27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home विशेष प्रश्न मीडिया ट्रायलचा

प्रश्न मीडिया ट्रायलचा

एकमत ऑनलाईन

साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे वाक्य सर्वांनी ऐकले असेल. शाळेत असताना यावर निबंध लिहिण्याचीही संधी मिळाली असेल. चित्रपट हा साहित्याचाच एक भाग मानला जातो. माध्यमांनाही ‘इन्स्टंट लिटरेचर’ म्हणजे तातडीचे साहित्य मानले जाऊ शकते. सध्या अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरण या दोन्ही प्रकारच्या साहित्यांच्या विश्वात महत्त्वाचा विषय ठरले असताना सर्वच निकषांवर या दोन्ही आरशांना घासून पाहणे अनिवार्य बनले आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचा बचाव करणे किंवा सुशांतसिंहचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या या विषयात काही टिप्पणी करण्याचा हेतू येथे अजिबात नाही. कारण अशा गोष्टींवर टिप्पणी करून समाज आणि त्याच्या दोन्ही आरशांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकणार नाही.

जिथे मनसोक्त मीडिया ट्रायल केली जाते, असे हे पहिले प्रकरण नाही. अरुषी मृत्यू प्रकरण, टूजी, निर्भया प्रकरण, शीना बोरा हत्याकांड, आसाराम बापूंचे प्रकरण, सुनंदा पुष्कर प्रकरण, जेसिका लाल प्रकरण अशा अनेक प्रकरणांमध्ये मीडिया ट्रायल जोरदार झाली. भारतात असे पहिले प्रकरण नौदल कमांडर नानावटी यांचे होते. त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रियकराला म्हणजे प्रेम आहुजा याला त्याच्या घरी जाऊन गोळी घातली होती. या प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही मीडियाला उत्तरे देण्याची वेळ आली होती. मुंबईहून प्रकाशित होणारे ‘ब्लिट्ज’ हे इंग्रजी टॅब्लॉईड वृत्तपत्र खुलेपणाने नानावटी यांच्या समर्थनार्थ वृत्तांत प्रसिद्ध करीत होते.

पीडितेची मीडिया ट्रायल करून ‘ब्लिट्ज’ने एक वेगळाच पायंडा पाडला होता. माध्यमेच न्यायाधीश झाले होते आणि नागरिक पंच झाले होते. कॅप्टन नानावटी यांनी गुन्हा कबूल केल्यानंतरसुद्धा ज्यूरीने त्यांना मुक्त केले. हा निवाडा माध्यमांनीच निश्चित केलेला होता आणि ज्यूरीने केवळ निकाल दिला, असे मानले गेले. गुन्हा केल्यानंतरसुद्धा देशभरातून नानावटी यांना सहानुभूती मिळाली, याचे कारण माध्यमे हेच होते.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का नको ! -प्रकाश शेंडगे

आरुषी तलवारचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये मिळाला होता. ऑनर किलिंग, आरुषीच्या वडिलांचे अनैतिक संबंध, आरुषी आणि तिच्या नोकराचे संबंध अशा त-हेत-हेच्या कहाण्या या प्रकरणाला जोडण्यात आल्या. राजेश तलवार आणि त्यांची पत्नी नूपुर यांनीच आरुषीची हत्या केली, असे ‘नरेटिव्ह’ इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तयार केले. हा उन्माद एवढा वाढला की, एके दिवशी माध्यमांवरील माहिती खरी मानून एका अनोळखी इसमाने न्यायालयातच राजेश तलवार यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले होते. आरुषीच्या आईवडिलांना दोषी मानून न्यायालयाने शिक्षाही दिली.

परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले. शीना बोराची हत्या एप्रिल २०१२ रोजी झाली होती. तीन वर्षांनंतर तपासाला सुरुवात झाली, तीही मीडिया ट्रायलने. माध्यमांनी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला हत्येप्रकरणी दोषी जाहीर करून टाकले. पोलिसांनी इंद्राणीबरोबरच शीनाचे सावत्र वडील आणि माध्यमांमधील एक नामांकित व्यक्ती असणा-या पीटर मुखर्जी यांना अटक केली. हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. परंतु इंद्राणी खुनी असल्याचे माध्यमांनी तत्पूर्वीच जाहीर करून टाकले आहे.

