21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home विशेष नशिबाचे भोग

नशिबाचे भोग

एकमत ऑनलाईन

‘‘तुमी कवा जारी केलाव दौखाना?’’ म्हनीत पेशंट मदी आला आन् काय दुकुलालय त्ये न सांगनातेच धा मिन्टं आरडू आरडू बोलूलाला. सोताला ऐकू यैना गेल्यावरी मानसं आवाज वाडवून बोलत्यात म्हनून त्येनं गुरदाळा केल्यावानी बोलुलाल्ता. ‘‘वाहनं न्हाईत, येशट्या थांबना गेल्यात, आटू बांदून आलाव. त्येनं नगदी पाचशे लागत्याल म्हन्ला तरीबी म्हन्लो चल म्हनून. पाच वरीश झालं उटंल्ता कान, त्येच्याबाद आताच दुकुलालाय’’ आसं पुना पुना सांगीत माज्याम्होरी बसला. त्येनं आटूवाल्यावरी नाराज व्हता आसं बी न्हाई. जास्तीचा पैका घेईनाका पन येळंला कामाला आलाय आस्लाच भाव व्हता.

कोनाकोनाचं येकाद बार सांगीटल्यानं समादानच व्हैना. लई काकळूतीनं सांगूलाल्ता त्येनं. आमच्या ग्रामीन भागामदले लोकं पैलेच बिमारी अंगावर काडतेत आन त्येच्यामदी आस्ली आनीबानीवानी कंडिशन. लई खस्ता खाऊलालेत लोकं. नरसाळ्या पाखरूमाळ झाल्यावानी समदीकडं पसरूलालाय आन् वरचेवरी औगड करून ठिवूलालय. पैलेच कामधंदा त्येनं बंद पडलाय आन् वरून तरास, आन येक्स्ट्राची पैशाची गार बी. पार नाट लावल्यावानी लावलाय त्या नरसाळ्यानं! बाकीच्या टायमाला धा-ईस रुपयात येशटीत बसून येना-या मान्सावाला आटूवालेबी कैचीत पकडल्यावानी करूलालेत.

आडला हरी आन् गाडवाचे पाय धरी म्हन्ल्यावानी येळ आलीया. कोनी कोनी मानुसकीनं वागनारेबी हायीत, पन लई कमी. मागं येकदा शेजारच्या म्हाता-याला आनल्ता येक आटूवाला दावायला, त्येच्याकडं ध्यान देनारं कोनीबी न्हाई म्हनून. येळकाळ काय कोनावरबी सांगून यैना याचाबी ईचार करना गेलेत कोनीबी. वरल्या वरी हानावं म्हनूलालेत. आज आल्याला पेशंट ईचारुलाल्ता पूना किती रोजाला दावायला यावावं म्हनून. म्या त्येला पुना पुना समजिवलो, सांगीटल्यालं ध्यान दे, यायाची गरजच पडना. आन येकांदी सुदरना गेल्यान फोन लाव, त्येच्यावरीच सांगतो समदं म्हन्लो. बारक्या बारक्या गोष्टीकडं ध्यान दिल्यानं येळच यैना दौखान्यात यायाची, पन ईसरत्यात, नशिबाचे भोग हाय म्हन्त्यात, पन ध्यान दैनात. येशट्या सुरू झाल्याउशीर उगं येकदा येऊन जातो दावायला, तेवडंच समादान व्हतंया म्हनीत त्यानं गेला. शेवटाला समादानच जरुरी -हातंया. व्हय की न्हाई?

डॉ.संजय शे. कुलकर्णी
कान-नाक-घसा तज्ज्ञ

तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो-उदोचा जयघोषात नवरात्र महोत्सव प्रारंभ

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

काळ सोकावता कामा नये!

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक कलाकारांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये जो हलकल्लोळ सबंध देशभरात उडालेला दिसून आला...

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत भारताचा संघर्ष सुरू असतानाच स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या एका पाठोपाठ एक चाचण्या करून भारत आपल्या क्षेपणास्त्रशक्तीचा स्पष्ट अंदाज जगाला देत...

गरज शाश्वत आर्थिक संरक्षणाची

जागतिक हवामान बदलांचे आणि तापमानवाढीचे दृश्य बदल अलीकडील काळात सातत्याने अनुभवास येत आहेत. विशेषत: याचा पर्जन्यमानावर झालेला बदल दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत आहे....

ओंगळवाणा चेहरा

मुलींना आपले विचार मुक्तपणे मांडता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांपासून उपयुक्त मंच ठरत आहे. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच या आभासी जगातही त्यांना अवमान...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...