27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home विशेष सोशल मीडियावरील (अ) सुरक्षा!

सोशल मीडियावरील (अ) सुरक्षा!

एकमत ऑनलाईन

अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे आजमितीला स्मार्टफोन मनुष्य जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. लहान मुले, किशोरवयीन मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा स्मार्टफोनचा सर्रासपणे वापर करत आहेत. स्मार्टफोन व इंटरनेटमुळे वास्तव जग हे आभासी जगाच्या आहारी जात असल्याने आम्ही आभासी जगाचा अविभाज्य भाग बनलो आहोत, त्यापासून अलिप्त राहणे कठीण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंटरनेट सुविधा आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळकरी मुलेच नव्हे तर महाविद्यालयीन मुले आपल्या अभ्यासिकेत किंवा खोलीत स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉपमध्ये तल्लीन असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येते.

ऑनलाईन शिक्षणाचे धडे संपल्यावरसुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईलचा मोह आवरत नाही. अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा अतिवापर होऊ नये यासाठी पालकांना पाळत ठेवावी लागणार. मोबाईलमुळे आपले वर्गमित्र वा नातेवाईकांशी संवाद होणे सहज स्वाभाविक आहे. त्यातून मनातील मोकळेपणा व आनंदीवृत्ती निर्माण होते हे ही तेवढेच खरे आहे. परंतु फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर किंवा विविध निरुपयोगी साईट्सवर अविचारीपणे आपला मौल्यवान वेळ वाया घालवीत असेल तर त्यातून गंभीर समस्या उद्भवल्याशिवाय राहणार नाही. पंजाबच्या खरड येथील पब्जी प्रकरणाने सर्वच पालकांना हादरून सोडलेले आहे.

येथील सतरा वर्षीय तरुणाला त्याच्या पालकांनी ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोन दिला. तो पब्जी खेळाचा व्यसनाधीन असल्याने त्याने पब्जी अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी तसेच आपल्या मित्रांसाठी सुद्धा पब्जी अ‍ॅप विकत घेण्यासाठी आई-वडिलांच्या बँकखात्यातील १६ लाख रुपये खर्च केले. तो आपल्या आई-वडिलांच्या मोबाईलमधून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत होता आणि बँकेने पाठविलेले रक्कम वजा झाल्याचे संदेश डिलीट करत होता. या घटनेमुळे पालकांची धाकधूक वाढली आहे. पब्जी सारख्या लोकप्रिय मल्टी प्लेयर गेम्सचे वेड किशोरवयीन मुलांना लागत असून त्यांचा स्वभाव
हिंसक व आक्रमक होत आहे ही फारच चिंतेची बाब आहे.

ईडीची कारवाई : रियाचा मोबाईल, लॅपटॉप जप्त

बहुतांश किशोरवयीन मुले मोबाईल वापरताना आपल्या कुटुंबियांपासून स्वत:ला वेगळे ठेवतात, इतरांना टाळतात. आपल्या अभ्यासिकेत, एकांत खोलीत किंवा कोप-यात बसून फोटो, फेसबुक अपडेट करणे, फोटो दर्शविणे, चॅटिंग करणे, मजकूर पाठवणे अथवा संदेश पाठवणे यात मश्गुल असतात. ब-याचदा आपला पाल्य अभ्यासात मग्न आहे असा विश्वास पालकांना होतो. आजतागायत बरेचदा ही मुलं आपल्या कुटुंबियांशी संवाद साधण्याऐवजी एकटे राहणे पसंत करतात. आजघडीला कँडी क्रश, पोकेमॉन गो, अँग्री बर्ड या गेमचे छोटे-मोठे सर्वांना क्रेझ आहे. पण ब्ल्यू व्हेल, डेअर अँड ब्रेव, मोमो चॅलेंज व पब्जी या यांसारख्या नानाविध ऑनलाईन गेम्सनी मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे. या जीवघेण्या गेम्समुळे जगातील दोनशेपेक्षा जास्त तरुणांना आपले जीव गमवावे लागले. आपली मुलं कोणते ऑनलाईन गेम्स खेळतात यावर लक्ष ठेवावे व त्यांचे बरे-वाईट परिणाम समजावून सांगावे.

सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर सर्फिंग करताना आपली मुलं नेमकी काय करतात यापासून पालक अनभिज्ञ असतात. अपरिपक्व शाळकरी मुलांना तसेच तरुणांना आपल्या विळख्यात फसविणा-या सोशल मीडियावरील गेम्सपासून दूर कसे ठेवता येईल यासाठी मानसोपचारतज्ज्ञाशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे. बरीच मुलं हातात मोबाईल नसेल तर बेचैन होतात. त्यांना स्मार्टफोनची चटक व वेड लागू नये यासाठी सजग रहावे लागेल. इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जाणा-या गैरवापराबद्दल अनभिज्ञ असल्यानेच सायबर क्राईमचे बळी पडत असल्यामुळे सायबर गुन्हा व सायबर सुरक्षितता याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर फेक अकाऊंट वा प्रोफाईल तयार करून एखाद्याची बदनामी करणे, मानसिक त्रास देणे हा प्रकार खोडकरपणा व मस्करीच्या नादात करतात. इंटरनेटवरील पॉर्न साईट व अश्लील साईट ओपन करून कुतुहलापोटी बघत असल्याचे चर्चिले जात आहे. आक्षेपार्ह छायाचित्रे-चित्रफिती शेअर करणे व ती सोशल मीडियावर टाकणे किंवा इतरांना टाकण्यासाठी धमकावणे या घटना सध्या घडत आहेतच.

