20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

एकमत ऑनलाईन

ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यासह युरोपीय महासंघ आणि आसियानच्या सदस्य देशांपर्यंत सर्वच देश हिंद प्रशांत संकल्पनेला पुरेसे महत्त्व देऊ लागले आहेत. चीनपुढे क्षेत्रातील इतर देशांना धमकावण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. चीनचे नकारात्मक प्रयत्न पाहता भारताने इंडो पॅसिफिक संकल्पना मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांना आणखी गती द्यायला हवी.

इंडो पॅसिफिक म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रात सध्या आव्हान वाढते आहे. हिंद प्रशांत हा शब्दच ज्याला खटकतो त्या चीनकडून या क्षेत्रात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू असून, तो यशस्वी मात्र होताना दिसत नाही. ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यासह युरोपीय महासंघ आणि आसियानच्या सदस्य देशांपर्यंत सर्वच देश हिंद प्रशांत संकल्पनेला पुरेसे महत्त्व देऊ लागले आहेत आणि आता हे क्षेत्र हा त्या देशांच्या परराष्ट्र धोरणाचा हिस्सा बनला आहे. त्यामुळे या क्षेत्रात दहशत निर्माण करून परिसरातील देशांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणे हा एकमेव उपाय चीनच्या हाती उरला आहे.

चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वांग यी यांनी कंबोडिया, मलेशिया, लाओस, थायलंड आणि सिंगापूरच्या आपल्या ताज्या दौ-यात असेच काहीसे करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या योजनांबद्दल सर्व देशांनी सतर्क राहावे, असा सल्ला तर चीनने या देशांना दिलाच; शिवाय अमेरिकेचे ‘इंडो पॅसिफिक’ धोरण पूर्व आशियाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचेही सांगितले. आग्नेय आशियाई देशांसाठी त्यांचा स्पष्ट संदेश असा होता की, चीन आणि आसियान देशांनी मिळून दक्षिण चीन समुद्रात ‘बा हस्तक्षेप’ दूर करण्यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार! – परिवहन मंत्री अनिल परब

अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडल्यामुळे तसेच या क्षेत्रात एक विश्वसनीय साक्षीदार म्हणून उभारण्याचे अमेरिकेचे प्रयत्न पाहून यी यांनी या क्षेत्रातील देशांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांवर चर्चा केली. परंतु यी यांच्या दौ-यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो जपान दौ-यावर येऊन गेले होते आणि त्यांच्या दौ-यामुळे भूराजकीय तणावाला खतपाणीही घातले गेले होते. ‘क्वाड’ समूहाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ते आले होते. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचा ‘क्वाड’ समूहात समावेश होतो. चीनच्या हालचालींविषयी संशय व्यक्त करून २०१७ मध्ये या गटाचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. या गटातील सर्वच देशांना या क्षेत्रात अत्यंत स्थिर असे संतुलन हवे आहे.

त्यामुळेच सर्वजण एकमेकांसोबत काम करीत आहेत. या एकजुटीची कल्पना काही वर्षांपूर्वी कुणाला करताही आली नसती. या सर्व देशांमध्ये घनिष्ठ संबंधांची वेळ आल्यामुळे त्यांच्या दरम्यान द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय संबंधही खरोखर अधिक मजबूत होतील. क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य यासाठी हिंद प्रशांत हाच एकमेव व्यावहारिक आधार आहे, याबद्दल सर्व देशांचे एकमत होत चालले आहे. अमेरिकेच्या दृष्टीने चीनसोबत त्याच्या सुरू असलेल्या भू-राजकीय ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर इंडो पॅसिफिक हा धोरणाचा केंद्रबिंदू ठरला आहे, हे माईक पोम्पियो यांच्या दौ-यावरूनच स्पष्ट झाले आहे.

हा दौरा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झाला आहे. त्यामुळे विश्वसनीयता कायम राखण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून कोणत्याही परिस्थितीत केला जाईल. दुसरीकडे, पायाभूत सुविधा आणि सायबर सुरक्षा असे मुद्दे पुढे नेण्यावर जपानचा भर आहे तर ऑस्ट्रेलिया मानवाधिकारांची भाषा करीत आहे. भारताचा भर क्षेत्रीय स्वायत्ततेचा सन्मान करण्यावर आहे. भारत-जपान, ऑस्ट्रेलिया-जपान आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढत आहेत आणि वेगवेगळ्या मुद्यांवर परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे. अर्थात ‘क्वाड प्लस’विषयी आताच विचार करणे घाईचे ठरेल. परंतु प्रमुख शक्तिशाली देश व्यक्तिगत स्तरावर आणि दुस-या देशांबरोबर एकत्रितपणे समान विचार असणा-या देशांशी संबंध वाढविण्याबाबत गंभीर आहेत.

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार! – परिवहन मंत्री अनिल परब

जपानचे पंतप्रधान याच आठवड्यात व्हिएतनाम दौ-यावर असून, तेथून संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान निर्यात करण्याबाबत करार होणार आहे. इंडोनेशियाबरोबर असणारे संरक्षणविषयक संबंधही अधिक मजबूत करण्याकडे जपानचा कल आहे.वस्तुत: भारताला दूर ठेवून इंडो पॅसिफिकची संकल्पना मूर्त स्वरूप घेऊ शकली नसती. जपानने या विचारांना बळ दिले असले, ऑस्ट्रेलियाने बौद्धिक खुराक दिला असला आणि अमेरिकेने व्यूहात्मकदृष्ट्या ही संकल्पना पुढे आणली असली, तरी भारताने सक्रिय परराष्ट्र धोरणाचा स्वीकार करून ही संकल्पना स्वीकारली आणि आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने ती राबविण्यास इतर देशांना भाग पाडले. चीनच्या नेतृत्वाखालील आशियाई व्यवस्थेला दिलेला हा शह आहे, याची जाणीव भारतानेच करून दिली आहे. परिणामी, चीनचे नकारात्मक प्रयत्न पाहता भारताने इंडो पॅसिफिक संकल्पना मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांना आणखी गती द्यायला हवी.

हर्ष व्ही. पंत, लंडन

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...