22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeविशेषसमुद्रशोक

समुद्रशोक

एकमत ऑनलाईन

समुद्रशोक ही मोठी व लांब अरोही वेल आयुर्वेदीक औषधी असून मजबूत खोड फांद्या असलेली आहे. ही आरोही वेल उष्ण आणि उपाण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढलेली आढळते. या लांब व उंच वाढणा-या वेलीचे मुळस्थान आशिया खंडातील भारत असावे असा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे समुद्रशोक ही वेल समुद्रसपाटीपासून सुमारे ३०० मीटर पर्यंत वाढलेली आढळते. या आरोही वेलीचा प्रसार भारतात सर्वत्र झाला असून कोकण व दख्खनच्या पठारावर जास्त प्रमाणात वाढलेली दिसते. सामान्यत: उद्यानात शोभेसाठी, परसदारी किंवा कुंपणावर तसेच समुद्राच्या काठावर, जास्त पर्जन्यमान असलेल्या जंगल भागात, रस्त्याच्या बाजूने, पडक्या जमिनीवर वाढलेली दिसते.

ब-याच वेळा झाडाच्या आधाराने वाढलेली वेल त्या झाडाच्या फांद्यावर पूर्णपणे पसरलेली असते. भारता शिवाय ही वेल म्यानमार, हवाई बेटे, ऑस्ट्रेलिया, मध्य अमिरेका आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात सापडते. ही वेल बागेमध्ये शोभेकरिता मांडवावर चढवितात. गुणधर्म : कडु, तिखट, तुरट, चवीनुसार गरम स्वभावाची, पाचक, कफ आणि वातनाशक. बिया – विर्यस्तंभक, पाने- दाहशामक जखमेवर व त्वचा विकारावर उपयुक्त. मुळे- शक्तीवर्धक, आरोग्यवर्धक, पोष्टिक व संधिवात आणि तंत्रिक तंत्राच्या विकारावर गुणकारी उपयोग : ४ डोकेदुखी : सध्याच्या धावपळीच्या युगात कामाचा व्याप वाढल्यामुळे ताण येतो व त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो अशा वेळी कोणतेही काम करणे कठीण होते. यासाठी समुद्रशोक वेलीचे मुळ अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी या वेलीचे ताजे मुळ स्वच्छ धुवून तांदळाच्या पाण्यात बारीक वाटून घ्यावे. हे वाटलेले मिश्रण कपाळावर लावावे त्यामुळे डोकेदुखी कमी होऊन आराम मिळतो.

४ पोट दुखी : ब-याच वेळा आपल्या ओटीपोटात दुखल्यामुळे असहय वेदना मुख्यत: अपचन, बध्दकोष्ठता, वायु व अजिर्ण झाल्यामुळे पोटदुखी होते यासाठी विधारा वेलीची पाने अत्यंत उपयुक्त औषधी आहे. त्यासाठी या वेलीची ताजी पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. या तयार केलेल्या ५ ते १० मिली स्वरसात थोडा मध मिसळून काही दिवस सेवन केल्यास पोटदुखी कमी होण्यास मदत होते. ४ मधुमेह : सध्या मधुमेह हा आजार साथीच्या रोगासारखा पसरला आहे. त्यासाठी समुद्रशोक वनस्पती अत्यंत महत्वाची औषधी आहे. त्यासाठी १ ते २ ग्रॅम चूर्ण मधात मिसळून नियमितपणे कांही दिवस सेवन करावे. त्यामुळे हळुहळु आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचा स्तर कमी होऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास फायदा होतो. सध्याच्या आधुनिक युगात कामाच्या व्यापामुळे खाण्याकडे लक्ष द्यावयाला वेळ मिळत नाही त्यामुळे जमेल तसे बाहेरचे जेवण व जंक फुडचे सेवन करावे लागते त्यामुळे स्थुलपणा वाढत चालला आहे. त्यासाठी विधारा वनस्पतीच्या पानाच्या रसात करंज वृक्षाच्या बियाचे तेल मिसळून प्रयोग केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

