजार असणा-यांना उपयुक्त आहेत. जांभळाच्या बियामध्ये दोन बायोएक्टीव्ह संयुगे जंबोलिन आणि जंबोसिन असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलीनचे उत्पादन वाढण्यास फायदा होतो व त्यामुळे रक्तीतील साखरेची पातळी नियंत्रीत राहण्यास मदत होते. त्यासाठी जांभळाच्या बिया उन्हामध्ये चांगल्या सकवन त्याचे चर्ण तयार करावे. हे तयार केलेले चुर्ण एक चमचा या प्रमाणे दुध किंवा पाण्यासोबत दररोज तीन वेळा सकाळ-दुपार-संध्याकाळ नियमितपणे काही दिवस घेतल्यास मधुमेह कमी होतो. ४ वजन नियंत्रण : जांभळाच्या बिया तंतुमय पदार्थाने समृध्द असलेल्या आहेत. त्यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधी आहे. त्यासाठी जांभळाच्या बियाची पावडर एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी नियमित पणे सेवन करावी व नंतर जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास लाभदायक होते. ४ कानदुखी : जांभळाच्या बिया कान दुखत असल्यास अत्यंत उपयुक्त आहेत. कधी कधी जखमेमुळे किंवा अन्य कारणांमुळे कानातून पू येतो व कानदुखीचा त्रास होतो.

त्यासाठी दुख-या कानामध्ये जांभळाच्या बियाचे तेल सकाळ-संध्याकाळ दोन वेळा दोन थेंब टाकावेत त्यामुळे कानदुखी कमी होते त्याचबरोबर कानातील स्त्राव आणि कानाच्या पडद्याला आलेली विकृती कमी होऊन वेदना दूर होतात व आराम मिळण्यास फायदा होते. ४ पोटाचे विकार : आपली पचनसंस्था सुरळीत व स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभळाच्या बिया अत्यंत गुणकारी आहेत. त्यासाठी जांभळाच्या बियाचे चुर्ण सेवन करावे. तसेच आतड्यातील अल्सर किंवा जखमा अथवा आतडातील संसर्ग दूर होण्यासाठी जांभळाच्या बियाचा अर्क सेवन करावा त्यामुळे पोटाचे विकार कमी होऊन आराम मिळतो. ४कर्करोग : जांभळाच्या बियाचे चुर्ण कर्करोगावर अत्यंत गुणकारी औषधी आहे. हे तयार केलेले चुर्ण दररोज सकाळी ५० मिली दुधात एक चमचा मिसळून सेवन करावे. त्यामुळे काही प्रमाणात कर्करोगास प्रतिबंध होण्यास मदत होते. ४ यकृताची कार्यक्षमता : बियासहीत जांभळे यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. यकृताची कार्यक्षमता वाढल्याने रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास फायदा होतो. त्यासाठी ८ ते १० चांगली पिकलेली जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे मंद आचेवर उकळावीत. त्यानंतर थंड झाल्यावर बीयासह जांभळे कुस्करून लगदा तयार करावा. तयार झालेले द्रावण दररोज २ ते ४ वेळा घ्यावे असे काही दिवस घेतल्यास यकृताची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

४ उच्च रक्तदाब : जांभळाच्या बियामध्ये अ‍ॅलॅजिक आम्ल आढळते जे एक अत्यंत महत्वाचे व शक्तीशाली अ‍ॅन्टीऑक्सिडंट असते. ज्यामध्ये रक्तदाब नियंत्रीत ठेवण्याचे गुणधर्म आहेत. सधाच्या धावपळीच्या युगात ब-याच व्यक्ती रक्तदाबाने त्रस्त आहेत. ज्यामुळे अस्वस्थता वाढते. त्यासाठी जांभळाच्या बियाचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४% नी कमी होतो. तसेच जांभळाच्या बियाची भुकटी घेतल्यासही फायदेशीर असते. . ४ मुतखडा : सध्या अनेक व्यक्तींना मुतखड्याची समस्या आहे. त्यावर जांभळाच्या बियाचे चूर्ण अत्यंत उपयोगी औषधी आहे. त्यासाठी जांभळाच्या बिया वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण पाण्यात किंवा दह्यात एक चमचा मिसळून नियमितपणे घेतल्यास खडे विरघळून बाहेर पडण्यास मदत होते. ४ गर्भाशयातील सूज : अनेक स्त्रियांना वंध्यत्व येण्यामागे गर्भाशयाच्या बिजकोषांना आलेलली सुज हे एक महत्वाचे कारण असते. त्यासाठी १०० ग्रॅम जांभूळ बिया, ५० ग्रॅम मंजिष्ठा, ५० ग्रॅम कारले बिया, ५० ग्रॅम अशोका बिया आणि ५० ग्रॅम सारिवा एकत्र वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ एक चमचा घेतल्यास बिजांडकोषाची सुज (पी.सी.ओ.डी) आजार आटोक्यात येतो. ४ हिरड्याच्या वेदना : अनेक वेळा हिरड्यामध्ये वेदना होऊन अस्वस्थता वाढते व अनेक प्रयत्न करूनही या वेदनेचा त्रास कमी होत नाही.

त्यासाठी जांभळाच्या बीया उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करावी. ही तयार केलेली पावडर दातावर ब्रशप्रमाणे चोळावी त्यामुळे हिरड्याच्या वेदना कमी होऊन आराम मिळतो. ४ मोतिबिंदू : वयापरत्वे अनेकांना मोतीबिंदुचा त्रास होतो त्यासाठी जांभळाचे चूर्ण अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी जांभळाच्या बिया उन्हात वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण मधात मिसळून त्याच्या प्रत्येकी तीन ग्रॅमच्या गोळ्या तयार कराव्यात. ह्या गोळ्या दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ दोन-दोन याप्रमाणे घ्याव्यात. जुलाब :- जांभळाच्या बियाचे चुर्ण रक्त रंजीत जुलाबामध्ये अत्यंत उपयोगी औषधी आहे. अनेक वेळा जुलाबाच्या समश्येत रक्त स्त्राव होतो. त्यासाठी जांभळाच्या बीयाचे चुर्ण सेंधव मिटामध्ये मिसळून अर्धा चमचा याप्रमाणे दररोज सकाळी पाण्याबरोबर सेवन करावे. त्यामुळे जुलाब कमी होऊन आराम मिळण्यास फायदा होतो. ४ शिघ्रपतन : जांभळाच्या बियाचे चर्ण शिघ्रपतनावर अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी जांभळाच्या बिया चांगल्या वाळवून व बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले पाच ग्रॅम चूर्ण ५० मिली दुधाबरोबर रोज सकाळी रिकाम्या पोटी काही दिवस नियमितपणे सेवन करावे. त्यामुळे विर्य घट्ट होऊन शिघ्रपतनाची समस्या कमी होण्यास फायदा होतो. ४ पायरिया : या आजारामध्ये आपल्या हिरड्यातून रक्तस्त्राव होऊन वेदना होतात. यासाठी जांभळाच्या बीयाचे चूर्ण अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी जांभळयाच्या बियाचे चूर्ण मिठामध्ये बारीक करून दातावर मंजन सारखे चोळावे.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या