27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeविशेषंदिलासादायक वास्तव

ंदिलासादायक वास्तव

एकमत ऑनलाईन

कोरोनानंतरच्या काळात जगभरात निर्माण झालेले खाद्य संकट, वाढती महागाई आणि केंद्रीय बँकांकडून वाढविण्यात येणारे व्याजदर पाहता जागतिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. भारताचा विचार केल्यास मंदीची शक्यता शून्यच असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्ग संकेतस्थळाने सर्वेक्षणादरम्यान अनेक अर्थतज्ज्ञांचे मत जाणून घेतले असून त्यात हे मत मांडण्यात आले आहे.

श्रीलंका, पाकिस्तानसह जगातील अनेक देश आज आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत. जवळपास सर्वच देशांत महागाई वाढली आहे. अनेक देशांचा परकी चलनसाठा आटत चालला आहे. पेट्रोल, डिझेलपासून खाण्याच्या वस्तू देखील आटोक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे ही जागतिक मंदी तर नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. जागतिक मंदीचे सर्वच देशांवर सारखेच परिणाम होतील असे नाही. जगातील सर्वांत प्रबळ अर्थव्यवस्था समजल्या जाणा-या अमेरिकेतही मंदीची चाहूल लागली आहे काय? असे बोलले जात असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एका भाषणात अमेरिकेत मंदीची शक्यता फेटाळून लावली. अर्थात मंदीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून वेगळेच आकडे समोर येत आहेत. दुसरीकडे भारतात मंदीची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. बायडन यांनी अमेरिकेत मंदी येणार नसल्याचे म्हटले असले तरी या आठवड्यात जारी होणा-या जीडीपीच्या आकडेवारीवरून चिंता व्यक्त होत आहे. आकडेवारी समाधानकारक नसल्यास अर्थव्यवस्थेची गती कमी होऊ शकते, अशी शंका व्यक्त होत आहे. पण अमेरिकेतील रोजगारांचे आकडे दाखवत अमेरिका मंदीत सापडणार नाही असा विश्वास बायडन यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

जागतिक आर्थिक संकट आणि मंदीबाबत ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले, की आशिया खंडात मंदी येण्याची शक्यता २० ते २५ टक्के आहे. त्याचवेळी अमेरिकेसाठी ४० टक्के तर युरोपसाठी ५० ते ५५ टक्के आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता ही शून्य टक्के होती. परंतु या महिन्यातील बदलती स्थिती पाहता अर्थतज्ज्ञांनी शून्यावरून ही शक्यता ३८ टक्क्यांवर नेली आहे. अमेरिकेला येत्या वर्षभरात मंदीचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले आहे. अर्थतज्ज्ञांनी न्यूझिलंड, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्स देश मंदीत अडकण्याची शक्यता वर्तविली. यात न्यूझिलंड हा मंदीच्या तावडीत सापडण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि तैवान येथे मंदीची शक्यता २०-२० टक्के आहे. फिलिपिन्समध्ये मंदी येण्याची शक्यता आठ टक्के आहे. या देशांत महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकांकडून व्याजदरांत सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे मंदीचे सावट फिलिपिन्समध्ये कमी राहील, असे म्हटले जात आहे.

आर्थिक आघाडीवर संघर्ष करणा-या श्रीलंकेत मंदी येण्याची शक्यता तब्बल ८५ टक्के वर्तविण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून श्रीलंकेची आर्थिक स्थिती ढासळली असून मंदीमुळे हा देश आणखीच गाळात जाण्याची शक्यता आहे. मंदीचे हे चित्र पुढील वर्षी पाहावयास मिळू शकते. गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात श्रीलंकेतील आर्थिक मंदीची शक्यता ही ३३ टक्के सांगण्यात आली होती. एका अर्थाने ३३ वरून ८५ टक्क्यांवर गेलेला आकडा हा एखाद्या देशासाठी सर्वाधिक मानायला हवा. अमेरिकेच्या अनेक नेत्यांनी मंदीच्या शक्यतांना फारसे महत्त्व दिलेले नाही आणि जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ही मंदीत अडकणार नाही, असेही म्हटले आहे. कारण अमेरिकेतील रोजगाराचा बाजार हा सुस्थितीत आहे.

– विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या