20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

एकमत ऑनलाईन

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत भारताचा संघर्ष सुरू असतानाच स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या एका पाठोपाठ एक चाचण्या करून भारत आपल्या क्षेपणास्त्रशक्तीचा स्पष्ट अंदाज जगाला देत आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने नुकतीच आणखी एक हनुमानउडी घेतली आहे. विशेषत: भारतीय वायुसेनेसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले ‘रुद्रम’ हे किरणोत्सर्गरोधी म्हणजे अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ९ ऑक्टोबर रोजी ओडिशामधील बालासोर येथे इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजमध्ये (आयटीआर) घेण्यात आली आणि एक नवा इतिहास रचला गेला. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या शास्त्रज्ञांकडून सुखोई एसयू-३० एमकेआय फायटर जेटच्या माध्यमातून डागण्यात आले आणि ‘रुद्रम’ने आपले लक्ष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले.

हे देशातच तयार झालेले नव्या पिढीतील पहिले अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला १०० ते २५० किलोमीटर यादरम्यान आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे पहिले असे क्षेपणास्त्र आहे, ज्याच्या साह्याने शत्रूच्या लक्ष्यावर क्षणार्धात प्रहार करता येतो आणि पापणी लवण्याच्या आत ते उद्ध्वस्त करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये या क्षेपणास्त्राचा पल्ला बदलता येतो. या क्षेपणास्त्राच्या साह्याने शत्रूचे सर्व्हिलान्स रडार, ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन सिस्टीम अशा लक्ष्यांवर अचूक प्रहार करता येतो. सध्या डीआरडीओकडून रुद्रमची चाचणी सुखोई एसयू-३० विमानाद्वारे घेण्यात आली आहे; परंतु ते पूर्णपणे विकसित झाल्यानंतर मिराज २०००, एचएएल तेजस तसेच एचएएल तेजस-मार्क २ या विमानांमधूनही डागता येईल.

शत्रूचे रडार किंवा त्याच्या हवाई सुरक्षा प्रणालीच्या चिंधड्या उडविण्याची क्षमता हे रुद्रमचे मोठे वैशिष्ट्य आहे. आपले लक्ष्य शोधून काढण्यात रुद्रम पटाईत आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करते आणि त्यामुळे शत्रूला या क्षेपणास्त्राचा माग काढणे शक्य होत नाही. लक्ष्य शोधून अचूक निशाणा साधण्यात रुद्रमला सक्षम करण्यासाठी त्यात एक रडार डोम असून, त्याच्या मदतीने जमिनीवर असलेल्या शत्रूच्या रडारला उद्ध्वस्त करता येते. रेडिओ सिग्नल तसेच रडारसोबत विमानात बसविण्यात आलेले रेडिओसुद्धा याच्या निशाण्यावर येऊ शकतात. याच कारणामुळे अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे हे क्षेपणास्त्र ‘युद्धाच्या मैदानातील अजेय योद्धा’ मानले जाते. भारतात तयार करण्यात आलेल्या या पहिल्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची गती मॅक-२ पासून मॅक-३ पर्यंत वाढवू शकता येते.

राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचा पवारांकडून पुणेरी भाषेत गौरव !

म्हणजेच रुद्रम क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षाही दुप्पट किंवा तिप्पट वेगाने आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करू शकते आणि ते उद्ध्वस्त करू शकते. कोणत्याही प्रकारचे सिग्नल किंवा रेडिएशन पकडून रडार नष्ट करण्यात हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. डी-जी बँडमध्ये नियंत्रित करण्यात येणारे या नव्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राचे मोठे वैशिष्ट्य असे की, रेडिओ फ्रिक्वेन्सी कुठून येत आहे, याचा शोध ते १०० किलोमीटर अंतरावरूनच लावू शकते.
अँटी रेडिएशन क्षेपणास्त्रे म्हणजे काय, हेही या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. ही अशा प्रकारची क्षेपणास्त्रे असतात, जी शत्रूच्या कम्युनिकेशन सिस्टीमवर म्हणजे दळणवळण यंत्रणेवर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठीच तयार केली जातात. या क्षेपणास्त्राला सेन्सर जोडलेले असतात आणि त्या माध्यमातून रेडिएशनचे स्रोत शोधून हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या जवळ जाते आणि त्यानंतर ते फुटते.