राजीव गांधी यांच्या कार्यकाळात बोफोर्स तोफांच्या खरेदीचे प्रकरण चर्चेत होते. माध्यमांनी हे प्रकरण जास्तच मनावर घेतले होते आणि राजीव गांधी यांना दोषी ठरवूनही टाकले होते. तपास यंत्रणांकडून एकीकडे तपास सुरू राहिला आणि दुसरीकडे मीडिया ट्रायलही सुरू राहिली. माध्यमे ‘निवाडा’ जाहीर करत राहिली. बोफोर्स घोटाळ्यासंबंधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीडिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, देशातील एकाही न्यायालयाने या प्रकरणाविषयी ‘घोटाळा’ हा शब्द वापरलेला नाही. १९८९ च्या निवडणुकीत बोफोर्स प्रकरणामुळेच राजीव गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले असे मानले जाते.

दिवसभरात ५१५ कोरोनारुग्णांचा मृत्यू, २० हजार ४८२ नवे रुग्ण !

अर्थात असे असले तरी काही प्रकरणे माध्यमांच्या दट्ट्यामुळेच उजेडात आली आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली, हेही नाकारता येत नाही. जेसिका लाल, प्रियदर्शिनी मट्टू, नैना साहनी हत्या प्रकरणात माध्यमांनी सजगता दाखविल्यानेच वजनदार लोकांना आरोपीच्या पिंज-यात उभे राहावे लागले. निर्भया प्रकरण याचे उत्तम उदाहरण आहे. माध्यमांनी त्यावेळी समाजाच्या रखवालदाराची भूमिका बजावली होती. निर्भया, जेसिका लाल, हैदराबाद प्रकरण यासारख्या अनेक प्रकरणांत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माध्यमेच समाजाची रखवालदार असतात. परंतु इतर अनेक प्रकरणांमध्ये माध्यमांनी थेट निवाडाच सुनावला आहे.

सुशांतच्या कथित आत्महत्येच्या किंवा हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत कोणीही थेटपणे संशयित किंवा आरोपी नाही. परंतु बव्हंशी मीडियाने सुशांतची मैत्रीण असणा-या रिया चक्रवर्तीला दोषी ठरवून टाकले आहे. पक्क्या माहितीवर आधारित बातमीदारी करण्याऐवजी विशिष्ट माध्यमांनी या प्रकरणाचा तमाशा करून टाकला आहे. माध्यमातील एक वर्ग स्वत:च गुप्तहेर, स्वत:च न्यायाधीश आणि स्वत:च फाशी देणारा जल्लाद बनला आहे. टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर हा तमाशा जोरदारपणे सुरू आहे. दु:खद बाब म्हणजे तपास यंत्रणाही या तमाशाला खुलेपणाने मदत करीत आहेत.

कायदेतज्ज्ञांच्या मते मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे व्यक्ती म्हणून असलेले अनेक अधिकार धोक्यात येऊ शकतात. मीडिया ट्रायलमुळे न्यायालयाचा अवमानही होऊ शकतो. तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. रघुवेंद्रसिंह चौहान यांनी २०११ मध्ये मीडिया ट्रायलविषयी लिहिलेल्या एका लेखात म्हटले होते की, ‘‘तपासपूर्व प्रसिद्धी निष्पक्ष तपासाच्या आड येऊ शकते आणि हानिकारक ठरू शकते. मीडिया अप्रासंगिक आणि खोटे पुरावे वास्तव म्हणून सादर करतो. आरोपीने गुन्हा केला आहे, हे लोकांना पटवून देणे हा त्यामागील हेतू असतो.’’

नागरिकांचा ‘आरोग्य डेटा बेस’ तयार करावा

देशाचे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर कोणत्याही प्रकरणात संशयितांच्या मीडिया ट्रायलविषयी चिंता व्यक्त केली होती. माध्यमांच्या वृत्तांतांमुळे कधी-कधी निष्पक्ष तपासात अडथळे येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पत्रकारांना आणि माध्यम समूहांना सनसनाटी आणि नाटक रूपात बातम्या दाखविल्याबद्दल अनेकदा फटकारले आहे. परंतु न्यायाधीशांनी माध्यमांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे ब-याच वेळा टाळलेही आहे. टीव्ही चॅनेल्समध्ये रिया चक्रवर्तीसंदर्भातील बातम्या देण्यावरून गळेकापू स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांतील एका मोठ्या वर्गाने या प्रकरणाला सर्कसचे रूप दिले आहे. या प्रकरणात बॉलिवूडचा समावेश आहे, पैसा आहे, गर्लफ्रेंड आहे, अमली पदार्थांच्या तस्करांचे कनेक्शन आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांचे हितही अडकलेले दिसत आहे. फिल्मी दुनियेचे तीन भाग झाले आहेत. एक भाग सुशांतचा, दुसरा रियाचा आणि तिसरा भाग योगायोगाने प्रकरणाशी जोडला गेलेला आहे. रियाच्या बाजूने रामगोपाल वर्मा, विद्या बालन, तापसी पन्नू, शिवानी दांडेकर, लक्ष्मी मंचू आणि स्वरा भास्कर आहेत. माध्यमांनी एका मुलीला सैतान बनविले आहे, असे हा गट मानतो. दुसरीकडे कंगना राणावत ही सुशांतच्या बाजूने सातत्याने बोलत असून, बॉलिवूडमधील अनेक गोष्टी उघड करण्यात गर्क आहे.

काही माध्यमांना सध्या देशात आणि जगात दुसरी कोणती बातमी दृष्टीसच पडत नाही. देशाचे संरक्षणमंत्री चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करीत आहेत, कोरोनाच्या संसर्गामुळे लोक हैराण आहेत, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत, देशाची अर्थव्यवस्था मोडून पडली आहे, कोरोनाच्या लसीची परिस्थिती काय आहे, शेतक-यांना शेतात टाकण्यासाठी खत मिळेनासे झाले आहे. अशा अनेकांचे प्रतिनिधित्व माध्यमांनी करणे अपेक्षित असताना अनेक माध्यमे केवळ रियाचीच कहाणी घेऊन बसले आहेत. अँकर तर पक्षकारच झाले आहेत.

एका माध्यमसमूहाची बातमी चुकीची ठरविण्यासाठी अन्य समूह उतावीळ दिसत आहेत. आपली बातमी बरोबर असल्याचे सांगण्याचा जमाना मागे पडला. बॉलिवूडमध्ये पसरलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याचे जे वर्णन माध्यमांमधून समोर येत आहे, ते भीतीदायक आहे. माध्यमे वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात गुंग आहेत. ते पाहता आपल्या समाजाची चिंता वाटल्यावाचून राहत नाही. हा समाज आपल्या देशाला विश्वगुरू बनविणार का, असाही प्रश्न उभा राहतो. माध्यमे समाजाचा आरसा असतात याचा विसर पडता कामा नये.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून ‘आऊटलूक’ या ख्यातनाम नियतकालिकाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.)

योगेश मिश्र
ज्येष्ठ संपादक-विश्लेषक

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला!

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या...

हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद...

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

आणखीन बातम्या

…चर्चा तर होणारच !

देशातील कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. मात्र कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने कोरोनाचे भय मात्र कमी झाले आहे. काळजी करणे...

कहीं ये ‘वो’ तो नहीं…

साल १९८२....भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला..... मी मुंबई दूरदर्शनसाठी, एक दिवाळी पहाट स्पेशल... ‘शब्दांच्या पलिकडले’ करतोय. मी आणि दीदी...

शेतीविषयक सुधारणा विधेयकांची अंमलबजावणी महत्त्वाची

२०२० हे वर्ष अनेक सुधारणाकिंवा रिफार्मस चे वर्ष म्हणून इतिहासात नोंद होईल. राज्य सभेत अत्यंत महत्त्वाचे कृषी विधेयक मंजूर झाले. विरोध झाला. आठ खासदारांचे...

गरज सर्वंकष शेतकरीकेंद्रित विचारांची

केंद्र सरकारने शेतीशी संबंधित मांयलेल्या तीन महत्त्वाच्या विधेयकांना, संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली आहे. परंतु या विधेयकांवर विस्ताराने चर्चा न होता, ती संमत झाल्याने...

 मोदीवानी काई रेटून सांगाय न्हवता

‘‘न्हाई साहेब, तसं न्हाई ते ट्रम्प म्हन्ला व्हता म्हन, म्हंजी मोदीवानी काई रेटून सांगाय न्हवता पन म्हन्ला व्हता म्हन की हमेशा -हायल्यावानी न -हाईनाते...

बदल

आपल्याकडे एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली क ती सुरूच राहते. प्रदीर्घकाळ फक्त चर्चाच होत राहते आणि चरकातून निघालेल्या उसासारखा त्या विषयातून टीआरपीचा रस निघून...

गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

चीनमधील शेनझेनस्थित झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन कंपनीकडून भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आदी राजकारणी व्यक्तींपासून प्रख्यात उद्योजक, न्यायसंस्था, संरक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र आदींमधील उच्च पदस्थ व्यक्तींवर पाळत...

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५०-३०० गॅ्रम भाजीपाला आहारात घेणे गरजेचा असतो आणि याकरिता आपण दैनंदीन गरजेकारिता भाजीबाजारातून भाजी खरेदी...

टीआरपी

‘जग कशावर चालतं,’ या प्रश्नाला ‘अन्नावर’ हे विश्वव्यापी उत्तर असलं, तरी आजकाल तसं कुणी म्हणत नाही आणि मान्यही करत नाही. कारण भूक विश्वव्यापी असली,...

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...