21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home विशेष सूचना चांगल्या; पण...

सूचना चांगल्या; पण…

एकमत ऑनलाईन

महिलांच्या विरोधात घडणा-या गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून केल्या जाणा-या अनिवार्य कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने विस्तृत मार्गदर्शक सूचना नुकत्याच दिल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू असणा-या या अ‍ॅडव्हायजरीमध्ये अशा गुन्ह्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करण्यापासून त्वरित कारवाई करण्यापर्यंत अनेक मुद्यांचा अंतर्भाव आहे. गृहमंत्रालयाच्या २०१९ च्या अ‍ॅडव्हायजरीमधून घेतलेल्या या मुद्यांमध्ये प्रामुख्याने महिलांच्या विरोधात होणा-या गुन्ह्यांच्या बाबतीत वेळेवर आणि सक्रिय कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. महिलांच्या बाबतीत घडणा-या गुन्ह्यांच्या बाबतीत त्वरित एफआयआर दाखल करण्याचे तसेच एफआयआर दाखल न करणा-या अधिका-याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश या अ‍ॅडव्हायजरीत देण्यात आले आहेत. अत्याचाराच्या घटनेचा तपास करण्याची प्रक्रिया (स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम- एसओपी) आणि अशा गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी किट आणि पूर्वीच जारी केलेल्या सूचनांचा उल्लेखही करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत बलात्काराचे गुन्हे वाढले आहेतच; शिवाय अशा प्रकरणांमध्ये टोकाचे क्रौर्यही पाहायला मिळाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एकंदरीत ही अ‍ॅडव्हायजरी कायदेशीर कारवाईची तत्परता, गंभीरता, लैंगिक संवेदनशीलता आणि सूक्ष्म तसेच स्पष्ट तपासाबाबतची आहे.

वास्तविक महिलांच्या विरोधात घडणा-या गुन्ह्यांच्या तपासाबाबत होणारी टाळाटाळ खरोखर चिंताजनक आहे. अशा गंभीर गुन्ह्याच्या बाबतीतच सर्वाधिक असंवेदनशीलता आणि उदासीनता दर्शविली जाते, हे दुर्दैवी आहे. अगदी एफआयआर दाखल करण्यासही टाळाटाळ केली जाते. परिणामी, अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर तर परिणाम होतोच; शिवाय गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे ते एक मोठे कारण ठरते. वर्षानुवर्षे अशा गुन्ह्याच्या तपासात असाच असंवेदनशील दृष्टिकोन अवलंबिण्यात येत असल्याचे दिसते. दरवेळी असा गुन्हा घडला की रस्त्यापासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्यावर चर्चा होते. सर्वसामान्य लोक निषेध नोंदवितात, परंतु बदल काहीच घडताना दिसत नाही. लोकांच्या सर्व संवेदना आणि निषेधाचे सूर थंड पडतात आणि प्रलंबित खटल्यांच्या यादीत आणखी एका घटनेची भर पडते. अशा संवेदनहीन यंत्रणेच्या ओझ्याखाली अशी कित्येक प्रकरणे दबून राहिली आहेत. बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत तपास असो वा वार्तांकन असो, संवेदनशीलता आणि समजूतदारपणा अल्पवयीन व्यक्तींच्या बाबतीतसुद्धा दाखविला जात नाही, असाच अनुभव आहे.

अशा प्रकरणांमध्ये कारवाईच्या संबंधाने दाखविला जाणारा हा बेजबाबदारपणा महिलांविषयी वाईट दृष्टिकोन असणा-या लोकांना अप्रत्यक्ष पाठबळ देणारा ठरतो. त्यांची हिंमत वाढते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १७३ अन्वये बलात्काराच्या गुन्ह्याची चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर अशा गुन्ह्यांच्या बाबतीत गृहमंत्रालयाचे ऑनलाईन पोर्टलसुद्धा आहे. लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेल्या पीडितेची तपासणी तिच्या सहमतीने एखाद्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून २४ तासांत झाली पाहिजे, असा नियम आहे. परंतु तक्रार दाखल करण्यापासून पुरावे गोळा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत इतकी ढिलाई दिसते की, पीडितेचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत अधिकाधिक अन्याय सहन करीत राहते. केंद्राने यापूर्वीही राज्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली होती. पोलिसांनी महिलाविषयक गुन्हे करणा-यांवर कठोर कारवाई करावी, हा त्यामागील हेतू होता. यात एफआयआर नोंदविणे, पुरावे गोळा करणे आणि सेक्शुअल असॉल्ट एव्हिडन्स कलेक्शन (एसएईसी) किट, दोन महिन्यांत तपास पूर्ण करणे आणि लैंगिक गुन्हे करणा-यांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता. तरीसुद्धा हा ढिलाईचा दृष्टिकोन जवळजवळ प्रत्येक घटनेनंतर आणि जवळजवळ प्रत्येक राज्यात दिसून येतो. पोलिसांचा उपेक्षापूर्ण दृष्टिकोन दु:खद आहेच; शिवाय महिलांनी आपल्या वेदना मोकळेपणाने मांडाव्यात असे वातावरणसुद्धा पोलिस ठाण्यात नसते. देशातील अधिकांश पोलिस ठाण्यांत महिला डेस्कसुद्धा नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.