शत्रूचे रडार, जॅमर्स आणि बातचीत करण्यासाठी वापरण्यात येणा-या रेडिओला भेदण्यासाठीही वापरता येते. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर कोणत्याही युद्धाच्या पहिल्या टप्प्यात केला जातो. याखेरीज ही क्षेपणास्त्रे जमिनीवरून हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठीही वापरता येतात. रुद्रमची लांबी साडेपाच मीटर आणि वजन १४० किलोग्रॅम आहे. तसेच त्यात सॉलिट रॉकेट मोटर बसविण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र १०० ते २५० किलोमीटरच्या पल्ल्यातील कोणतेही लक्ष्य भेदू शकते. हे विमानात तैनात करण्यात येणारे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र असून, कितीही उंचीवरून ते डागता येते. पाचशे मीटरपासून पंधरा किलोमीटरपर्यंत कितीही उंचीवरून हे क्षेपणास्त्र लाँच करता येते आणि त्याचा प्रचंड वेगच त्याला मैदानातील अजेय योद्धा बनविणारा ठरतो. ज्यातून रेडिएशन निघतात अशी २५० किलोमीटरच्या पल्ल्यातील कोणतीही वस्तू बरबाद करणारे हे क्षेपणास्त्र आहे.

अंतिम हल्ल्यासाठी आयएनएस-जीपीएस नेव्हिगेशनच्या सोबत प्रायमरी गायडन्स सिस्टीम म्हणून वेगवेगळ्या फ्रक्वेन्सीवरील लक्ष्यांची ओळख पटवून त्यांचे वर्गीकरण करून निशाणा साधण्यासाठी उपयोगात आणले जाणारे पॅसिव्ह होमिंग हेडसुद्धा (पीएचएच) या क्षेपणास्त्रात बसविण्यात आले आहे. ब्रॉडबँड क्षमतेने युक्त पीएचएस उपकरणामुळे क्षेपणास्त्राला एमिटर्समधून आपले लक्ष्य निवडण्याची क्षमता प्राप्त होते. रुद्रमचा वापर भारतीय वायुसेनेकडून एअर डिफेन्स सिस्टीमच्या व्यतिरिक्त अशी रडार उद्ध्वस्त करण्यासाठीही केला जाईल, जी डिटेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला शटडाऊन करतात. निष्क्रिय होमिंग हेडने युक्त रुद्रम रेडिएशनच्या अनेक प्रकारच्या स्रोतांचा छडा लावल्यानंतर ते लॉक करून टाकते. अशी क्षेपणास्त्रे लाँच झाल्यानंतर जर शत्रूने आपले रडार बंद केले तरीसुद्धा शत्रूचे ते रडार रुद्रमच्या निशाण्यावर असू शकते. रुद्रम लाँच केल्यानंतरसुद्धा त्याला एखाद्या लक्ष्यासाठी लॉक करता येऊ शकते.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करा, राज्‍य सरकारचे रेल्‍वेला पत्र !

संरक्षण शक्ती वाढविण्याच्या दिशेने रुद्रम हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, कारण जगातल्या अनेक प्रमुख देशांकडून आता अशा प्रकारची क्षेपणास्त्रे विकसित केली जात आहेत, जी युद्धाच्या पहिल्या टप्प्यातच शत्रूची सिग्नल आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त करू शकतील. रुद्रम या कसोटीवर पूर्णपणे यशस्वी ठरले आहे. संरक्षणविषयक तज्ज्ञांच्या मते, रुद्रमच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेजवळ अशी शक्ती आली आहे, ज्याद्वारे शत्रूच्या हद्दीत घुसून त्याची वायुशक्ती उद्ध्वस्त करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर क्षेपणास्त्राच्या मदतीने भारतीय वायुसेनेला कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपल्या मोहिमा पूर्ण करण्यातही यश मिळेल. भारताच्या दृष्टीने सद्य:स्थितीत रुद्रमसारखी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्रे अत्यंत गरजेची आहेत. कारण शेजारील शत्रुराष्ट्रे आपापल्या सीमांवर रडार आणि देखरेख तंत्र विकसित करून भारतापुढे सातत्याने आव्हान निर्माण करीत आहेत. अशा स्थितीत ‘रुद्रम’सारखे उच्च तंत्रज्ञानयुक्त अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र विकसित करणे काळाची गरज होती आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीच्या माध्यमातून असे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश आले, ही आपल्या दृष्टीने अभिमानास्पद बाब होय. शत्रुराष्ट्राची विमानभेदी यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची क्षमता रुद्रमच्या रूपाने भारतीय वायुसेनेची शक्ती वाढविणारी ठरणार आहे.

प्रा. विजया पंडित

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...