27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषमुक्तिसंग्रामातील बळिराम सोनटक्के यांचे भरीव योगदान

मुक्तिसंग्रामातील बळिराम सोनटक्के यांचे भरीव योगदान

एकमत ऑनलाईन

१५ ऑगस्ट १९४७ला भारत देश इंग्रजांच्या राजवटीमधून मुक्त झाला पण निजाम राजवटीत पारतंत्र्यात असणारा महाराष्ट्रातील मराठवाडा (८ जिल्हे) स्वतंत्र झाला नव्हता. १५ ऑगस्टला संपूर्ण मराठवाड्यात तिरंगा ध्वज फडकला नव्हता.

हैदराबादच्या निजामाच्या आधिपत्याखाली असणारा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमध्ये होता व हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामास स्वतंत्र भारतात सामील होण्यास सांगितले पण निजाम सरकार व त्याच्या सैन्याचा प्रमुख रझवी (रझाकार) ऐकण्यास तयार होत नव्हते. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई केली व संपूर्ण मराठवाड्यात हेलिकॉप्टरद्वारे प्रत्येक गावावर पत्रक टाकून निजामाविरुद्ध लढा उभा केला. त्यावेळी उदगीरचे श्यामलालली आर्य यांनी उस्मानाबाद, नांदेड, बीदर येथे मोठी चळवळ उभी केली होती. त्यामध्ये चाकूर येथे गणेशराव कुलकर्णी, भीमसेनजी आर्य यांनी नागनाथ शेटे यांच्या घरी आर्य समाज सुरू करून हिंदू संघटना उभी केली.

तसेच गिरधारीलाल नावंदर यांनी तालीम काढून पैलवानांची फौज तयार केली. त्यांना नरसिंग भांगे यांनी शस्त्रे, बंदुका, बॉम्ब तयार करून पुरवठा केला. निजामाच्या रझाकारांकडून गावातील हिंदू नागरिकांना त्रास होत असल्याने आधीच हिंदू चिडून होते. त्यात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे पत्रक आल्याने व लातूर रोड येथे रेल्वेने बिदरहून आलेले रझाकार यांची एकच घालमेल झाल्याने सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी पोलिस ठाणे चाकूर येथील बंदुका, शस्त्रसाठा रात्रीतून पळवला व दुसरे दिवशी लढा उभा राहिला. मारुती बागलगावे, बळिराम सोनटक्के, निवृत्ती रेड्डी यांनी जय भवानी गल्लीमध्ये एका तासात १८ रझाकार सैन्य यमसदनी पाठवले.

अशी बरेच दिवस झटापट सुरू होती. त्यात काही स्वातंत्र्यसैनिक भूमिगत रहात. पण बळिराम सोनटक्के व निवृत्ती रेड्डी यांना अटक झाली. त्यांना अहमदपूर जेलमध्ये ठेवण्यात आले. पण हे दोघे जेलमध्ये गोंधळ घालत असल्याने त्यांना बिदर येथे साखळदंडाने बांधून नेण्यात आले. बिदर येथे सहा महिने झाल्यावर व निजामावर अ‍ॅक्शन झाल्यानंतर निजाम शरण आला त्यामुळे या दोघांना सोडून देण्यात आले. मराठवाडा संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेश १७ सप्टेंबर १९४८ ला ख-या अर्थाने स्वतंत्र झाले. तो हा वर्धापन अमृतमहोत्सव आहे.

अशा वीर बहादूर स्वातंत्र्यसैनिकांना कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्यसैनिक बळिराम सोनटक्के चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वयोवृद्धांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी व चष्म्यांचे वाटप, सर्वरोगनिदान शिबिरे, आधार काठ्यांचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

अ.ना. शिंदे, चाकूर
८६६८९ ८५५८१

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या