24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home विशेष ‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

एकमत ऑनलाईन

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे अशा सर्व घटकांना बसणा-या कोरोनाच्या झळा अतितीव्र स्वरुपाच्या आहेत. जीडीपीमध्ये मोलाचे योगदान देणा-या पर्यटन क्षेत्रात टूर्स ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, विमान सेवा यांखेरीज इतर अनेक छोटे-मोठे घटक समाविष्ट आहेत. पण गेल्या सहा महिन्यांपासून एक रुपयांचीही उलाढाल न झाल्याने आणि पुढील काही महिने स्थिती सुधारण्याची शक्यता नसल्याने या क्षेत्रावर उदरनिर्वाह करणा-यांपुढे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. पर्यटनामुळे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. विदेशी पर्यटक आपल्या देशात आले तर त्याद्वारे अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळते. याचे कारण विदेशी पर्यटक विदेशी चलन आणत असतात. त्यामुळे पर्यटनाचे नाते अर्थव्यवस्थेशी जोडले गेले आहे. पर्यटनाचे क्षेत्र अर्थव्यवस्थेसाठीच उपकारक ठरणारे नसून पर्यटनामुळे जगभरातील संस्कृतींची ओळख आणि देवाणघेवाण होत असते; तसेच निसर्गाच्या सौंदर्याविष्कारांचा आनंद उपभोगण्याची संधी मिळत असते. पर्यटनाच्या निमित्ताने दूरस्थ लोकांशी परिचय होत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच पर्यटन क्षेत्राने मोलाचे योगदान दिले आहे. केवळ भारतच नव्हे तर आज जगभरातील अनेक देश केवळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत.

जगाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा हिस्सा १० टक्के इतका असून ३३ कोटींहून अधिक नोक-या या क्षेत्रातून निर्माण झालेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जगभरात चारपैक एक नोकरी या क्षेत्रातून निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळापूर्वी हे क्षेत्र ३.५ टक्के दराने वृद्धी करत होते. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (डब्ल्यूटीटीसी)च्या म्हणण्यानुसार मेक्सिकोसारख्या देशाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे कारण त्यांच्या जीडीपीमध्ये १५.५ टक्के हिस्सा पर्यटनक्षेत्राचा आहे. भारताचा विचार करता आपल्या एकूण अर्थव्यवस्थेत पर्यटनक्षेत्राचा वाटा ६.८ टक्के इतका आहे.२०१९ मध्ये पर्यटनक्षेत्रातून ४.२ कोटी नोक-यांची निर्मिती झाली. देशात झालेल्या एकूण रोजगारनिर्मितीच्या तुलनेत हा हिस्सा ८.१ टक्के इतका आहे.

सभेपूर्वी जि.प. सभापतीसह महिला सदस्य कोरोनाबाधित

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. डब्ल्यूटीटीसीच्या अहवालानुसार, भारतात १२ टक्के लोक बांगलादेशातून, ९ टक्के अमेरिकेतून, ६ टक्के ब्रिटेनमधून, २ टक्के ऑस्ट्रेलियातून, २ टक्के कॅनडातून आणि ६९ टक्के लोक अन्य देशांमधून पर्यटनासाठी येतात. या अहवालानुसार, भारतात ट्रॅव्हल आणि टुरीझम क्षेत्रातील ८३ टक्के खर्च हा देशांतर्गत होतो; तर १७ टक्के खर्च आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो. औद्योगिक संस्था सीआआय आणि हॉटेलिवेट या संस्थेने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार, कोविड१९ च्या संकटामुळे भारतात पर्यटन व्यवसाय आणि त्याची पुरवठा साखळी यांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे.

पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे अशा सर्व घटकांना बसणा-या कोरोनाच्या झळा अतितीव्र स्वरुपाच्या आहेत. आकड्यांमध्ये विचार करता, तब्बल ५ लाख कोटी म्हणजे ६५.५७ अब्ज डॉलर्सचा फटका या क्षेत्राला बसला आहे. यामध्ये संघटित क्षेत्राचे झालेले नुकसान २५ अब्ज डॉलर्स इतके असण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी (एफएआयटीएच) च्या मते हे नुकसान १५ लाख कोटींहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनीही गेल्या महिन्यामध्ये पर्यटनक्षेत्राच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली होती. गेल्या पाच महिन्यांत वैश्विक पर्यटनउद्योगाचे ३२० अब्ज डॉलसर्च नुकसान झाले असून १२ कोटी नोक-या धोक्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले होते.

२३ मार्चपासून देशात टाळेबंदी सुरु झाली आणि देशांतर्गत तसेच विदेशी प्रवासासह सारे काही ठप्प झाले. अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा गतिमान झाल्याशिवाय लोकांना जगवता येणार नाही हे लक्षात येताच कोरोना संक्रमणाच्या धोक्यात तसूभरही फरक पडलेला नसतानाही अनलॉक आणि न्यू नॉर्मलची प्रक्रिया सुरु झाली. टप्प्याटप्प्याने सारे काही खुले होत गेले. परंतु पर्यटनक्षेत्रासाठीचे, हॉटेल इंडस्ट्रीसाठीचे निर्बंध मात्र तसेच कायम राहिले. आजही आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. वंदे भारत योजनेंतर्गत परदेशातील अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे; पण यासाठी केवळ एअर इंडियाचाच वापर करण्यात येत आहे.

लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने वाचवले रुग्णांचे १०० कोटी रुपये

खासगी विमान कंपन्यांना त्यामध्ये सहभागी करुन घेतले जात नाहीये. आज भारताच्या इमिग्रेशनच्या नियमावलीनुसार अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसावर युनायटेड एअर लाईन्स, टर्किश एअरलाईन्स यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवास करता येत नाही; पण तेच विद्यार्थी वंदे भारतअंतर्गत प्रवास करु शकतात. असाच प्रकार सर्वसाधारण नागरिकांबाबतही दिसून येतो. हा दुजाभाव खासगी विमानसेवांसाठी आणि परदेशात जाऊ इच्छिणा-या प्रवाशांसाठी मारक ठरत आहे. एअर इंडियाचा लाभ होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही; परंतु खासगी विमान वाहतुकला ब्रेक लावल्यामुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चाके पुढे सरकण्यात अडथळे येत आहेत. वास्तविक, वंदे भारत अंतर्गत प्रवाशांना मोजावे लागणारे पैसे हे खासगी विमानसेवेपेक्षा खूप अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांनाही आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व विमानसेवा सुरु होणे आवश्यक आहे.

हॉटेल्स बंद आहेत. कोरोना संक्रमणाने बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याने पर्यटनाला सुरुवात होऊन ते सुरळित होण्यास २०२१ चा पूर्वार्धही उलटू शकतो. अशा स्थितीत या व्यवसायावर अवलंबून असणा-यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन व्यवसायाचा आवाका प्रचंड मोठा आहे. केवळ वाहतूक, हॉटेल इंडस्ट्री आणि टुरिझम कंपन्या, टूर्स ऑपरेटर म्हणजे पर्यटनउद्योग नव्हे; तर त्यावर अवलंबून असणा-या अन्य पूरक घटकांची संख्या कितीतरी पटींनी अधिक असते. पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी देत असतो त्यावेळी त्याद्वारे त्या भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात. ज्यांनी २५-३० वर्षापूर्वीचे कोकण पाहिले आणि आजचे कोकण पाहिले आहे त्यांना पर्यटनामुळे कोकणात झालेला बदल निश्चितपणे अनुभवास येईल.

