24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home विशेष गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

एकमत ऑनलाईन

चीनमधील शेनझेनस्थित झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन कंपनीकडून भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आदी राजकारणी व्यक्तींपासून प्रख्यात उद्योजक, न्यायसंस्था, संरक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र आदींमधील उच्च पदस्थ व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व व्यक्ती, संस्थांची माहिती आणि विविध अ‍ॅप्समधील माहितीचे झेन्हुआने संकलन केले आहे. या सायबर हेरगिरीमुळे डेटा सुरक्षा हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आजघडीला पूर्ण जगामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय सायबर संधी (ट्रीटी) अस्तित्त्वात नाही. एका देशातून दुस-या देशात डेटा चोरला जात असेल किंवा सायबर हेरगिरी केली जात असेल तर सर्वांत महत्त्वाचे असते ते अ‍ॅट्रीब्युशन. याचा अर्थ कोणत्या संगणकामधून आपल्या देशातील डेटा चोरला जात आहे तो नेमकेपणाने समजणे. यासाठी त्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस समजले पाहिजे. आज तेवढी क्षमता आपल्याकडे नाही आणि यासाठी आवश्यक असणा-या सायबर संधीही नाहीत. अशा प्रकारच्या उणिवा किंवा कच्चे दुवे हेरण्याबाबत चीन हा अत्यंत हुशार देश आहे.

चीन आयपी अ‍ॅड्रेस मास्किंग करून जगभरात विविध ठिकाणांहून त्यांचे हेरगिरीचे नेटवर्क चालवत असतो. त्यामुळे आपण सायबर हेरगिरी करणा-या एखाद्याला पकडले तर तो चीनपुरस्कृत असतो, चीनसाठीच काम करत असतो; पण अधिकृतरित्या तो चीनचा सरकारी कर्मचारी नसतो. परिणामी चीन यातून सहजगत्या हात झटकू शकतो. कारण आपल्याला थेट चीनवर ठपका ठेवता येत नाही. आंतरराष्ट्रीय सायबर संधी नसल्यामुळे आज आपल्याला सायबर सीमा संरक्षित करता येणे शक्य ठरत नाहीये. विशेष म्हणजे, चीनने मात्र याच सायबर सीमा अत्यंत चलाखीने आणि पद्धतशीरपणे संरक्षित केलेल्या आहेत. चीनमध्ये त्यांचे फायरवॉल्स आहेत व त्यांचा अंतर्गत सुरक्षा कायदाही आहे. याखेरीज चीनचा स्वत:चा सोशल मीडिया आहे. त्यांचे स्वत:चे सर्च इंजिन आहे.

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

परिणामी आज चीनमधील डेटा बाहेर जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याउलट आपल्याकडून प्रचंड प्रमाणातील डेटा चीन व इतर देशांकडे जात असतो. आपण फोनद्वारे इतरांशी करत असलेले संवाद, फोनच्या कॅमे-यामधून चित्रबद्ध केलेले व्हिडिओ, व्हॉटसअ‍ॅप किंवा सोशल मीडियावरील चॅटिंगमधून चोरलेला डेटा, ईमेलमधून चोरलेला डेटा चीनकडे जात असल्याने आज असंख्य भारतीयांच्या जीवनातील अगणित क्षण चीनी सर्व्हरमध्ये स्टोअर करण्यात आलेले आहेत.

हे सर्व चीनला कसे परवडते? याचे मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये अत्यंत स्वस्त दरामध्ये हार्डवेअर उपलब्ध आहे. हार्डवेअर बनवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान चीन इतर देशांतून चोरी करतो. त्यामुळे केवळ हार्डडिस्क किंवा मायक्रोप्रोसेसर बनवण्यासाठीचा खर्चच चीनला करावा लागतो. हा खर्च अत्यंत नगण्य असतो. यामुळे चीनला मोठमोठे डेटा सेंटर्स, सव्हर्स बनवणे अत्यंत सोपे जाते. विशेष म्हणजे हे सर्व करण्यासाठी चीनमधील सरकार निधीपुरवठा करत असल्याने आर्थिक टंचाईचा प्रश्नच उद्भवत नाही.

अशा स्थितीत भारताला जर चीनचा सामना करायचा असेल तर आपली स्वत:ची हार्डवेअर पॉलिसी आणणे गरजेचे आहे. फक्त हार्डवेअर पॉलिसी आणून चालणार नाही, तर भारतामध्ये संगणक हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगची इकोसिस्टीम बनवणे गरजेचे आहे. तसे झाल्यास आपल्याला हार्डवेअरच्या किमतींबाबत चीनला टक्कर देता येईल. दुर्दैवाने, आज आपण संगणक-मोबाईल वा अन्य गॅजेटस्मधील प्रत्येक चीप ही चीनकडून आयात केलेली असते. या चिप, आयसी बोर्ड भारतात बनवण्यासाठी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला सरकारी प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिले गेले पाहिजे.

