29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeविशेषमहाविषारी जिवांची दुनिया

महाविषारी जिवांची दुनिया

एकमत ऑनलाईन

विषारी प्राण्यांविषयी सर्वांच्याच मनात अगदी लहानपणापासून भीती असते. सामान्यत: आपल्याला साप, नाग, कोळी यांसारख्या विषारी जिवांविषयी माहिती असते. यातील काही प्रजाती या अतिविषारी असतात. परंतु गोगलगायी, मुंग्या, बेडूक, जेलिफिश यांबरोबरच पक्ष्यांमध्येही अत्यंत विषारी म्हणून ओळखल्या जाणा-या काही प्रजाती आहेत, याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ असतात. या जिवांच्या विषाची दाहकता इतकी महाभयंकर असते की त्यांच्या दंशाने माणूस गतप्राण होऊ शकतो. अर्थात, हा विषारीपणा हे त्यांच्यासाठी निसर्गाने दिलेले वरदान असते. या विषाचा वापर करून एक तर ते शिका-यापासून स्वत:चे रक्षण करतात किंवा आपल्या भक्ष्याला गारद करतात.

काही कीटक, पशू, पक्षी यांना निसर्गत: एक देणगी लाभलेली असते आणि ती म्हणजे त्यांच्या ठायी असलेली विषारी रसायने होत. या विषाचा वापर करून एक तर ते शिका-यापासून स्वत:चे रक्षण करतात किंवा आपल्या भक्ष्याला गारद करतात. काही जीव आपल्या अंगभूत विषाने असतात आणि ते हल्ला करणा-या शिका-याला आपसूक बाधित करतात. तर व्हिनोमोस प्रकारचे प्राणी आपल्या दंश, चावा आणि इतर तत्सम मार्गाने प्रत्यक्ष विष दुस-याच्या शरीरात घुसवतात. पृथ्वीवरच्या अशा अत्यंत विषारी जिवांची माहिती मोठी रंजक आहे.

पश्चिम कोलंबियात डोल्डन डार्ट फ्रॉग नावाचा पिवळ्या रंगाचा बेडूक आढळतो. त्याच्या त्वचेत चकाकणारे विष पाझरते. हे विष इतके घातक असते की ते सहजत: १०-२० माणसाला मारू शकते. हा बेडूक मुंग्या आणि कीटक खात असतो आणि त्या अन्नातून विष बनवतो आणि मोठमोठ्या सापांना गारद करतो. ब्राझिलमध्ये भटक्या कोळी हा कीटक सापडतो. दक्षिण आफ्रिकेतला हा भटक्या वृत्तीचा कोळी अल्पप्रमाणात विष ओकतो, तरीही त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात असतो. या विषाचा मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होऊन माणूस लुळापांगळा होतो.

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही

ऑस्ट्रेलियातील दी इनलँड तैपान’ या सापाचे विष भयानक तीव्रतेचे असते. ते न्युरोटॉक्सिन्स, हिमोटॉक्सिन्स, मायटोक्सिन्स आणि नेफ्रोटॉक्सिन्स या विषारी रसायनांनी युक्त असते. त्याने दंश केल्यानंतर माणूस जमिनीवर कोसळेपर्यंत त्याचे रक्त, मेंदू, स्नायू आणि मूत्रपिंड या विषांत विरघळून जातात. हा महाभयानक साप क्वचितच माणसाच्या संपर्कात येतो. दक्षिण पॅसिफिक विभागात आढळणारा स्टोनफिश हा मासा अक्षरश: दगडासारखा दिसतो. पण शत्रूला हूल देण्यासाठी त्याचे ते खडकीय सोंंग असते. प्रवाळामध्ये तो चपखल लपून असतो. बीचवर फिरणा-या पर्यटकाचा त्याच्यावर पाय पडला तर तो विषाचा फवारा सोडतो आणि पायाला कायमस्वरूपी बाधा पोहोचवू शकतो.कीटक वर्गातला विषारी जीव म्हणून दी मारिकोपा हार्वेस्टर मुंगीची ओळख आहे.

ऑरिझोनाच्या जंगलात या मुंग्या आढळतात. त्यांचं वारूळ ३० फूट व्यासाचं नि ६ फूट उंच असते. मधमाशांचे १०,००० डंख माणूस मरण्यास कारणीभूत ठरतात तर मारिकोपा हे काम ३०० डंखात करू शकते. समुद्रात आढळणा-या विषारी जेलीफिश या समुद्रिक जिवांपैकी दी सी वास्प गटाचे जेलीफश जास्तच धोकादायक असतात. त्यांचं मुख्य अंग पेटीच्या आकाराचे असते आणि त्याचे दो-या सारखे अवयव विशिष्ट पेशींनी बनलेले असतात. त्यातून ते विष फवारतात. २०१९ मध्ये एकट्या ऑस्टेÑलियात १०० जण या सी फ्लेक्सरी जातीच्या जेलीफिश विषाने दगावले होते.

सस्तन गटात मोडणारा प्लाटीपस या नामशेष होऊ घातलेल्या प्राण्यांच्या पायांना विषाने युक्त अशी नखे असतात. विशेषत त्यांचे नर या आयुधाचा वापर मादीवर कब्जा मिळविण्यासाठी करत असतात. या अस्त्राचा वापर ते छोट्या- मोठ्या प्राण्याविरुद्ध करतात. माणसावरील त्याचे हल्ले क्वचितच आहेत.मोलूस्क या विषारी गोगलगायी समुद्रात आढळतात. कॉनस मार्मोरेनस गटात मोडणा-या या गोगलगायींना मार्खल कोन स्नेल असे म्हटले जाते. आपल्या शरीरात असलेले विष हा प्राणी भक्ष्याला चावा घेऊन आपल्या भाल्याच्या आकाराच्या दाताद्वारे त्याच्या शरीरात सोडतात. त्यासाठी शरीरातील मांसल भागाचे आकुंचन-प्रसरण हालचाली करतात. विषबाधा झालेल्या भक्ष्यावर ते निवांत ताव मारतात.

दी हुडेड पिटोहुई हा न्यू गुनियातील बंदरावर आढळणारा पक्षी विषारी आहे. त्याच्या कातडीत आणि पंखात विष दडलेले असते. मज्जासंस्थेला बधिर करणारे होमोबॅट्राकोटॉक्सिन नावाचे विष मानवी शरीरात गेले तर बधिरता आणि कानात घणघण आवाज होणारी व्याधी जडते. छोट्या प्राण्यांची या विषाने जास्त हानी होते. त्यांचे अन्न कीटक असतात आणि त्यातून हे विष तयार होत असते. शरीरावर निळ्या रंगाच्या कड्या ल्यालेले ऑक्टोपस इंडियन आणि पॅसिफिक महासागरात आढळतात. मुळात शांत वृत्तीचा प्राणी जर भेदरला तर भक्ष्याला हळुवार चावा घेतो. पण त्याचे विष माणसाला लुळेपांगळे करू शकते.
कासवांच्या जातीत दी हॉवक्सबिल टरटल हा सामुद्री जीव आकाराने मोठा असतो. तो जगभरात आढळतो, तरी आग्नेय आशियात त्याची संख्या जास्त आहे. समुद्रातील विषारी शेवाळावर गुजराण करणा-या कासवाचे मटण खाल्ले की उलट्या होणे, हगवण, मळमळणे तसेच आतड्याचे विकार जडतात.

जोसेफ तुस्कानो,
ज्येष्ठ विज्ञानलेखक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या