पर्यटनामुळे कोकणासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली आहे. एकेकाळी मुंबईतील कोकणवासियांच्या मनीऑर्डरवर अवलंबून असलेला प्रदेश म्हणून कोकणची ख्याती होती; मात्र पर्यटनामुळे कोकणात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. असे चित्र देशाच्या अनेक भागात पाहावयास मिळते. आग्रा, खजुराहो, अजंठा वेरूळ यासारखी ठिकाणे अनेक वर्षांपासून परदेशी पर्यटकांच्या पसंतीची म्हणून ओळखली जातात. ही ठिकाणे पाहाण्यासाठी अनेक वर्षांपासून देश-विदेशातील पर्यटक येत असतात. गोवा हे पर्यटकांच्या दृष्टीने आवडीचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळांच्या क्षेत्रातील हजारो जणांचे उदरनिर्वाह पूर्णत: तेथे येणा-या पर्यटकांवर अवलंबून असतात.

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’मोहिमेची जिल्हाधिका-यांकडून शपथ

पण गेल्या ५-६ महिन्यांपासून एक रुपयांचीही उलाढाल न झाल्याने आणि आगामी काही महिनेही ती होण्याची शक्यता नसल्याने हे सर्व घटक अक्षरश: गलितगात्र झाले आहेत. एप्रिल-मे हा सुट्यांचा हंगाम गेला, त्यानंतर पावसाळी पर्यटनाचा हंगामही गेला, आता दिवाळी-ख्रिसमस आणि नववर्षाचा हंगामही निसटून जाणार आहे. म्हणजेच जवळपास ८ ते १० महिन्यांहून अधिक काळ एक रुपयाचीही मिळकत न झाल्यास या क्षेत्रातील लोकांनी गुजराण कशी करायची? आज महाराष्ट्रात, देशात कित्येक पर्यटन व्यावसायिकांनी बराच काळ वाट पाहून आपली कार्यालये बंद केली आहेत. सुरुवातीचे काही दिवस पदरमोड करुन कर्मचा-यांचे वेतन अदा केले; पण नाईलाजाने त्यांनाही कामगारकपात करावी लागली आहे. विमान कंपन्यांनीही कामगार कपात केली आहे. टॅक्सीवाले, खासगी बसेसवाले, पर्यटनस्थळी असणारे छोटे-मोठे व्यावसायिक, विक्रेते, गाईड, बोटींगवाले अशा असंख्य जणांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. ही सर्व भीषण परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने पर्यटनक्षेत्रासाठी विशेष पॅकेज देण्याची नितांत गरज आहे.

पर्यटन व्यावसायिकांना आयकर, जीएसटी, पीएफ, ईएसआय आणि अन्य वैधानिक कर, शुल्क, उपकर या सर्वांतून पूर्ण सवलत देण्याची गरज आहे. तसेच बँकांच्या कर्जांच्या हप्त्यातून आणखी किमान एक वर्षासाठीची सवलत मिळणे आवश्यक आहे. यापलीकडे जाऊन पर्यटन उद्योग पूर्ववत करण्यासाठी एका स्वतंत्र कोषाची निर्मिती करण्याची गरज आहे. साधारणत: ५० हजार कोटी रुपयांचा हा फंड असला पाहिजे. या माध्यमातून पुढील पाच वर्षे व्याजमुक्त कर्ज आणि अन्य काही सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. सरकारने तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास या क्षेत्राचे दिवाळे निघण्यास वेळ लागणार नाही. तसे झाल्यास अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी ती फार मोठी हानी ठरेल. आज सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसलेला असला तरी पर्यटन क्षेत्राला बसलेली झळ सर्वाधिक आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच केंद्राने ताबडतोबीने पर्यटन उद्योगासाठीच्या पॅकेजची घोषणा करणे आवश्यक आहे

कॅप्टन नीलेश गायकवाड

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...

गरज निकष बदलण्याची

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स अर्थात टीआरपी हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आकड्यांमध्ये फेरफार करून काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी टीआरपी घोटाळा केल्याचे समोर आले आहे,...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...