शुन्यातून प्रवास करत आजपर्यंत असंख्य महापुरुषांनी आणि माणसांनी प्रेरणादायी जग निर्माण केले हा इतिहास आहे. मग, आम्ही का नाही? माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरुन त्याची किंमत होत नसते. परंतु , तो इतरांची किती किंमत करतो यावरुन त्याची किंमत ठरत असते. पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या, मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच किडे- मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमानही करु नका आणि कोणाला कमी लेखु नका. तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण, वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करु शकते. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही. कंठ दिला कोकीळेला पण रुप काढून घेतले. रुप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला. दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला. हे मानवा…. कधी करु नको अहंकार स्वत:वर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल. लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात. याचाच अर्थ असा की, लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दु:खात मागुन चालत असतात. लोक त्यांच्या रितीने पुढे-मागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय?, आपलं जीवन आपण आपल्या हिंमतीवर व निश्चयानेच जगायच असत.
आज कोरोना महामारीने अनेकांना जमिनीवर आणलं. धन, दौलत, पैसा, अडका अमाप असू दे पण, वेळ आली की, त्याची किंमत पालापाचोळा होते. कोण मेला?, झालं होतं काय?, याचा कसलाही विचार आज होताना दिसत नाही. मेला ना… मग विषय संपला. मेलेला माणुस कोरोनानेच मेला का? याची कसलीही खातरजमा न करता मेलेल्या माणसावर अघोषीत बहिष्कारच टाकलं जात आहे. कितीही जवळचा रक्ता, नात्यातला असला तरी मौतीला जाणे म्हणजे आपलं काही खरं नाही, ही भावना बळावत चालली आहे.
यातुन माणुसकी गुदमरत आहे. आज गुदमरणारी माणुसकी उद्या मेली तर काय होईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. परिस्थितीच तसी आहे हे मान्य पण, चक्क बहिष्कारच टाकणे हे माणुसकीच्या कुठल्याच धड्यात न बसणारे आहे. याचा विचार होणे आवश्यक आहे. कोरोना आज आहे, उद्या नसेलही कदाचित. पण एकदा का माणुसकी गेली तर ती पुन्हा मिळवायला किती काळ जाईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे एखादा माणुस दुर्दैवाने मेला तर त्यावर चक्क कोरोनाचा छापा मारुन माणुसकीचा अंत करु नका. गुदमरणारी माणुसकी जीवंत राहिल यासाठी आपण सर्वजन एक होऊन काहीं तरी करुया…
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज : खा. राजेनिंबाळकर