वेबसिरीजमधील अश्लीलता

महिलांविरुद्ध गुन्हे करणा-यांच्या क्रौर्याची परिसीमा ज्या प्रकरणात दिसली त्या दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यासाठी निर्भयाचे माता-पिता प्रदीर्घकाळ एक लढाई लढत राहिले आणि गुन्हेगारांना अखेर फाशीची शिक्षा झाली. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या या अत्यंत क्रूर घटनेच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट अशी की, तपासात कोणतीही ढिलाई झाली नाही. दिल्ली पोलिसांच्या अनेक अधिका-यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना आठवडाभर स्वत:ला एका खोलीत बंदिस्त करून घेतले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची एक निर्भया एसआयटी टीम तयार करण्यात आली होती. या टीमने ज्या तत्परतेने तपास पूर्ण करून पुरावे गोळा केले आणि आरोपपत्र दाखल केले, त्या संपूर्ण प्रक्रियेमुळेच दोषींना फाशीची शिक्षा होऊ शकली, हे नाकारता येत नाही.

प्रचंड दबावाखाली पोलिस अधिका-यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आपली जबाबदारी चोख बजावण्याची दिल्ली पोलिसांच्या इतिहासातील ही पहिली वेळ होती, असे मानले जाते. ज्या घटनेच्या तपासात सुरुवातीच्या काही तासांमध्ये अजिबात धागेदोरे मिळाले नसतानासुद्धा, त्या घटनेची तड काही तासांत लावता येते आणि दोषींना फाशीची शिक्षाही होते, याचे हे एक आदर्श उदाहरण ठरले. दिल्ली पोलिसांनी या घटनेत तयार केलेले आरोपपत्रही ऐतिहासिक ठरले. तसे पाहायला गेल्यास कोणत्याही गुन्हेगारी घटनेच्या योग्य तपासाचा पक्का पाया आणि कठोर कायदे यामुळेच न्याय मिळतो. महिलांच्या विरोधात घडणा-या गुन्ह्याच्या बाबतीत तपासाच्या सुरुवातीच्या काळात ढिलाई दाखविल्यामुळे न्याय मिळण्यात अडचणी येतात, असे दिसून येते. त्यामुळेच कठोर कायदेही अशा घटना रोखण्यात समर्थ ठरले नाहीत. घटना घडल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्येच गतीने तपास होणे आणि पुरावे गोळा केले जाणे आवश्यक आहे.

विठ्ठल मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक फुलांची सजावट

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीनुसार, कठोर कायदेशीर तरतुदी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी अन्य पावले उचलल्यानंतरसुद्धा जर पोलिस अनिवार्य प्रक्रियेचे पालन करण्यात असफल झाले, तर महिलांना न्याय देण्याच्या बाबतीत देशाच्या न्यायप्रणालीत ही मोठी बाधा ठरेल. दुर्दैवाने तसे होतही आहे. मुली आणि महिलांची सुरक्षितता या विषयात पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. त्यामुळेच लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करण्याऐवजी अनेकजण मौन राखणे उचित समजतात. एवढे असूनही लैंगिक गुन्ह्यांची आकडेवारी भयावह आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोकडून सादर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये देशात दररोज बलात्काराच्या सरासरी ८८ घटना उघड झाल्या. क्रौर्य आणि पुरुषप्रधान मानसिकतेतून घडणारे असे गुन्हे सामाजिक-कौटुंबिक वातावरणाचे दर्शन घडवितातच; परंतु त्याचबरोबर पोलिसांची कारवाईबाबत ढिलाईही अनेकदा अशा गुन्ह्यांत दिसते. महिलांची प्रतिष्ठा कायम राखायची असल्यास अशा प्रकरणांत सखोल चौकशी, त्वरित कारवाई आणि संवेदनशीलता अपेक्षित आहे.

-अ‍ॅड. प्रदीप उमाप
कायदे अभ्यासक

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

नवरात्र एक इव्हेंट मॅनेजमेंट

‘वसुधैव कुटुंबकम’ अशी आपल्या हिंदू संस्कृतीची ओळख... हीच उदात्त विचारसरणी आपल्या संस्कृतीचा पाया आहे. ‘स्वीकार्ह वृत्ती’ हा आपल्या समाजाचा खरा स्वभाव याचे जेवढे फायदे...

विविध विकारांवर गुणकारी ‘वासनवेल’

वासनवेल ही आरोही प्रकारची वनस्पती असून असून ती उष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात वाढलेली आढळते. या वनस्पतीचे मूळस्थान भारत, पाकिस्तान, व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश असावा...

राजभवन, राजकारण व घटनात्मक मर्यादांचे सीमोल्लंघन!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले खरमरीत पत्र व त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले तेवढेच सणसणीत उत्तर यामुळे मागच्या आठवड्यात आणखी एका वादाचा...

घटनेचा विसर न पडो…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याबाबत लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यपाल हे पद चर्चेच्या केंद्रस्थानी...

पाऊस असा का पडतोय?

जागतिक हवामान बदलांचा परिणाम मान्सूनवर होत असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी-शास्त्रज्ञांनी मागील काळात मांडले होते. तथापि, त्यावेळी पावसात फार मोठ्या प्रमाणावर बदल दिसून न आल्याने...

नशिबाचे भोग

‘‘तुमी कवा जारी केलाव दौखाना?’’ म्हनीत पेशंट मदी आला आन् काय दुकुलालय त्ये न सांगनातेच धा मिन्टं आरडू आरडू बोलूलाला. सोताला ऐकू यैना गेल्यावरी...

वेबसिरीजमधील अश्लीलता

एका वेबसिरीजमध्ये आक्षेपार्ह आशय असल्याबद्दल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जुलैमध्ये त्या मालिकेला आव्हान देण्यात आले होते. यावर केंद्र सरकारने जे उत्तर न्यायालयात दिले ते अत्यंत...

हद्द

‘गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही,’ हे वाक्य खास पोलिसांसाठी राखीव असण्याचे दिवस सरले. आता राजकीय पक्षांनीही हद्दी आखून घेतल्यात आणि गुन्हा घडला त्या राज्यात...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...