रोजच्या आयुष्यात आपण ‘पाच मिनिटं थांब’ हे वाक्य अनेकदा वापरत असतो. काही अतिवक्तशीर व्यक्ती ‘पाच मिनिटं’ असा सवाल करून ‘पाच मिनिटांत जग इकडचं इकडं होतं’ असं म्हणणारीही आपण पाहिलेली असतात. आजच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, इंटरनेट, सोशल मीडिया यांनी प्रचंड वेगवान बनलेल्या जगात पाच नव्हे तर एका मिनिटात अक्षरश: अब्जावधी गोष्टी घडताहेत. अमेरिकेत दर मिनिटाला ३८० संकेतस्थळे बनवतात.. एका मिनिटात फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर ७१.६ दशलक्ष संदेश पाठवले जातात…एका मिनिटात ट्विटर खात्यांवरून ८७,५०० ट्विट्स केले जातात…गुगलवर दर मिनिटाला ३.८ दशलक्ष सर्च केले जातात….ही सारी सांख्यिकीय माहिती मिनिटागणिक जग बदलत असल्याचे दर्शवणारी आहे. ‘काळासोबत चला’ हा यातून मिळणारा धडा आहे…!
आपल्याला एखाद्याचा कामाच्या ठिकाणी किंवा अन्य निमित्ताने लवकर येण्यासाठी फोन आला तर आपण पाच मिनिटांत पोचतो, थोडी वाट पाहा, असे सांगतो. आणखी थोडा वेळ थांबा, वाट पाहा असेही म्हणण्याची काहींना सवय असते. अर्थात एखाद्याने सांगितलेली पाच मिनिटे आणि थोडा वेळ थांबा हे किती वेळ वाट पाहावयास लावते ही गोष्ट संबंधिताच्या कामातील व्यग्रता, व्यक्तीला भेटण्याची असणारी इच्छा आणि त्याचवेळी अंगवळणी पडलेली सवय यावर अवलंबून आहे. पाच मिनिट उशीर होत असेल तर आपण त्यास अजिबातच महत्त्व देत नाहीत. पण सध्याचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. सर्वत्र नॅनो टेक्नॉलॉजीचा बोलबाला आहे. इंटरनेटचे जाळे पसरलेले आहे. सोशल मीडियाने आपले आयुष्य चोहोबाजूंनी व्यापलेले असताना एक मिनिट देखील किती महत्त्वाचा आहे, हे ओळखले पाहिजे. कारण एका मिनिटात, काही क्षणांत आपले संपूर्ण आयुष्यच नव्हे तर काहीवेळा संपूर्ण जग बदलते.
इंटरनेटच्या जगात एक मिनिट म्हणजेच ६० सेकंदात सर्वकाही बदलते. खूप कमी वाटणारा साठ सेकंदांचा काळ हा प्रत्यक्षात खूप मोठा असतो. खरंच आपल्याला रियल टाईममध्ये इंटरनेटवर काय काय घडते, हे ठाऊक आहे का? प्रत्येक मिनिटाला फक्त अमेरिकेत ३८० नवी संकेतस्थळं सुरू होतात. फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर एका मिनिटात ७१.६ दशलक्ष मेसेज फॉरवर्ड होतात. दर मिनिटाला ट्विटरवर ८७,५०० ट्विट पोस्ट होतात. यूट्यूबही यात मागे नाही. यूट्यूबवरचे सक्रिय यूजर्स हे दर मिनिटाला पाचशे तासांचे नवीन व्हीडीओ अपलोड करतात. इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला ६,९५,००० स्टोरी शेअर होतात. दर मिनिटाला गूगलवर ३.८ दशलक्ष सर्चिंग केले जाते. त्याचवेळी दर मिनिटाला फेसबुक, यूट्यूब आणि अॅमेझॉन या शब्दांचा सर्वाधिक सर्च होतो. आता कमाईकडे जाऊ. गूगल हे एका मिनिटात १,२८,२३४ डॉलर कमावते. जीमेलचा विचार केला तर एका मिनिटात २३२.४ दशलक्षपेक्षा अधिक ईमेल जगाच्या कानाकोप-यात पाठविले जातात.
