27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषमांजरा परिवाराने केले उसाचे विक्रमी गाळप

मांजरा परिवाराने केले उसाचे विक्रमी गाळप

एकमत ऑनलाईन

राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत लोकनेते विलासराव देशमुख यांनी उजाड माळरानावर सुरू केलेल्या मांजरा साखर कारखाना परिवाराने चालू हंगामात माजी मंत्री, सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतक-यांचा तब्बल ५६.८० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून एक विक्रम प्रस्थापित केला आणि राज्यात मांजरा परिवाराने वेगळा पॅटर्न निर्माण केला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख या नेतृत्वाची खंबीर साथ या विक्रमी गाळप करण्यात मोठी ठरली आहे. एकीकडे उसाचे गाळप होऊन चार महिने झाले तर ऊसउत्पादक शेतक-यांना पैसे मिळत नाही, अशी ओरड असताना लातूरच्या मांजरा साखर परिवाराने ऊस गाळपास दिल्यावर १० दिवसांत शेतक-यांना पैसे देण्याचे काम केले आहे.

लोकनेते विलासराव देशमुखसाहेब यांनी जो पायंडा परिवाराला घालून दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुखसाहेब, पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिवारातील साखर कारखाने नियमाचे तंतोतंत पालन करून ऊसउत्पादक शेतक-यांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात उसाची लागवड जास्त झाल्याने गाळप होईल का, अशा शंका येत होत्या पण सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व परिवारातील साखर कारखाने यांनी समन्वय ठेवून उसाची लागवड, शिल्लक, गाळप किती याची चाचपणी करून प्रत्येकाने आपापल्या भागात जास्तीत जास्त वेळेत ऊस गाळप क्षमतेपेक्षा अधिक वेगाने कारखाने चालवून जिल्ह्यातील शेतक-यांना दिलेला शब्द पाळत मांजरा साखर परिवाराने चालू हंगामात ५६.८० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून राज्यात वेगळा मांजरा साखर पॅटर्न निर्माण केला आहे, हे मात्र खरे आहे.

अनेक अडचणी मात्र संकटावर केली मात
या वर्षी चालू हंगामात साखर कारखाने पावसामुळे एक महिना उशिरा सुरू झाले तसेच उसाचे क्षेत्र मोठ्या
प्रमाणावर वाढल्याने हे दोन्ही संकट साखर कारखान्यासमोर उभे होते मध्येच दोन वेळा अवकाळी पावसामुळे पंधरवडा वाया गेला. अशा संकटात राज्यातील अनेक जिल्ह्यात साखर कारखानदारी अडचणीत होती. मात्र लातूर येथील मांजरा साखर परिवारातील मांजरा, रेणा, मारुती, जागृती, विलास, विलास-२, ट्वेन्टी वन शुगर साखर कारखाने यांच्या बैठका घेऊन दररोज होणारे गाळप, उसाची तोडणी कामगार, ठेकेदार, ऊस तोडणी यंत्र, मुकदम, पुन्हा उन्हाळा अशा अडचणीत असलेल्या साखर कारखाना प्रशासनाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले एवढेच नाही तर उसाचे गाळप झाल्यावर १० दिवसात ऊसउत्पादक शेतक-यांना त्यांच्या खात्यावर २२००/ प्रमाणे रक्कम अदा केली आहे. देशातील सहकारी साखर कारखान्यात मांजरा साखर परिवाराने नावलौकिक मिळविला आहे.

को जन, अर्क उपपदार्थ प्रकल्प विक्रमी उत्पादन
मांजरा साखर परिवार केवळ उसाचे गाळप करीत नाही तर इतर उपपदार्थ प्रकल्प सुरू आहेत. त्यात को जन, अर्क उपपदार्थ प्रकल्प हाती घेतले. त्यांचेही विक्रमी उत्पादन मांजरा साखर परिवाराने केले असून या वर्षी चालू हंगामात उसाचे क्षेत्र वाढल्याने व मध्येच पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील गावात रस्ते खराब असल्याने चिखल होऊन वाहनाला जायला अनेक अडचणी आल्या. मात्र परिवाराने अतिशय सखोल अभ्यास करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात उसाचे विक्रमी गाळप केले. सातही साखर कारखाने अधिक क्षमतेने चालवून विक्रमी गाळप करून राज्यात सहकारी
साखर कारखानदारीत मांजरा साखर परिवाराने नवा पॅटर्न निर्माण केला आहे.

-हरिराम कुलकर्णी
पत्रकार, लातूर , मोबा.: ९९७००८१०७७

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या