25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeविशेषकाळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच...!

काळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच…!

एकमत ऑनलाईन

लातूर : हरणाचा पळण्याचा वेग ताशी ९० किमी तर वाघाचा ६० किमी… तरीपण वाघ हरणाची शिकार करतो. कारण हरणाच्या मनात भिती असते की, आपण वाघापेक्षा कमजोर आहोत व हीच भिती त्याला वारंवार मागे पाहण्यास भाग पाडते. त्यात त्यांचा वेग व मनोबल कमी होते. तो वाघाची शिकार होतो…! कोरोनाच पण तसच आहे.

कोरोना पेक्षा आपली रोग प्रतिकार शक्ती किती तरी पटीने जास्त असताना केवळ भितीमुळे आपल मनोबल व वेग कमी झाला. परिणामी काही मृत्यू झाले आहेत़ कोरोना विषाणूचा संसर्ग कसा रोखायचा?, कोणती काळजी घ्यायची?, याबाबत सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, नगरपालिका, नगरपंचायतीपासून ते विविध सामाजिक संस्थांकडूनही प्रबोधन प्रारंभीच्या काळात झाले़ गेली चार-पाच महिने आपण कोरोनाशी लढत आहोत.

आपल्याला आपल्या आजाराचे उपचार, तपासणी करण्यासाठी कोविड केअर सेंटर्स, डेडीकेट हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आता तर खाजगी हॉस्पिटलही उपलब्ध आहेत़ या ठिकाणी जाऊन तपासणी करुन घेऊन तपासणीच्या अहवालानूसार उपचार घेणे ही काही शिक्षा नव्हे. आपल्यापासून इतरांना संसर्ग टाळण्याकरिता वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. आपल्या शरीर स्वच्छतेकरिता वारंवार हात धुणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण स्वत:ही सुरक्षित आणि आपले परिवार ही सुरिक्षत राहील.

जर आपली तपासणी निगेटिव्ह आली तरी सुध्दा आपणाला स्वत:ची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपली तपासणी पॉझिटिव्ह आली तर चिंतेचे कारण काय? उपचार आहेत ना़ प्रार्थना करा की आपण या आजारातून सुरक्षित बाहेर येऊ. खात्री बाळगा ९८ टक्के कोरोनाबाधीत रुग्ण या आजारातून सही सलामत बाहेर पडतात.

समजा आपण कोरोना पॉझिटिव्ह आहात याचा अर्थ असा नाही की, आपला जीव धोक्यात आहे. या आजाराने केवळ २ टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आपण विचार करावा की मी उर्वरीत ९८ टक्केमध्ये आहे. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे तरी आपण संयम पाळावा. आपणांस काही दिवस इतरापेक्षा वेगळे राहून खबरदारी घेणे आवश्यक असल्यास हरकत काय? त्यामुळे आपल्या कुटुंबातील आई-वडिल, मुले व परिवारातील इतर सदस्य सुरक्षित राहतील. ही वेळ अवघड निश्चितच आहे, परंतु हे ही दिवस जातील. जर आपल्या मनात काही चिंता, उदासिनता येत असले तर तज्ज्ञांशी संपर्क साधून शंकांचे समाधान करुन घ्या़ घाबरु नका. काळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच…!!

Read More  सोशल डिस्टंसिंग ठेऊन आज जि.प. कर्मचा-यांच्या बदल्या

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या