22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषश्री वरदविनायक

श्री वरदविनायक

एकमत ऑनलाईन

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ऋग्वेदातील ‘द्रश्त्ये व गणानं त्वा’ या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित म्हणून त्यांनी येथील अरण्यात ‘ओम गं गणपतये नम:’ या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरदविनायक म्हटले जाऊ लागले.
आख्यायिका : या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली.

त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटाकार असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.

महडचा वरदविनायक आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेशभक्तांची भावना आहे. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. स्थान : तालुका- खालापूर, जिल्हा- रायगड, अंतर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर खालापूर व खोपोलीदरम्यान हाळ या गावाजवळ. खालापूर-हाळ १ कि.मी., खोपोली-हाळ ३ कि.मी., हाळ-महाड १ कि.मी., पाली ४० कि.मी., ओझर-लेण्याद्री १५० कि.मी. निवास : भक्तनिवास (दूरध्वनी-९५२१९२, २६६९१२) जवळची ठिकाणे : खोपोली – योगीराज गगनगिरी महाराज यांचा आश्रम. खंडाळा : थंड हवेचे ठिकाण. लोणावळा : थंड हवेचे ठिकाण. मनशक्ती रेस्ट न्यू वे आश्रम, वळवण धरण. कारले : लेण्या व एकविरा देवीचे स्थान. देहू : संतश्रेष्ठ तुकोबांच्या वास्तव्याने पुनित झालेले स्थान. चिंचवड : मोरया गोसावी यांची संजीवन समाधी.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या