इंटरनेटची जोडणी व वायफायमुळे ई-बँकिंग, ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले असल्यामुळे एका नाण्याच्या दोन बाजू या न्यायाप्रमाणे त्यापासून होणारा धोका व फसवणुकीच्या घटना राजरोसपणे घडत आहेत. डेटा चोरी करणे, संगणकीय ओळख म्हणजे आयडी पासवर्ड हॅक करणे, फिशिंग, स्पॅम मेल, फसवे मेल, बुलिंग, पॉर्नोग्राफी, सॉफ्टवेअर पायरसी, बॉडी शेमिंग, हेरगिरी, बँक खात्यातून रक्कम लंपास करणे किंवा मोठ्या प्रमाणात खरेदी करणे, ऑनलाईन खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या माध्यमातून केले जाणारे गैरवापर सायबर क्राईमच्या कक्षेत येतात. सायबर गुन्हेगारीच्या जगात अनवधानाने पाऊल पडू नये यासाठी आपल्या पाल्यांना सायबर क्राईम व सायबर सिक्युरिटीविषयी जागरूक करण्यासाठी व संभावित धोका टाळण्यासाठी पालकांना खबरदारी घ्यावी लागेल.

सीरमची स्वदेशी लस डिसेंबरपर्यंत मिळणार

भारत सरकारने सध्या १०६ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. जातीय-धार्मिक द्वेष, हिंसा, निंदानालस्ती, प्रचार व अफवा अशा स्वरूपाचे व आशयाचे संदेश पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे, हे सांगावे लागेल. सायबर गुन्हेगारीच्या जगात अनवधानाने पाऊल पडू नये यासाठी पालकांनी आपली मुले नेमकं सोशल मीडियावर काय करतात त्यांच्या हालचालींवर लक्ष द्यावे. त्यांच्या पासवर्डची माहिती ठेवावी. समाज माध्यमावरील त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण याबद्दल विचारपूस करावी. अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करू नये. खासगी माहिती शेअर करू नये. माहिती पाठविताना खरी किंवा खोटी याची शहानिशा करावी. स्मार्टफोन व इंटरनेट आवश्यकतेप्रमाणे कमीत कमी वापरावे हे मुलांना समजावणे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे.

स्मार्ट फोन व इंटरनेटच्या अनावश्यक व अत्याधिक वापरामुळे त्याचे गंभीर शारीरिक-मानसिक परिणाम भोगावे लागत आहेत. कोरोनाच्या कहरामुळे मुलं बाहेरील परिसरात वा खुल्या मैदानावर जाऊ शकत नाहीत म्हणून कुटुंबातील वातावरणाचा फार मोठा वाटा आहे. वाढत्या ताणतणाव व दडपणातून बाहेर काढण्यासाठी मुलांच्या मन, विचार, भावनांना समजून अनुकूल व पोषक वातावरण देण्याची नितांत गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांची विचलित मनोवस्था आणि अस्वस्थता ओळखून किंवा मानसिकतेला समजून घेऊन मनमोकळेपणाने संवाद ठेवावा. विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याची काळजी जाणीवपूर्वक घेऊन ते सांभाळण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने व सायबर सेल यांनी संयुक्तिकरीत्या सायबर गुन्हा व सुरक्षिततेबद्दल पालक व मुलांचे वेबसंवादाच्या माध्यमातून समुपदेशन करावे, ही आजची निकड आहे.

प्रा. सपन नेहरोत्रा
नागपूर, मोबा.: ९१७५१ ७७७४४

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...

विषय व्याजाचा, गरज नाजूक हाताळणीची

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि साधारणत: जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉकचा काळ सुरू झाला आहे....

अर्थव्यवस्थेची घसरण तात्पुरती

केंद्रीय सांख्यिक विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वृद्धिदरात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कृषी वगळता...

वाढत्या आत्महत्या कशा रोखणार?

गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये आपल्या देशात दररोज सरासरी ३८१ जणांनी स्वत:चे जीवन संपवून मृत्यूला कवटाळले, असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोची (एनसीआरबी) नुकतीच प्रसिद्ध...

क्रांतीचा वणवा

हैदराबाद मुक्तिसंग्राम अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने-रक्ताने लिहिला गेला आहे. अबाल-वृद्ध महिला, तरुण या सर्वांनी स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम...

मुक्तिसंग्राम : नांदेड जिल्ह्याचा सहभाग

ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात ५६३ संस्थाने होती. त्याचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक बघत असत. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद. या संस्थानाची स्थापना मीर कमरूद्दीन निजाम...

वाद प्रश्नोत्तरांच्या तासाचा

कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यापासूनच एक वाद सुरू झाला आहे. हे संक्षिप्त...

प्रश्न मीडिया ट्रायलचा

साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे वाक्य सर्वांनी ऐकले असेल. शाळेत असताना यावर निबंध लिहिण्याचीही संधी मिळाली असेल. चित्रपट हा साहित्याचाच एक भाग मानला...

अभियंतादिन

आज १५ सप्टेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. १५ सप्टेंबर १८६१...

समाजाभिमुख अभियंता

१५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतरत्न, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमीत्त हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून देशभरामध्ये...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...