20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष संसर्गमुक्त रक्ताची गरज

संसर्गमुक्त रक्ताची गरज

एकमत ऑनलाईन

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत आहे. याच टप्प्यावर भरपूर आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यासारख्या आरोग्य रक्षणाशी संबंधित गरजांच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, भारतात अद्याप १९.५ लाख युनिट रक्ताचा तुटवडा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (एनएसीओ) माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशी माहिती दिली आहे की, देशभरात सुमारे १,३४२ लोकांना २०१८-१९ मध्ये रक्त देताना एचआयव्हीची लागण झाली. रक्ताची देवाण-घेवाण करताना त्याची सुरक्षितता आणि गुणवत्ता राखण्यासंदर्भात गंभीर चिंता यामुळे निर्माण झाली आहे. कोविड-१९ च्या संसर्गाने हे संकट आणखी गंभीर झाले आहे आणि रुग्णांना पर्याप्त तसेच सुरक्षित रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला अद्याप मोठा प्रवास करावा लागणार असल्याची आठवण करून दिली आहे.

रक्ताच्या उपलब्धतेची कमतरता आणि ट्रान्सफ्युजन-ट्रान्समिटेड इन्फेक्शन (टीटीई) या दोन प्रमुख समस्या आपल्यासमोर आहेत. देशापुढील हे सध्याचे मोठे आव्हान आहे. रक्ताची ट्रान्सफ्युजन सेवा असंघटित आणि खंडित आहे, असे आपल्याला व्यवहारात दिसून येते. परिणामी ब्लड बँका आणि अंतिम गरजू रुग्ण यांच्यात संवादाच्या अभावाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच मागणी आणि पुरवठा यात अंतर पडू लागते आणि त्याचा परिणाम रक्ताच्या उपलब्धतेवर तसेच गुणवत्तेवर होतो. दुसरीकडे, स्वेच्छेने रक्तदान करण्यासंदर्भात समाजात जागरूकता कमी आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, निरोगी लोकसंख्येच्या एक टक्का लोकांनी नियमित रक्तदान केले, तरी सुरक्षित रक्ताच्या उपलब्धतेसाठी ते पुरेसे आहे. कारण हाच रक्तदात्यांचा सुरक्षित समूह मानला जातो. जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात हे छोटेसे उद्दिष्ट अद्याप आपल्याला साध्य करता आलेले नाही, ही शोकांतिकाच मानली पाहिजे.

रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या केंद्रीय होमोव्हिजिलन्स कार्यक्रमास चालना देणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी सरकारकडून आरोग्य सुरक्षा आणि कुटुंबकल्याणासाठी अनिवार्य मानल्या जाणा-या राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान संस्था, नोएडा यांसारख्या संस्थांकडून यासंदर्भात एक विस्तृत अभ्यास करून घेण्याची आवश्यकता आहे. होमोव्हिजिलन्स कार्यक्रम भारतात सर्वप्रथम १० डिसेंबर २०१२ रोजी पहिल्या टप्प्यात ६० वैद्यकीय महाविद्यालयांत सुरू करण्यात आला होता. त्याचप्रमाणे रक्त संचरण आणि रक्त उत्पादन प्रशासनाशी संबंधित प्रतिकूल प्रतिक्रियांवर नजर ठेवण्यासाठी एक चांगल्या प्रकारे तयार केलेला कार्यक्रमही सुरू केला होता. ज्या ब्लड बँकांमध्ये रक्ताची देवाणघेवाण अधिक प्रमाणात होते त्यांच्याकडून ट्रान्सफ्युजन ट्रान्समिसिबल संसर्गासाठी रक्ताचे सर्वांत कमी प्रमाणात परीक्षण केले जात असण्याची शक्यता आहे. परंतु रुग्णांना टीटीई संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे माहीत असल्यामुळे हे परीक्षण अधिक प्रमाणात केले जात असावे, असे आपल्याला वाटते.

२०११ ते २०१९ या कालावधीत वेगवेगळ्या राज्यांमधील रुग्णालयांत केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, सात ते ७२ टक्के वयस्क थॅलेसेमिया रुग्ण अपर्याप्त रक्त सुरक्षितता उपाययोजनांमुळे टीटीई (एचसीव्ही, एचबीव्ही, एचआयव्ही) पॉझिटिव्ह आढळून आले. भारतात रक्ताच्या कर्करोगाचे रुग्ण, रस्त्यांवरील अपघातांत सापडलेले जखमी, पर्यायी सर्जरीची गरज असणारे रुग्ण आणि विविध आजारांनी ग्रस्त असणारे रुग्ण यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी संचार अभियान चालविणे गरजेचे आहे. सुरक्षित रक्त म्हणजे काय, याविषयी सातत्याने माहिती दिली गेली पाहिजे.

-विनिता शाह

थारच्या वाळवंटातील लुप्त नदीचे अवशेष सापडले

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...