टीआरपी

कारण चीनमधून येणा-या चीपमध्ये मालवेअर टाकलेले असते. आज भारतात घराघरांमध्ये जे स्मार्ट टीव्ही दिसून येताहेत, त्या स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातूनही चीनी कंपन्या, त्यांचे सर्व्हर हेरगिरी करत असतात. ही सर्व शृंखला तोडण्यासाठी भारतीय हार्डवेअर पॉलिसी व सरकारी प्रोत्साहनाची गरजेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डेटा लोकलायजेशन अर्थात भारताच्या सायबरसीमांमध्ये भारतीय लोकांचा व कंपन्यांचा डेटा स्टोअर करणे गरजेचे आहे. आज क्लाऊड तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा क्लाऊड स्टोअरेजमध्ये साठवला जातो. परंतु चीन या क्लाऊड कंपन्या विकत घेतो आणि हा सर्व डेटा मिळवतो. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

लोकशाही देशांमध्ये माहितीचे अदानप्रदान हे मुक्त रुपाने झाले पाहिजे अस जगभरात म्हटले जाते. परंतु आज या डेटाचा गैरवापर होत आहे. हे थांबवण्यासाठी आपल्याला एक धोरण ठरवावे लागेल आणि त्याला जागतिक अधिमान्यता मिळवावी लागेल. यासाठी भारताने स्वत:चा फायरवॉल तयार करणे आवश्यक आहे. याखेरीज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील परदेशी कंपन्या राजरोसपणे आपला डेटा घेऊन जात असतील तर त्यावर नियंत्रण आणणारी नियमावली किंवा नीती ठरवली गेली पाहिजे. कंपन्यांकडून जितका डेटा संकलित केला जाईल त्याप्रमाणात कर आकारणी केली गेली पाहिजे.

एकविसाव्या शतकात डेटा हे तेलाइतके मोलाचे बनले आहे. जर इंधनासाठी रॉयल्टी असते, त्यावर करआकारणी केली जाते; मग जमा केल्या जाणा-या डेटावर कर आकारणी का केली जाऊ नये? भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असंख्य प्रकारचा डेटा परदेशी तंत्रज्ञान कंपन्या नित्यनेमाने संकलित करत आहेत. धक्कादायक बाब आणि वास्तव म्हणजे या डेटाचा व्यापार केला जातो. त्याची विक्री केली जाते. त्यातून या कंपन्या प्रचंड पैसा कमावतात.
चीनसारख्या देशातील तंत्रज्ञान कंपन्यांकडे तर आज भारतीयांचा इतका डेटा आहे की ते एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे सहज विश्लेषण करू शकतात.

आरक्षणास स्थगितीमुळे मराठा तरुणांत अस्वस्थता

उदाहरणार्थ, एखादी भारतीय व्यक्ती जागतिक स्तरावरील घटनेबाबत कसा विचार करू शकेल, याची माहिती किंवा अनुमान आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या साहाय्याने चीनी विचारवंतांना, लष्करी अधिका-यांना, धोरणकर्त्यांना वर्तवले जाते. कारण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य कंगोरे माहितीच्या रुपात त्यांनी मिळवलेले आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळेच आधुनिक युगातील सायबर वॉरफेअरसंदर्भात एक धोरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हे धोरण दीर्घकालीन असले पाहिजे. चीन गेल्या ३० वर्षांनुसार यासंदर्भातील सुनियोजिन धोरणानुसार मार्गक्रमण करत असल्यामुळेच आज या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

जगभरातून चोरलेल्या, मिळवलेल्या माहितीचे पृथ:क्करण करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी, त्यातील माहितीची संगती लावून त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी, अंदाज वर्तवण्यासाठी अत्याधुनिक आणि प्रचंड क्षमता असणारे सुपर कॉम्प्युटर्स चीनकडे आहेत. यातून चीन श्रीमंत झाला आहे. आपणही या डेटा मायनिंगचे महत्त्व आणि धोका ओळखला पाहिजे आणि त्यानुसार एक सर्वंकष धोरण ठरवले पाहिजे. भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या सायबरसीमा सुरक्षित करण्यासाठी त्याची नितांत गरज आहे.
शब्दांकन : हेमचंद्र फडके

-अ‍ॅड.डॉ. प्रशांत माळी
सायबर सुरक्षा आणि सायबर कायदेतज्ज्ञ

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...

गरज निकष बदलण्याची

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स अर्थात टीआरपी हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आकड्यांमध्ये फेरफार करून काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी टीआरपी घोटाळा केल्याचे समोर आले आहे,...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...