21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष रौप्यमहोत्सवी...सदाबहार...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

एकमत ऑनलाईन

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय रोमँटिक चित्रपटांची लाट बॉलिवूडमध्ये येण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरला होता. शाहरूख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘शोले’नंतरचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यामागे काही खास कारणे होती. १९९२ आणि १९९३ मध्ये दीवाना, डर, बाजीगर यांसारखे यशस्वी चित्रपट करणा-या शाहरूख खानला ‘दिलवाले..’ने नव्या पिढीचा सुपरस्टार बनविले. आदित्य चोप्रा यांचा या चित्रपटात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून उदय झाला. पदार्पणातच उत्तम कामगिरी करून त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली.

यश चोप्रा, बी. आर. चोप्रा, रवी चोप्रा यांसारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकांच्या कुटुंबाचा सदस्य असूनसुद्धा आदित्य चोप्रा यांनी स्वत:ची वेगळी वाट निवडली आणि पहिल्याच चित्रपटात यश मिळविले. शाहरूख-काजोल यांनी या चित्रपटापूर्वी ‘बाजीगर’मध्ये एकत्र अभिनय केला होता. परंतु ‘दिलवाले…’मुळे ही रोमँटिक जोडी सुपरहिट ठरली. राज कपूर-नर्गिस, धर्मेंद्र-हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन-रेखा यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत इतक लोकप्रिय होणारी रोमँटिक जोडी दिली ती ‘दिलवाले…’नेच!

यश चोप्रा यांच्या यशराज फिल्म्स या प्रॉडक्शन हाउसची सूत्रे आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटापासून आपल्या हाती घेतली. हमखास यशस्वी चित्रपट देणारा समूह म्हणून या प्रॉडक्शन हाउसची ओळख बनली ती ‘दिलवाले…’मुळेच. या चित्रपटात युरोपातील चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर होते. १९६० च्या दशकात रंगीत चित्रपट सुरू झाल्यापासून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण परदेशांत झाले. परंतु ‘दिलवाले…’ हा युरोपातील विशेषत: स्वित्झर्लंडमधील पर्यटनवृद्धीला बळ देणारा चित्रपट ठरला. स्वित्झर्लंडमधील ज्या हिमाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन ‘दिलवाले..’मध्ये झाले, ती सर्व ठिकाणे नंतर पर्यटकांची आकर्षणकेंद्रे बनली. परदेशी चित्रीकरण करण्याचे प्रमाणही याच चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत वाढले.

नव्वदीच्या दशकाच्या मध्यापर्यंत चित्रपटांमधील डायलॉगबाजीचा काळ ओसरला होता. तत्पूर्वी चित्रपट एखाद्या डायलॉगमुळेही लोकप्रिय होत असत. परंतु ‘‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’’ यांसारखे ‘दिलवाले…’मधील अनेक डायलॉग हिट ठरले. विशेष म्हणजे, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनीही आपल्या भाषणात ‘दिलवाले…’मधील संवाद म्हटला होता.

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

‘दिलवाले…’मधील केवळ संवादच नव्हे तर काही दृश्येही सुपरहिट ठरली. चित्रपटाच्या शेवटी काजोल रेल्वे प्लॅटफॉर्मवरून धावत येते आणि शाहरूख खान तिला हात देऊन धावत्या गाडीत ओढून घेतो हे दृश्य नंतर वेगवेगळ्या कलाकृतींसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मार्गांनी चित्रित करण्यात आले. १९९० चे दशक सुरू झाल्यापासून बॉलिवूडमधील अ‍ॅक्शनपटांचा काळ ओसरताना दिसत होता. ‘दिलवाले…’ने अ‍ॅक्शनपटांच्या मालिकेला शेवटचा मोठा धक्का दिला आणि रोमँटिक, संगीतमय चित्रपटांच्या जमान्याला जन्म दिला. ‘दिलवाले…’नंतर बॉलिवूडमधील प्रत्येक निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला स्वित्झर्लंडमध्ये जाऊन आल्प्स पर्वतराजीत आणि हॉलंडमधील ट्युलिप्सच्या बागांमध्ये चित्रीकरण करण्याचा मोह होऊ लागला. चित्रीकरणासाठी ही लोकेशन तोपर्यंत केवळ यश चोप्रा यांनीच वापरली होती. संगीतप्रधान चित्रपटांची लाट खरे तर महेश भट्ट यांच्या ‘आशिक’मुळे १९९० मध्ये सुरू झाली होती. तथापि, ‘दिलवाले…’ हा त्याचा कळसाध्याय ठरला. आनंद बक्षी यांनी गीतांमध्ये वापरलेले साधे-सोपे; परंतु प्रभावी शब्द आणि जतिन-ललित यांचे सुश्राव्य संगीत यामुळे ‘दिलवाले…’मधील गाणी प्रचंड गाजली. ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणे विशेष गाजले.

या चित्रपटाच्या यशाचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे मुंबईचे ‘मराठा मंदिर’ चित्रपटगृह. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सलग २५ वर्षे हा चित्रपट ‘मराठा मंदिर’मध्ये टिकून राहिला. लॉकडाऊन सुरू झाला नसता, तर या चित्रपटगृहात ‘दिलवाले…’ने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले असते. परंतु कोणत्याही एका चित्रपटगृहात एकच चित्रपट सर्वाधिक काळ चालण्याचा विक्रम ‘दिलवाले…’ने २००९ मध्येच प्रस्थापित केला होता. त्यावर्षी या चित्रपटाला ‘मराठा मंदिर’मध्ये ७०० आठवडे पूर्ण झाले होते. यापूर्वी हा विक्रम ‘शोले’च्या नावावर होता.

‘शोले’ मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात सुमारे साडेपाच वर्षे चालला होता. इंडिया टाइम्स मूव्हीज या नियतकालिकाने भारतातील ‘पाहिलेच पाहिजेत’ अशा २५ सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत ‘दिलवाले…’चा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे जगभरातील १००० चित्रपट, जे मृत्यूपूर्वी प्रत्येकाने पाहायला हवेत, अशा जागतिक यादीतसुद्धा ‘दिलवाले…’ झळकला आहे. या यादीत भारतातील केवळ तीन चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटाने व्यवसायातही वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले. ‘दिलवाले…’ने भारतात ५८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर परदेशांत १७.५ कोटींची कमाई केली. परदेशांत सर्वाधिक यशस्वी झालेला चित्रपट, असा बहुमान ‘दिलवाले…’ने पटकावला.

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

‘दिलवाले…’च्या निर्मितीची कहाणीही अत्यंत रोचक आहे. आधी ‘ब्रेव्ह हार्ट विल टेक द ब्राइड’ हे चित्रपटाचे नाव होते. आदित्य चोप्रा या चित्रपटासाठी टॉम क्रूझला हिरो म्हणून घेणार होते. परंतु यश चोप्रा यांच्या सल्ल्यानुसार आदित्य यांनी शाहरूख खानला प्रस्ताव दिला. आदित्य यांना शाहरूखसोबत चार बैठका कराव्या लागल्या, तेव्हा शाहरूखने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. जर शाहरूखने हा चित्रपट स्वीकारला नसता, तर आदित्य चोप्रा यांची पुढील पसंती सैफ अली खानला होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हे नामकरण किरण खेर यांनी केले. चित्रपटात शाहरूखने वापरलेले प्रसिद्ध लेदर जॅकेट उदय चोप्रा यांनी कॅलिफोर्निया येथील बेकर्सफल्ड भागात असलेल्या हार्ले-डेव्हिडसन या शोरूममधून ४०० डॉलरला खरेदी केले होते.

काजोलच्या नियोजित वराची म्हणजेच कुलजीतची भूमिका करण्यासाठी आधी अरमान कोहलीबरोबर बोलणी सुरू होती. परंतु परमीत सेठी हा ऑडिशनला येताना बूट, जीन्स आणि वेस्टकोर्ट घालून आला तेव्हा त्याची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली. ‘मेरे ख्वाबों में जो आए’ हे या संगीतमय चित्रपटातील पहिले ध्वनिमुद्रित झालेले गाणे ठरले. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्यात आदित्य चोप्राने २४ वेळा बदल करायला लावले आणि अनेक ओळी बदलल्या. चित्रपटाचे बरेच चित्रीकरण परदेशांत झालेले असले, तरी ‘तुझे देखा तो ये जाना सनम..’ हे सुपरहिट गाणे पिवळ्या फुलांच्या ज्या शेतात चित्रित करण्यात आले आहे, ते लोकेशन गुडगावमधील आहे.

प्रेमासाठी बंडखोर बनणे आणि प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असणे, या भावनेचे प्रतीक म्हणजे ‘दिलवाले..’ हा चित्रपट. प्रेमात पडलेल्या व्यक्तंना आज २५ वर्षांनंतरसुद्धा हा चित्रपट ताजाच वाटतो. प्रेम करणे सोपे आहे; परंतु ते तडीस नेणे अत्यंत अवघड आहे, हे या चित्रपटाने सांगितले. प्रेम तडीस नेत असताना शेवटच्या क्षणापर्यंत किती अडचणी येतात, याचे चित्रण ‘दिलवाले..’मध्ये करण्यात आले आहे. चित्रपटातील सर्वांच्या भूमिका आणि संवादफेक अत्यंत वास्तवदर्शी आहे. त्याबरोबरच सदाबहार संगीत हे त्याचे बलस्थान आहेच. अवघ्या २४ व्या वर्षी ‘दिलवाले..’सारखा यशस्वी चित्रपट तयार करणा-या आदित्य चोप्रा यांना या चित्रपटासाठी कोणत्या धाटणीचे संगीत अपेक्षित आहे, हे पुरेपूर ठाऊक होते. संगीतकार म्हणून जतिन-ललित यांच्या नावाची शिफारस आशा भोसले यांनी केली होती. यश चोप्रा यांनी त्यांच्या घरीच म्यूझिक सेशन आयोजित केला होता. यश यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा तसेच आदित्य आणि उदय चोप्रा ही त्यांची मुले त्यावेळी उपस्थित होती.

‘मेहंदी लगा के रखना’, ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्यांच्या वेगवेगळ्या चाली जतिन-ललित यांनी त्यावेळी ऐकविल्या. या सेशननंतर जतिन-ललित यांना काही दिवस कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. ब-याच दिवसांनी आदित्य चोप्रा यांनी जतिन-ललित यांना भेटायला बोलावले आणि चित्रपटाच्या संकल्पनेविषयी आणि त्यांच्या संगिताविषयीही विस्तृत चर्चा केली. ‘दिलवाले..’च्या अशा अनेक आठवणी आता संबंधित व्यक्तंच्या आयुष्यात सोनेरी अक्षरांनी नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट ठरलेल्या ‘दिलवाले..’ने आज २५ वर्षे पूर्ण केली असली, तरी तो जुना झालेला नाही. तो सदाबहार होता आणि राहील.

सोनम परब

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या...

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार...

दीदींना ‘टक्कर’

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...