४ मुत्रविकार: हा मुत्रविकार कमी होण्यासाठी विधारा वेलीच्या मुळाचे चूर्ण अत्यंत गुणकारी औषधी आहे. या आजारामध्ये लघवीमध्ये जळजळ होऊन वेदना होतात व लघवीचे प्रमाणही कमी होते किंवा थेंब-थेंब लघवी होते त्यासाठी या वेलीच्या मुळाचे चूर्ण अत्यंत गुणकारी औषधी आहे. या आजारामध्ये लघवीमध्ये जळजळ होऊन वेदना होतात व लघवीचे प्रमाणही कमी होते किंवा थेंब-थेंब लघवी होते. त्यासाठी या वेलीच्या मुळाचे चुर्ण तयार करावे. दोन भाग चुर्ण व एकभाग गाईचे दुध मिसळून सेवन केल्यास मुत्रविकार कमी होते. ४ पक्षाघात : हा आजार अर्धांगवायुचा प्रकार असून यालाच लकवा असेही म्हणतात. या आजारामध्ये आपल्या शरीराचा डावा किंवा उजवा भाग कमकुवत होऊन त्याच्या हालचाली व संवेदना कमी होतात. त्यासाठी विधारा मुळ आणि इतर घटक मिळून बनवलेले अजमोदादी चूर्ण काही दिवस नियमितपणे दुधाबरोबर सेवन केल्यास पक्षाघातात फायदा होतो. ४डोळ्याचे आजार : विधारा वेल डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी ५ मिली पानाच्या रसामध्ये ५ मिली मध मिसळून डोळ्यामध्ये काजळासारखे काही दिवस नियमितपणे वैद्याच्या सल्यानुसार लावावे. त्यामुळे डोळ्याचा लालसरपणा व खाज कमी होण्यास फायदा होतो. ४ गर्भधारणा : महिलांना गर्भवती होण्यासाठी (गर्भ राहत नसल्यास) समुद्रशोक वेलीचे मुळ अत्यंत उपयोगी आहे.

त्यासाठी समुद्रशोक वेलीचे मुळ आणि लघु पिंपरी वृक्षाचे मुळ समप्रमाणात घेऊन त्याचा काढा तयार करावा. हा २० ते ३० मिली काळा दररोज सकाळी वर्षभर नियमितपणे घेतल्यारा फायदा होतो. मात्र मासिक पाळी दरम्यान हा काढा घेणे टाळावा. ४ अण्डकोषाची सूज: विधाराच्या पानामध्ये सुज विरोधी गुणधर्म आहेत. ब-याच वेळा अण्डकोषावर सुज आल्यास अस वेदना होतात. त्यासाठी विधाराच्या पानांना एरंडेल लावून थोडे गरम करून अण्डकोषावर बांधून ठेवावे असे काही दिवस केल्यास सूज कमी होऊन आराम मिळतो. वातदोषाचे असंतुलन झाल्यास बोटांना सुज येऊन वेदना होतात. समुद्रशोक वेलीमध्ये वातशामकाचे गुणधर्म आहेत. त्यासाठी या वेलीचे चुर्ण २ ते ४ ग्रॅम या मात्रेमध्ये पाण्याबरोबर नियमितपणे सेवन केल्यास वातदोष कमी होण्यास मदत होते. ४ जखम झाल्यावर त्यातून जास्तीचा रक्तस्त्राव होतो व तो लवकर थांबत नाही त्यासाठी समुद्रशोक अत्यंत उपयुक्त औषधी आहे. कारण त्यामध्ये कषाय (तुरट) तत्वे आहेत. त्यासाठी या पानाचा रस प्यावा व पानाचा लगदा जखमेवर लावावा. ४ श्वेत प्रदर : महिलांमध्ये संक्रमण झाल्यामुळे योनीतून पांढरा स्त्राव येतो. हा जरी सामान्य आजार असला तरी त्यामुळे स्त्रियांना अशक्तपणा येतो व थकवा जाणवतो.
टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या