20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष नियोजनाचा ‘अंधार’

नियोजनाचा ‘अंधार’

मुंबईमध्ये काही तासांसाठी झालेल्या ‘बत्ती गुल’ची चर्चा देशभरात झाली. राज्य सरकारनेही तात्काळ त्याबाबत पावले उचलत भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याचे आश्वासन दिले. मुंबईचे आर्थिक-औद्योगिक आणि एकंदरीत महत्त्व लक्षात घेता असे प्रकार घडता कामा नयेत हे योग्यच; पण मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्र नित्यनेमाने नियोजनबद्ध अंधाराचा सामना करत आला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या ३ वर्षांचे चार्ट उपलब्ध आहेत ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यातून सुटका कधी होणार?

एकमत ऑनलाईन

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा, सीईटी परीक्षा, सिग्नल यंत्रणा, रुग्णालये आदींना बसला. महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट एकची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट दोनवर होता. मात्र, सर्किट दोनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगडमधील अनेक भागांना फटका बसला, असे कारण याबाबत सांगण्यात आले. या ‘बत्ती गुल’ घटनेवरून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा आणि इतिहासातील घटनांना उजाळा देण्याचा सिलसिला सुरू झाला. मुळात, वीज हा विषय तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असल्याने राजकीय नेतेमंडळी त्यात फारसे लक्ष घालत नाहीत. त्यामुळे अधिकारी त्यांना सहज गुमराह करत असतात.

म्हणूनच मुख्य मुद्दा हा आहे की ही घटना टाळता आली असती का याची प्रथम चौकशी होणे गरजेचे आहे. कारण असे प्रकार टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या गेल्या तर यापुढील काळात ‘बत्ती गुल’ची पुनरावृत्ती घडणार नाही. कारण ‘बत्ती गुल’चा प्रकार हा नवा नाही. भारतातच नव्हे तर अमेरिकेतही असा प्रकार घडतो. पण ग्रीड फेल्युअर झाल्यानंतर स्थिती पूर्ववत करण्यासाठीच्या उपाययोजना आपण किती जलदगत्या करतो आणि कशा पद्धतीने करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. मुंबईच्या प्रकरणामध्ये यातच उणीव राहिल्याचे दिसते आहे. कारण, सहा महिन्यांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात जेव्हा दिवेबंद करण्याचा देशव्यापी कार्यक्रम पार पडला तेव्हा याच ग्रीड मॅनेजमेंट करणा-या लोकांनी ग्रीड अतिशय चांगली सांभाळली होती. त्यावेळी देशभरात कुठेही पॉवर फेल्युअर होऊ दिले नाही.

वास्तविक, त्यावेळी तसे घडण्याच्या शक्यता अनेकांनी वर्तवल्या होत्या. पण याच लोकांनी अत्यंत कुशलतेने आणि आपले कसब पणाला लावत या शक्यता खोट्या ठरवल्या होत्या. त्याबाबत देशभरातून कौतुकही करण्यात आले होते. कदाचित त्यावेळचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित असल्यामुळे पॉवर फेल्युअर टळले असेल; परंतु एकंदरीत विचार करता अशा प्रकारची तांत्रिक समस्या उद्भवल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठीची प्रणाली-व्यवस्था आधीपासून तयार असणे गरजेचे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे यातून राजकारण बाजूला केले गेले पाहिजे.

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

यापलीकडे जाऊन एक मुद्दा मांडणे मला आवश्यक वाटते. औद्योगिकदृष्ट्या, आर्थिदृष्ट्या, लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळेच मुंबईतील बत्ती गुलची शासनाकडून, ऊर्जामंत्र्यांकडून तातडीने दखल घेतली आणि परत अशी घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले गेले हेही ठीक आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वर्षानुवर्षे दर महिन्याला तांत्रिक बिघाडामुळे हजारो तास लक्षावधी ग्राहकांना अंधारात बसावे लागत आहे त्यावर कधी उपाययोजना होणार?

महावितरणच्या संकेतस्थळावरील ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील विश्वासार्हतेचा निर्देशांक हा चार्ट असून तो स्वयंस्पष्ट आहे. ऑक्टोबर २०१९ या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या १५,७४५ घटना घडल्या ज्यामधे राज्यातील ४ कोटी हून अधिक ( ४,१०,२८,४५७ ) नागरिकांना एकूण २०१७६ तास अंधारात बसावे लागले.

महाराष्ट्रात महावितरणला सर्वांत जास्त महसूल मिळवून देणा-या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या १३७८ घटना घडल्या ज्यात पुणेकरांना १६८७ तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर २०१९ चा चार्ट बघता असे दिसते की या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या १०९९४ घटना घडल्या ज्यामध्ये राज्यातील अडीच कोटी हून अधिक ( २,७८,१२,५८८) नागरिकांना एकूण १५१६७ तास अंधारात बसावे लागले.

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

महाराष्ट्रात महावितरणला सर्वांत जास्त महसूल मिळवून देणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पण देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. डिसेंबर २०१९ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या ७१३ घटना घडल्या ज्यात पुणेकरांना ८८९ तास अंधारात बसावे लागले. दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे महावितरणसाठी बंधनकारक आहे. मात्र जानेवारी २०२० पासून आजतागायत हा चार्टही प्रसिध्द झालेला नाही.

महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या ३ वर्षांचे चार्ट उपलब्ध आहेत ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. याव्यतिरिक्त देखभाल-दुरुस्तीसाठी आठवड्यातून एक दिवस (पुण्यात गुरुवारी) म्हणजेच महिन्यातून चार दिवस काही तासांचा नियोजनबद्ध अंधार राज्यातील अनेक शहरे-नगरे सोसतच आहेत. ग्रामीण भागात भारनियमनामुळे होणा-या अंधाराविषयी तर न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हे भारनियमन पूर्वसूचना देऊन केले जाते. वीज जाणारच, लोकांनी आपले नियोजन आधीपासूनच करून ठेवावे अशी महावितरणची भूमिका असते.

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

पुण्यातील आणि राज्याच्या अन्य शहरा-गावांतील या भारनियमनाबाबत २०१० मध्येही कोणती यंत्रणा विकसित केली गेली नाही, २०१५ मध्येही नाही आणि आता २०२० मध्येही पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती आहे. त्यामुळे पुणेकरांना आणि उर्वरित महाराष्ट्राला भारनियमन, पॉवर कट यात नवीन काहीच नाही. म्हणूनच मुंबईच्या घटनेच्या निमित्ताने राज्यातील शहरांसाठीचे बॅक अ‍ॅप प्लॅन्स तयार करण्याच्या दिशेने वेगाने पावले पडावीत अशी अपेक्षा आहे.

विवेक वेलणकर
सजग नागरी मंच

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...