22.1 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home विशेष अनलॉकनंतरही आधार हवाच!

अनलॉकनंतरही आधार हवाच!

एकमत ऑनलाईन

काही आठवड्यांपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आणि ती अर्थव्यवस्थेची पीछेहाट दाखविणारी होती. जीडीपीचा वृद्धीदर उणे २३.९ टक्क्यांवर घसरल्याचे त्यातून दिसले. अर्थव्यवस्थेच्या वाटचालीची त्रैमासिक आकडेवारी जाहीर करण्यास १९९६ मध्ये सुरुवात झाली, तेव्हापासूनची जीडीपीने गाठलेली ही नीचांकी पातळी आहे. हा आकडा आपल्याला वेगळे काहीच सांगत नाही. महानगरे, लहान शहरे आणि ग्रामीण भागात राहणा-या बहुतांश भारतीय नागरिकांची सध्याची नाजूक आर्थिक स्थिती तो आपल्याला सांगतो. औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांमधील अनेकांचा रोजगार या परिस्थितीने हिरावला आहे. कोविड-१९ च्या प्रसारामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे लाखो लोकांनी नोक-या गमावल्या, तर प्रत्येक क्षेत्रात असंख्य कर्मचा-यांच्या वेतनात वेगवेगळ्या प्रमाणात कपात करण्यात आली, असे विविध अहवालांवरून दिसून येते.

लोकांवर ओढवलेल्या भीषण आर्थिक संकटाचे प्रतिबिंब आणखी एका गोष्टीत दिसून आले, ती म्हणजे अनेकांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेतली. कामगारमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ईपीएफमधून ३९,४०० कोटी रुपये काढण्यात आले. लॉकडाऊनमुळे आर्थिक क्षेत्रातील घडामोडी थंड पडल्या आणि त्याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर झाला हे खरे असले, तरी कोविड-१९ चा उद्रेक होऊन लॉकडाऊन जाहीर करायला लागण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नव्हती, हे दर्शविणारे अनेक पुरावे आहेत. लॉकडाऊनमुळे फक्त एकच गोष्ट झाली, ती म्हणजे लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्वी होती त्यापेक्षा अधिक हलाखीची केली.

देशपातळीवर लॉकडाऊन जाहीर करावा लागल्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली, अनेक लोकांनी नोक-या गमावल्या, असंख्य कुटुंबांना मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जीडीपीची आकडेवारी आश्चर्यजनक अजिबात नाही. गाँव कनेक्शन टीम आणि लोकनीती- सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) या संस्थांनी २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २५,३७१ लोकांशी संंवाद साधून गोळा केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण आपल्याला सत्यशोधनासाठी मदत करते. या आकडेवारीतून भीषण परिस्थिती दिसून येते. लॉकडाऊनमुळे आपले काम पूर्णपणे (४४ टक्के) किंवा बहुतांश (३४ टक्के) बंद राहिले, अशी प्रतिक्रिया सर्वेक्षणात सहभाग असणा-या ७८ टक्के लोकांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

लॉकडाऊनपूर्वीच्या काळाशी तुलना करता लॉकडाऊनच्या काळात असंख्य कुटुंबांना प्रचंड आर्थिक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अवघड होऊन बसले होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु लॉकडाऊनच्या पूर्वीच्या काळातसुद्धा आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अडचणी होत्या, असे सांगणा-या कुटुंबांची संख्याही मोठी असल्यामुळे कोविड-१९ चा प्रसार होऊन लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच असंख्य ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचा प्रश्न होता, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनने फक्त त्यांच्या समस्यांमध्ये भर घातली, एवढेच! लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीही भारतातील ६० टक्के ग्रामीण कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे अवघड बनले होते. लॉकडाऊननंतर अशा कुटुंबांची संख्या ७३ टक्के झाली.

अर्थात, कोविड-१९ ने ग्रामीण भारतातील आर्थिक अडचणी वाढविल्या हेही खरे. लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक वर्गांमधील लोकांच्या कामावर परिणाम झाला असल्याने सर्वांच्या आर्थिक परिस्थितीत अत्यल्प कालावधीत मोठा बदल झाला. ग्रामीण भागात बेरोजगारी ही प्रमुख समस्या आधीपासून होतीच; परंतु लॉकडाऊननंतर परिस्थिती आणखी बरीच बिघडली, कारण शहरांमधील स्थलांतरित मजूर-कामगार आपापल्या गावी परतले. आपल्या गावात बेरोजगारीची समस्या अत्यंत तीव्र आहे, असे ७७ टक्के लोकांनी सर्वेक्षणावेळी नमूद केले आहे. गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांपैकी अनेकजण आता पुन्हा शहरात गेले असून, अनेकजण तसे नियोजन करीत आहेत हे खरे आहे; परंतु पुढील काही महिने तरी शहरात परत जायचे नाही, असे ठरविलेल्या मजुरांची संख्याही प्रचंड मोठी आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे सांगतात की २८ टक्के कामगार-मजूर पुन्हा शहरात परतू इच्छित नाहीत, तर १६ टक्के मजुरांना आपण शहरात परत जाऊ की गावातच राहू, हे सांगता येत नाही. असे लोक सध्या शेतमजूर म्हणून काम करीत आहेत किंवा मनरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मजुरी करीत आहेत.