याहू आणि बिंगसारख्या सर्च इंजिनवर एका मिनिटात अनुक्रमे ३,५२,१३४ तसेच ५,७४,०२६ सर्च होते. याहू देखील एका मिनिटात ९४५२ डॉलर कमावते. एका मिनिटात ७८१२ डॉलर बिंग कमावते. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर दर मिनिटाला २८,००० ग्राहकांनी त्याच्या अॅपवर काही ना काही पाहिल्याचे सिद्ध झाले आहे. एका मिनिटात डेटिंग अॅप टिंडरवर २० लाख प्रोफाईल स्वाईप केले जाते. तसेच लोकांनी सोशल मीडियाकडे केवळ टाईमपास म्हणून पाहत नाहीत तर प्रोफेशनल नेटवर्किंगही करतात. म्हणून लिंकडेनवर दर मिनिटाला ९,१३२ नवीन कनेक्शन जोडले जातात. इंटरनेटवर किती शॉपिंग होते याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण २०२१ मध्ये दर मिनिटाला इंटरनेटवर १६ लाख डॉलर खर्च झाले आहेत. कदाचित एक बाब ठाऊक नसेल, की आपल्या पापण्यांची एका मिनिटाला २० वेळा उघडझाप होते. आपण दर मिनिटाला ३० हजारपेक्षा अधिक मृत त्वचा कोशिकांचे वहन करतो. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला एका मिनिटासाठी श्वास रोखून धरणे सोपे नाही. यासाठी सराव आवश्यक असतो. परंतु आपण एखाद्या एक्स्प्रेस वेवर प्रवास करत असाल तर एका मिनिटात दोन किलोमीटरचे अंतर कापतो. भारताची गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी पी. टी. उषा ही १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये सेकंदाच्या शंभरावा भागाने पदकापासून वंचित राहिली.
पदार्थाच्या अस्तित्वाला तीन परिमाणे आहेत. थ्री डी डायमेन्शनल म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची. परंतु आत्मा हे चौथे परिमाण आहे. फोर्थ डायमेन्शन असे त्यास म्हणतो. लांबी, रुंदी आणि उंची या तीन दिशा आहेत. यात सर्व गोष्टींचा समावेश होतो. परंतु आत्म्याची आणखी एक दिशा असून ती वस्तूंत मोजली जात नाही. ती अनुभव देणारी दिशा आहे. ती आहे वेळ, तो असतो काळ. वेळ हे अस्तित्वाचे चौथे परिमाण आहे. याप्रमाणे वस्तूत तीन परिमाण असू शकतात, मात्र जिवंतपणाला कधीही तीन परिमाण नसतात. ते चौथ्या परिमाणामध्येच असतात. आपण जिवंतपणा बाजूला काढून घेतला तर जगात सर्वकाही असेल, परंतु केवळ वेळ, काळ नसेल. कारण वेळेची अनुभूती जिवंतपणातूनच येते. आईनस्टाईनने मोठे काम केले आहे. त्यांनी या चारही परिमाणांना एकमेकांशी जोडून अस्तित्वाची संकल्पना स्पष्ट केली. आकाश आणि वेळ तसेच काळ आणि विभाग या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे आपल्याला नेहमीच सांगण्यात आले आहे. या अर्थाने वेळ वेगळा आहे, भाग वेगळा आहे. आईनस्टाईन यांनी म्हटले की, या गोष्टी वेगळ्या नाहीत, या एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्या एकाच गोष्टीच्या अविभाज्य भाग आहेत. त्यांनी एक नवीन शब्द नावारूपास आणला. ‘स्पेसियोटाईम’. टाईम आणि स्पेस. काळ आणि क्षेत्राला एकत्र केले. अर्थात या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत.
वेळ सर्वांत मौल्यवान आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. सर्वकाही काळावर अवलंबून असते. वेळेच्या अगोदर काहीच होत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. सर्वकाही काळानुसार बदलत राहते. काळ हा एकाच दिशेने प्रवाहित होत राहतो. आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ हवा असतो. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी, परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी, आयुष्यात प्रगती करण्यासाठी, आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपली पात्रता वाढविण्यासाठी वेळ हवा असतो. सर्वांना एका दिवसात समान चोवीस तास मिळतात. परंतु त्याचा वापर करण्याचा मार्ग हा प्रत्येकाचाच वेगवेगळा आहे. वेळेचा सदुपयोग करणे हे आपल्या हातात आहे. यासंदर्भात अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. काहींनी बदलत्या काळाचा अनुभव घेतला. त्यामुळे वेळ असताना त्याचे महत्त्व ओळखून घेतले पाहिजे. आदर केला पाहिजे. बौद्ध तत्त्वज्ञानात क्षणभंगुरपणा हा सर्वांत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. याप्रमाणे या ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आणि नश्वर आहे. अमर काहीच नाही. क्षणभंगुर हा शब्दप्रयोग देखील अनेकदा वापरला गेला आहे.
-योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक