24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeविशेषझुकीनीचे फायदे

झुकीनीचे फायदे

एकमत ऑनलाईन

झुकीनी ही काकडी वर्गीय वनस्पती. या लहान झाडाला नरफुले व मादीफुले एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. विशेष म्हणजे काही देशामध्ये या झाडाच्या फळाबरोबरच फुलांपासून (नर व मादी) सुद्धा वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्यासाठी वापरले जातात. सध्या झुकीनी या फळ झाडाची लागवड अनेक देशात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे झुकीनीचे फळ लवकर येणारे असून या फळाचे कवच( साल) आणि बिया पूर्णपणे परिपक्व होण्याच्या अगोदरच हे फळ कच्चे किंवा शिजवून अथवा भाजून किंवा सॅलॅडच्या स्वरूपात खाल्ले जाते. या फळाचे पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यातल्या दिवसा हे फळ आवडीने खातात.

रोगप्रतिकारक शक्ती : झुकीनी वनस्पतीमध्ये बीटा, कॅरोटिन आणि लायकोवीन विपूल प्रमाणात असतात. या दोन्ही संयुगामुळे आपली रोगप्रतिकारक प्रमाण मजबूत होते. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती कोणत्याही व्यक्तीला अनेक आजारापासून वाचविण्यास मदत करते. झुकीनी फळामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण मुबलक असते. तंतुमय पदार्थ दिर्घकाळपर्यंत पोटाला परिपूर्णतेची भावना देतात. ज्यामुळे भूक कमी लागते. अशा परिस्थितीला लठ्ठपणा कमी होण्यास फायदा होतो. त्यामुळे झुकीनीचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रित होण्यास मदत होते. मात्र वजन कमी करण्यासाठी आहाराबरोबरच व्यायामाची अत्यंत गरज असते. झुकीनीची भाजी किंवा सूपच्या स्वरूपात आहारात समावेश करू शकतो. झुकीनीची फळे मॅग्नेशिअम, फॉस्फरस, जीवनसत्व क आणि अँन्टीऑक्सिडंटसने समृद्ध असते.

या सर्व घटकांसोबत कॅल्शियमची मात्रा सुद्धा चांगली असे. जे आपल्या हाडाचे व स्रायुचे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ही पोषक तत्वे हाडाबरोबरच दाताची मजबुती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. हदयाला निरोगी ठेवण्यासाठी झुकीनी अत्यंत उपयोगी आहे. झुकीनी फळामध्ये बिटा-कॅरोटिन नावाचे पोषक तत्व असते ज्यामध्ये अँन्टीऑक्सिडंटसचा प्रभाव असतो. हे अँन्टीऑक्सिडंटस पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणतणावापासून वाचवण्याचे काम करतात. त्याचबरोबर यामधील तंतुमय पदार्थ हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या फळाचा आहारात समावेश करावा. झुकीनी फळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास फायदा होतो.रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये पोटॅशिअमची मोठी भूमिका असते. पोटॅशिअम मुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. व त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा नियंत्रीत राहण्यात मदत होते.त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारात झुकीनीचा समावेश करावा. झुकीनी आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचे काम करू शकते. झुकीनी फळामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात जे हानिकारक (एडीएल) कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. म्हणजेच कोलेस्टेरॉल स्तर नियंत्रित करण्यात फायदेशीर आहे.

म्हणून एखाद्या व्यक्तीला कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास निरोगी आहार म्हणून समाविष्ट करावा. झुकीनी फळामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याची पुष्टी केली आहे. प्रामुख्याने झुकीनीच्या सेवनाने पोटाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. एका संशोधनानुसार झुकीनीमध्ये न्युटिन नावाचे महत्त्वाचे तत्व असते जे अत्यंत प्रभावीपणे अँन्टीऑक्सिडंटस म्हणून काम करते. हे अँन्टीऑक्सिडंटस शरीरातील मुक्त रॅडिकल््सचा प्रभाव कमी करून कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात. विशेष म्हणजे स्तनाचा कर्करोग रोखण्यास (उपचार नव्हे) फायदा होऊ शकतो. सध्याच्या धावपळीच्या जगात जेवणाच्या अनियमिततेमुळे मधुमेहाचा प्रसार झपाट्याने होत आहे. झुकीनीचे फळ पिष्टमय पदार्थाने समृद्ध असलेले आहे. विशेष म्हणजे पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत करण्याचे काम करतात. त्यामुळे मधुमेहींनी झुकीनीचे सेवन अवश्य करावे. झुकीनी फळामध्ये सुजविरोधी गुणधर्म आहेत. त्याचबरोबर वेदना कमी करण्याची क्षमता सुद्धा आहे. रक्तामध्ये युरिक अ‍ॅसिडची मात्रा असल्यामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होते. या आजारामध्ये सांध्यावर सूज येऊन अस अशा वेदना होतात. त्यामुळे ज्यांना संधीवाताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये झुकीनीच्या फळाचा /भाजीचा नियमित समावेश केल्यास फायदा होतो.

दम्याची समस्या टाळण्यासाठी झुकीनीच्या फळाचे सेवन हा एक उत्तम पर्याय आहे. झुकीनीच्या फळामध्ये क जीवनसत्व असते. जे एक प्रकारचे शक्तीशाली अँन्टीऑक्सिडंटस असून दाहक विरोधी प्रभाव प्रदर्शित करते. ज्यामुळे दम्याच्या रुग्णाला काही प्रमाणात आराम मिळतो. त्यासाठी झुकीनीच्या फळाचा दररोजच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर योगा केल्यास फायदा होतो. झुकीनीच्या फळामध्ये क जीवनसत्वाशिवाय अनेक पोषक घटक आहेत ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. वाढत्या वयाबरोबर डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागते. त्यासाठी झुकीनीचे सेवन अत्यंत उपयोगी आहे. त्याचबरोबर यात असलेले ल्युटीन आणि जैक्सैथीन घटक वाढत्या वयानुसार मॅक्युलरचा होणारा -हास थांबविण्यास मदत करतात. म्हणून झुकीनीचे सेवन अवश्य करावे. झुकीनी फळामध्ये तंतुमय पदार्थ विपूल प्रमाणात असतात. त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे मलनिस्सारण व्यवस्थित होऊन बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही. तसेच यामुळे आतड्याचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. म्हणून ज्या लोकांना गॅस, अपचन, आंबट ढेकर इत्यादी समस्या आहेत त्यांनी कच्ची किंवा भाजी अथवा सूपच्या स्वरूपात झुकीनी सेवन करावी.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या