स्थिर उत्पन्नाचा अभाव असणे याचाच अर्थ सध्याच्या आर्थिक धक्क्याने देशभरातील अनेक कुटुंबांचे भवितव्य रामभरोसे झाले आहे. लॉकडाऊन सुरू असताना पैसा संपला म्हणून आपल्याला वाढीव कर्जे आणि उसनवारी करावी लागली, असे सर्वेक्षणादरम्यान जवळजवळ एकचतुर्थांश लोकांनी (२३ टक्के) सांगितले. ग्रामीण भागातील काहीजणांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संपत्ती गहाण टाकावी लागली अथवा विकावी लागली. अर्थव्यवस्थेतील एकमेव सक्षम क्षेत्र म्हणून शेतीकडे लक्ष वेधले आहे. कृषी आणि अन्य अनुषंगिक व्यवसायाच्या क्षेत्राने या कठीण काळातही ३.४ टक्क्यांची वाढ दर्शविली. सर्वेक्षणाचे निष्कर्ष असेही सांगतात की, लॉकडाऊनमुळे पिकांची कापणी, पिके बाजारात नेणे आणि पुढील हंगामासाठी पेरणी करणे या सर्व गोष्टी उशिराने झाल्या असल्या, तरी अन्य क्षेत्रांमधील लोकांना जेवढा आर्थिक फटका सहन करावा लागला, त्या तुलनेत शेतक-यांना बसलेली झळ सौम्य होती. आपल्या शेती उत्पादनाला पिकांच्या सरकारी दराच्या आसपास भाव मिळाला, असे निम्म्याहून अधिक म्हणजे ५८ टक्के शेतक-यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर

जीडीपीमधील उणे किंवा नकारात्मक वाढीमुळे लोकांच्या उपभोग प्रवृत्तीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसते. लोकांचे कमी झालेले उत्पन्न, नोकरीविषयी अनिश्चितता आणि रोजगाराची रोडावलेली संधी यामुळे उपभोग प्रवृत्तीमध्ये बदल घडून आला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांना दैनंदिन गरजांवरील खर्च कमी करावा लागला, अशा कुटुंबांची संख्या बरीच मोठी आहे. आटा, तांदूळ, अन्नधान्ये आणि डाळी अशा जीवनावश्यक वस्तूंवरील खर्च सुमारे ४९ टक्के लोकांनी कमी केला. स्नॅक्स, बिस्किटे आणि मिठाई यांसारख्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवरील खर्च जवळजवळ दोन तृतीयांश म्हणजे ६३ टक्के लोकांनी कमी केला. त्याचप्रमाणे ग्राहकोपयोगी वस्तूंची (फास्ट मूव्हिंग कंज्युमेबल गुड्स- एफएमसीजी) मागणीही बरीच कमी झाली. उदाहरणार्थ, साबण आणि शाम्पूसारख्या वस्तूंवरील कुटुंबाचा खर्च कमी झाला आहे, असे ५६ टक्के लोकांंनी नमूद केले आहे.

लोकांचे उत्पन्न कमी झाल्याचा प्रतिकूल परिणाम केवळ त्यांच्या सध्याच्या खर्चावरच झाला आहे असे नाही तर अनेकजणांची उपभोग प्रवृत्ती भविष्यातही कमीच राहणार आहे. नोकरीबद्दल शाश्वती नसणे आणि भविष्यात पगारात आणखी कपात होण्याची धास्ती यामुळे महागामोलाच्या वस्तू खरेदी करण्याचे नियोजन असंख्य कुटुंबांनी पुढे ढकलले आहे. ज्या वस्तूंचा उपयोग टाळता येऊ शकतो, अशा वस्तूंवरही सध्या खर्च करायचा नाही, असेही नियोजन लोकांनी केले आहे. ४९ टक्के लोकांनी जीवनावश्यक खाद्यवस्तूंवरील तर ५७ टक्के लोकांनी साबण, शांपू यांसारख्या वस्तूंवरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ग्रामीण भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष असले तरी निमशहरी भागात आणि महानगरांत याहून वेगळी परिस्थिती असेल, असे वाटत नाही. अनलॉक-५.० नंतर देशभरात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट दिली गेली असून, त्यामुळे आर्थिक घडामोडी पुन्हा रूळावर येऊ लागल्या आहेत. परंतु आर्थिक पुनरुज्जीवन अत्यंत मंदगतीने होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांना आर्थिक पाठबळ देत राहणे अनिवार्य बनले आहे.

प्रा. संजय कुमार
सीएसडीएस, नवी दिल्ली

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...